पाहताच खडूस मुख्यमंत्र्याला,
अरारा ! कलिजा खलास झाला !!
आशा भोसलेंना मी ओळखतो पेक्षा आशा भोसले मला ओळखतात हे जसे अधिक सयुंक्तिक तसे अंतुले निलंगेकर विलासराव शरदराव पृथ्वीराजजी एकनाथजी उद्धवजी अशोकराव बाबासाहेब शंकरराव आणि आजचे देवेन्द्रजी इत्यादी 1980 नंतरच्या साऱ्याच मुख्यमंत्र्यांना जसे मी जवळून बघितले तसे ते सारेच्या सारेच मलाही एक पत्रकार म्हणुन ओळखायचे ओळखतात, दिवंगत शंकरराव चव्हाण त्यानंतर दुसरे पुन्हा चव्हाणच पृथ्वीराज आणि आजचे फडणवीस हे तिघे अपवाद सोडल्यास अन्य एकालाही त्यातल्या हे राज्य भ्रष्टाचाराच्या जोखडातून बंधमुक्त करावे जातीच्या बंधनातून सोडवावे कधीही वाटले नाही अन्यथा उभे राज्य केव्हाच कुठल्या कुठे निघून गेले असते, फडणवीसांची वाट पाहावी लागली नसती. तुझे प्रकरण माझ्याकडे आले आहे छापायचे नसेल तर पैसे पाठव या पद्धतीची पत्रकारिता मी केली असती तर पुढल्या पिढीतला माझा पत्रकार मुलगा विक्रांत देखील त्याच वळणावर गेला असता त्यातून खूप पैसे मिळाले असते पण वाईट कृत्यांविरुद्ध लढा देणे जमले नसते, मीडियातल्या बहुसंख्य डाकू पद्धतीने आम्हालाही मान खाली घालून पुरस्कार व पैसे नक्की मिळविता आले असते तेच नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे, तेही पृथ्वीराज आणि शंकरराव या दोन्ही चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून हे राज्य हाकणारे म्हणजे जे काय थोडेफार आर्थिक व्यवहार अप्रत्यक्ष खपवून घ्यावे लागतात ती असते त्यांच्या पक्षाची आर्थिक गरज त्यातून पक्षाला आर्थिक मदत जे एकही मुख्यमंत्र्याला न टाळता येणारे पण फडणवीसांचे त्यापलिकडे हुबेहूब त्या मोदींच्या पावलावर पाऊल, स्वतःसाठी आर्थिक भानगडी करणे त्यांना जमणारच नाही तेवढ्या त्यांच्या गरजही नाहीत त्यातूनच त्यांचे मॉरल उच्च प्रतीचे म्हणूनच जे इतर आजतागायतच्या एकाही मुख्यमंत्र्याला जमले नाही, त्यांनी ते थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना तेही एकदम जाहीर सांगून टाकले आहे कि कामात दिरंगाई केली तर पगारातून दर दिवशी एक हजार रुपये कापल्या जातील. लै तयारीचा आणि मोदींची हुबेहूब नक्कल करणारा हा मुख्यमंत्री, वाईट काम करणाऱ्या कुठल्याही बदमाश व्यक्तीच्या अंगाचा थरकाप उडवून देणारा…
www.vikrantjoshi.com
संघाच्या उत्तम संस्कारातुन तयार झालेला कट्टर आणि तत्वांना धरून चालणारा त्यांचा जनसंपर्क अधिकारी केतन पाठक म्हणाल तर त्यांचा नागपुरातला सुरुवातीपासूनचा सवंगडी आणि पट्टीचा स्वयंसेवक, पाठक डोळ्यात तेल घालून फडणवीस उठल्यापासून तर झोपेपर्यंत त्यांच्या प्रत्येक ऍक्शनची आम्ही पत्रकार असूनही आम्हाला जशीच्या तशी माहिती अगदी फोटोंसहित पाठवत असतात, मी ती सारी माहिती आवर्जून वाचत असतो, एवढेच सांगतो मित्रांनो, विश्वासाने ज्याच्यावर हे राज्य सोपवावे आणि प्रगतीच्या शिखरावर ज्याने आम्हाला आणून बसवावे असा हा कसलेला तगडा मुख्यमंत्री पण पुन्हा तेच, दर दिवशी अगदी तोंडाला फेस येईपर्यंत त्या एकनाथ शिंदे पद्धतीने राब राब राबणे, प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने अति कष्ट जसे आज एकनाथजींच्या बऱ्यापैकी अंगलट आले आले आहेत, फडणवीसांनी देखील नेमके कुठे थांबून आवश्यक तेवढा आराम कसा घ्यायचा हे ठरविणे गरजेचे आहे, कारण भक्त आजारी पडला तर त्याचा देव त्याच्या पाठीशी उभा असतो पण देवच जर आजारी पडला तर भक्ताच्या हाती त्याला बरे करणे नसते, मिस्टर फडणवीस जरा दमाने घ्या, तुमच्या करोडो फॉलोअर्सला तुमचे प्रकृती अस्वास्थ्य अजिबात आवडणारे आणि परवडणारे नाही, ये चलेगा नही !! शरद पवार पद्धतीच्या एखाद्या दुसऱ्या मुख्यमंत्र्याची जातीय समीकरणातून आणि राज्यकारभाराची परिपूर्ण माहिती त्यातून जशी त्यांची शासन प्रशासन आणि मंत्र्यांवर पकड असायची त्या पलीकडे कित्येक पावले पुढे फडणवीस पण जातपात त्यांना दूरदूरपर्यंत महत्वाची नाही, आहे तो प्रशासन हाकण्याचा गाढा अभ्यास आणि मोठा अनुभव त्यामुळे त्यांचे मंत्र्यांच्या कामगिरीवर अतिशय बारीक लक्ष असते त्यातून ज्यांना उगाचच डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीच्या भूमिकेत तरीही शिरायचे असते त्यांना ते त्या क्षणापुरते नक्कीच छान वाटेल पण फडणवीसांची काठी बसू नये असे ज्याला वाटते त्यातल्या सत्ते जवळ असलेल्या एकानेही भ्रष्टाचाराच्या मर्यादा चुकूनही ओलांडू नये असे माझे त्या साऱ्यांना हात जोडून सांगणे आहे….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी