विजय वडेट्टीवार तोंडात शेणखत,
ते बोलणे ते बरळणे बेवड्यागत :
शासनाच्या जागा बळकावून त्यावर नावापुरते धर्मार्थ इस्पितळे उभारायची जेथे गरिबांचे भले नाहीच पण येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या आवाक्याबाहेर लुटून लुबाडून अनेक डॉक्टर्स आणि आपल्या कुटुंबियांच्या श्रीमंतीत भर घालायची, सरकारी जमिनी फुकटात लाटणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले विशेषतः मुंबई पुणे पद्धतीच्या महानगरातले सारेच्या सारे इस्पितळे, अनेक तरुणी लग्नापूर्वी दिवस गेल्यानंतर गर्भपात करवून घेतात पण जिचे पोट दिसते ती बदनाम होते तसे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळाचे झाले, वास्तविक सारेच्या सारेच तेथे दाखल होणाऱ्या रोग्यांना लुटणारे लुबाडणारे आणि फसविणारे महान मंगेशकर प्रकरण उजेडात आले पण इतर सारे त्याच नीच हलकट वृत्तीचे एखादाच त्यातून देवेंद्र फडणवीस जन्माला येतो जो त्याच्या नागपुरातल्या भव्यदिव्य कर्करोग इस्पितळातून गरजूंची गरिबांची मनोभावे सेवा करतो त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक धर्मार्थ इस्पितळावर सरकारने न जुमानता अंकुश राखणे त्यांना सरळ करणे कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्याकडून गोरगरिबांची सेवा करवून घेणे अत्यावश्यक आहे. ज्या विजय वडेट्टीवार यांच्या लुटारू वृत्तीचे तयातून जमविलेल्या अमाप संपत्तीचे माझ्या सारखे त्यांचे सहकारी गजानन गिरी किंवा नारायण राणे पद्धतीचे कितीतरी साक्षीदार आहेत किंबहुना दिवंगत बाळू धानोरकर माझा एकेकाळचा जिवलग मित्र जेव्हा याच विजय वडेट्टीवार यांच्या काळ्या संपत्तीचे किस्से जेव्हा मला सांगायचा, वेळ कसा निघून जायचा कळायचे नाही अर्थात आमच्या हातात दातओठ खाण्यापलीकडे फारसे काही नसते वास्तविक देवेंद्र फडणवीसांनी कुठलीही दयामाया न दाखविता या उथळ लबाड व डाकू वृत्रीच्या नेत्याला त्याची जागा अनिल देशमुख पद्धतीने दाखविण्याची नितांत गरज आहे, दुर्दैवाने ते का घडत नाही, मनाला पडलेले ते एक कोडे आहे असते…
www.vikrantjoshi.com
एवढा मोठा हा काँग्रेसचा नेता केवढा अक्कलशून्य म्हणजे दूरदूरपर्यंत ज्या लता आशा हृदयनाथ यांचा ज्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळातल्या यापद्धतीच्या बेधुंद कारभारशी अजिबात संबंध नसताना अतिशय खालच्या पातळीवर तोंडात विष्ठा ठेवल्यागत ज्या पद्धतीने अलीकडे वडेट्टीवार यांनी तोंडसुख घेतले, काळ्या कमाईतून नवश्रीमंत झालेले तानाजी सावंत विजय वडेट्टीवार पद्धतीचे नेते किती व कशी अतिशय खालची पातळी गाठतात बघून अनेकांना नेमके आणि नक्की हेच वाटत असेल कि वडेट्टीवारांना भर चौकात नागडे करून शंभर माराव्यात आणि एक मोजावी त्यांच्या ढुंगणावर जागोजाग वळ उमटवावेत. वडेट्टीवार जसा तुमच्या दत्तक घेतलेल्या मुलात तुमचे जीन्स नाहीत नेमके तसे महान लता आशा हृदयनाथ यांचे त्या मंगेशकर इस्पितळाच्या हिशेबात व्यवहारात देखभालीत अजिबात संबंध नसताना तुम्ही त्यांच्यावर ज्यापद्धतीने तोंडात शेणखत ठेवून त्यांच्यावर खालच्या पातळीवर येऊन टीका केली, जगभरातले त्यांचे चाहते नक्कीच तुमच्या ते त्यादिवशी तोंडावर जणू थुंकले. कसले हे मंगेशकर कुटुंब. हि लुटारूंची टोळी आहे हे असे बोलणे बरळणे तेही तुमच्यासारख्या लबाड आणि डाकू वृत्तीच्या नेत्याने बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे किंवा पैसे घेऊन नाचणार्या एखाद्या बारबालेने हेमामालिनीच्या नृत्य कलेवर टीका करण्यासारखे. कलासक्त आणि जगाच्या दुख्खाचे आपल्या गाण्यांमधून निराकरण करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाचा तुम्ही त्या नकळत घडलेल्या केवळ एका चुकीतून दानधर्म काढून एखाद्या गावठी ढोसलेल्या माणसासारखे टीका करून मोकळे झालात, त्याआधी पाप कमाईतून श्रीमंत होणारे आपले नवश्रीमंत नेतृत्व कसे दिशाभूल करणारे आहे याचा साधा विचार देखील तुमच्या मनाला शिवलेला दिसत नाही. या कलियुगात एखादी वेश्या कशी काय कुलीन स्त्रीचे चारित्र्य काय असा सवाल करू शकते ? वडेट्टीवार तुम्हाला निदान जनाची नाही पण मनाची काही लाज असेल तर तुम्ही तुमचे शब्द मागे घेत त्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा मोदी तुमच्यासारख्या काळाकुट्ट डाकू पद्धतीचा आर्थिक भूतकाळ असलेल्या बिलंदर बदमाश नेत्याला सहजासहजी सोडतील दूरदूरपर्यंत वाटत नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी