सरकार पडेल कि तरेल : स्फोट नव्हे गौप्य्स्फोट :
कितीतरी घरातून आपण बघतो स्वतः अनुभवतो कि बायको वस्तू फेकून मारते आणि दरवेळी फेकून मारलेल्या वस्तूला नवरा मोठ्या खुबीने युक्तीने चुकवतो, शरद पवार उद्धव ठाकरे पद्धतीचे यादिवसातले कुचकामी विरोधक हे असेच घराघरातून आढळणाऱ्या बायको/ बायकांसारखे, दररोज न चुकता हे विरोधक काहीतरी शोधून काढतात आणि फडणवीसांवर फेकून मारतात दरवेळी फडणवीस देखील विरोधकांचे आरोप चुकवतात किंवा अनेकदा त्यांकडे दुर्लक्ष करतात हसण्यावारी नेतात, चालायचेच, हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार, आदळआपट करण्यापलीकडे महायुतीच्या विरोधकांकडे हाती काहीच न उरल्याने त्यांची हि अशी कोल्हेकुई महायुतीला सहन करावी लागते. अलीकडे मी देशा बाहेर असताना एका बड्या मराठी वाहिनीच्या प्रतिनिधींचा मला फोन आला, पुढल्या काही दिवसात सरकार पडते आहे नेमकी आकडेवारी देत आम्ही त्यावर पुढला स्पेशल रिपोर्ट करतोय तो म्हणाला, त्याने काही मुद्दे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला मी फक्त हसलो आणि फोन खाली ठेवला. आता नेमकी वस्तुस्थिती सांगतो आणि ज्या उद्धव आणि पवारांनी या राज्यात कित्येक वर्षे सोने वेचले त्यांच्यावर गौर्या वाचायची आलेली पाळी बघून वाईट वाटले, पोहता न येणाऱ्या व्यक्तीला पाण्यात फेकल्यानंतर तो ज्या पद्धतिने जीव वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो, पवार आणि उद्धव पद्धतीचे फडणवीसांचे विरोधक फारसे वेगळे नाहीत विशेष म्हणजे त्यांना भाजपा महायुती सत्तेत असण्याचे फारसे दुःख नाही मात्र देवेंद्र फडणवीस ज्यापद्धतीने त्यांना दरवेळी पुरून उरले आणि त्यांनी ज्या पद्धतिने या दोघांची सत्ता खोल दरीत फेकून दिली त्याचे त्यांना तीव्र दुःख आहे…
www.vikrantjoshi.com
एकवेळ महायुती सत्तेत असली तरी चालेल पण काहीही करून एकनाथ शिंदे यांना खड्यात गाढा असे उद्धव ठाकरेंचे सांगणे तर फडणवीसांना उंच डोंगरावर नेऊन खोल दरीत फेका हे पवारांचे ज्याला त्याला सांगणे आहे किंबहुना त्यातूनच पुढल्या काही दिवसात पुन्हा सारे पवार त्या अजितदादांसहित एकत्र आणण्याचे प्रयत्न आता आपणहून शरद पवारांनी सुरु केल्याचे माझी नक्की आणि पक्की माहिती आहे. अजितदादांना जवळ घ्यावे त्यांना पुन्हा बिलगावे असे मात्र विशेषतः पवार कुटुंबातील पुढल्या राजकीय महत्वाकांक्षी पिढीला अजिबात वाटत नाही अगदी अजितदादांच्या सख्या भावाला सुद्धा कारण अजितदादा त्यांच्या व्यतिरिक्त सत्तेत इतरांना सामील करून घ्यायला दूरदूरपर्यंत तयार नसतात ते केवळ सभोवताली केंद्रित असतात असे त्यांचे म्हणणे, ज्याला शंभर टक्के अर्थ आहे अर्थात अपवादथकल्या भागल्या शरदरावांच्या लेकीचा सुप्रिया यांचा, त्यांनाही वाटते सारेच पवार एकत्र असावेत आणि यावेत. तिकडे ठाकरेंच्या घरी अधून मधून एक हूल उठत असते कि उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येताहेत, लिहून घ्या, दूरदूरपर्यंत आता हि शक्यता नाही, एखादी म्हातारी कशी नावावर असलेल्या मालमत्तेला चिटकून बसलेली असते त्यातला एकही छदाम प्रसंगी पोटच्या पोरांना देखील काढून देत नाही, उद्धव हुबेहूब त्या म्हातारीसारखेच आहेत त्यांना घेणे तेवढे माहित असल्याने पुन्हा एकदा राज यांनी सत्तेतला हिस्सा काढून देण्याची त्यांची दूर दूर पर्यंत मानसिकता आणि वृत्ती नसल्याने काहीही झाले तरी उद्धव आणि राज कधीच यापुढे एकत्र येणार नाहीत त्यांचे मनोमिलन काही झाल्या होणार नाही…
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवत नाही म्हणायला पवारांनी भाजपा सोडून इतर समस्त राजकीय पक्षांना ज्यांचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना एकत्र आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता ज्याची री त्या मराठी वाहिनीने राज्यात राजकीय खळबळ माजविण्यासाठी ओढली होती पण पवारांचा हा फडणवीसांना आव्हान देणारा प्रयत्न म्हणजे नसबंदी केलेल्या पुरुषाने बायकोला प्रेग्नन्ट करण्यासारखे किंवा एखाद्या कोल्ह्याने थेट सिंहिणीच्या ओठांची पप्पी घेण्यासारखे, पवारांच्या बाबतीत या दिवसातले फडणवीस म्हणजे, पवारजी तुम्ही ज्या शाळेत शिकताहेत त्या शाळेचा मी केव्हाच हेडमास्तर होतो असे थेट आव्हान देण्यासारखे म्हणजे भाजपा विरोधी सारे आमदार एकत्र आणलेत तर संख्या जवळपास 145 होऊन आपण सत्तेत बसून फडणवीसांना घरी पाठवू असा फडणवीस विरोधी लेच्यापेच्या या अशा विश्वास गमावलेल्या नेत्यांचा दावा पण हेच पवार किंवा उद्धव यांना ठाऊक नाही कि एकट्या भाजपाचे संख्याबळ 137 आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे असे त्यांच्या जीवाला जीव देणारे भाजपा व्यतिरिक्त 15 आमदार आहेत जे फडणवीसांना जीव गेला तरी सोडून जाणारे नाहीत, पवार बाबू , जीनके अपने घर शिशेके होते है वो दुसरेके घर पत्थर नहीं मारते…ज्यांना फडणवीस आणि भाजपाला धरून चालायचे आहे त्यांचे नक्कीच राजकीय कल्याण होणार आहे आणि ज्यांना स्वतःचे वाटोळे करून घ्यायचे असेल त्यांनी उद्धव पद्धतीने पवारांचा हात हातात घेत प्रेमगीत गावे आणि हो, जसे उद्धव व राज कधीच एकत्र येणार नाहीत तेच नेमके एकनाथ आणि उद्धवजींचे, पवारांच्या फुसलाव्या स्वभावाचा आता वीट आला आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी