फडणवीसांवर पलटवार,
चमत्कार नव्हे बलात्कार :
अर्थसंकल्प अधिवशेषनानिमित्ते विविध गटा तटातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांच्या भेटीगाठी झाल्या बोलणे झाले, भाजपा वगळता शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी आणि इतरही पक्षातले आमदार काहीसे फडणवीसांवर नाराज असल्याचे जाणवले, पूर्वीसारखे फडणवीस आम्हाला भेटत नाहीत आणि नवख्या किंवा मवाळ वृत्तीच्या आमदारांना बहुसंख्य मंत्री राज्यमंत्री एकतर फारसे ओळखत नाहीत आणि भेटायला गेल्यानंतर आमदारांना अपेक्षित रिस्पॉन्स आणि रिस्पेक्ट ते देत नाहीत, हे तर आता अतीच झाले, फडणवीस शिंदे आणि अजितदादांनी त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना दम देत लगेच सांगायला हवे कि भेटायला येणाऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला आदराची वागणूक आणि त्यांनी सांगितलेल्या योग्य कामांचे तेथल्या तेथे निर्णय घेऊन मोकळे व्हा, अन्यथा न ऐकणार्या मंत्री आणि राज्यमंत्र्यांना ढुंगणावर लाथ घालून हाकलून देण्यात येईल. राहिला प्रश्न फडणवीसांच्या हाडतूड किंवा दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेचा, जर कामाच्या व्यस्ततेमुळे चुकून माकून फडणीसांचे आमदारांकडे दुर्लक्ष होत असेल तसे न घडावे हि त्यांच्याकडून किमान अपेक्षा. आता ऑफ द रेकॉर्ड सांगतो कि शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असतांना विशेषतः फडणवीसांचे म्हणजे राज्यातल्या भाजपाच्या या टॉपमोस्ट नेत्याचे नाही म्हणायला त्यांच्याच हक्काच्या आमदारांकडे याशिवाय भाजपा पदाधिकारी नेते आणि संघ स्वयंसेवकांकडे तसेच संघाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडे भाजपा सत्तेत असूनही सतत काही काळ मोठे दुर्लक्ष झाले ज्यामुळे ते सारेच मनातून रुसले होते आणि आतून अस्वस्थ होते काहीसे सैरभैर देखील झाले होते पण संघ आणि भाजपामध्ये प्रसंगी एखाद्याकडे दुर्लक्ष झाले तरी जाज्वल्य राष्ट्रप्रेमापलीकडे त्यांचे वेगळे असे काहीही नसते, विरोधात जाणे किंवा बंड करणे असले फाल्तुक प्रकार त्यांच्या मनाला देखील दूरदूरपर्यंत शिवत नाहीत पण सत्तेत असूनही आपल्या मंडळींकडे तुमचे दुर्लक्ष होते आहे, थेट फडणवीसांचीच कानउघडणी तेही मोहनराव भागवतांनी केली आणि विधान सभा निवडणुका आटोपल्यानंतर सत्तेत येताच फडणवीसांनी तातडीने भूमिकेत बदल केला आणि पुन्हा एकदा यादिवसात संघ भाजपा स्वयंसेवक व कार्यकार्त्यांना आता बऱ्यापैकी सुगीचे दिवस आले आहेत नेमकी हीच भूमिका पुढल्या काही दिवसात नाराज असलेल्या आमदारांच्या बाबतीत फडणवीस घेतील हे माझ्याकडून येथे लिहून घ्या. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि मुख्यमंत्री या नात्याने त्यांना बरेचसे बिघडलेले वातावरण ताळ्यावर आणायचे होते, सत्तेसभोवतालचे सारेच्या सारे बेधुंद उन्मत्त होत केवळ पैसे ओरबाडण्यात लुटण्या लुबाडण्यात पटाईत व सराईत झाले होते त्यांना वेसण घालणे शिस्त लावणे वठणीवर आणणे गरजेचे होते आवश्यक होते तेही फडणवीसांनी तातडीने केले, आता ते रिलॅक्स आहेत नक्कीच अस्वस्थ आमदारांना भेटून त्यांच्या कामांचा निपटारा करतील आणि तुम्हाला तर ते माहीतच आहे कि त्यांच्याकडे सार्वजनिक काम घेऊन येणारा आमदार कोणत्या पक्षाचा हे त्यांना कधीही महत्वाचे नसते, निर्णय घेऊन ते मोकळे होतात. आता थेट फडणवीसांना एक उदाहरण सांगतो, त्यांच्या ओळखीचा पत्रकार यदु जोशी जेव्हा आमची आई गेली तेव्हा केवळ दीड वर्षांचा होता अशावेळी त्याला आमच्याकडे काम करणारी तान्ह्या पोराची आई एक कामवाली बाई होती, मधूनच ती आपल्या बाळाला बाजूला ठेवून यदूला पण पाजायला घ्यायची, मिस्टर फडणवीस तुम्हाला भाजपा व्यतिरिक्त आमदारांच्या बाबतीत नेमकी त्या मोठ्या मनाच्या दूध पाजणाऱ्या बाईची भूमिका नक्की यावेळीही घ्यायची आहे, साऱ्यांनाच तुम्ही आळीपाळीने प्रेमाने जवळ घेत चला…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी