काँग्रेसचे वाजले कि बारा,
कालचा गोंधळ होता बरा :
राज्यातली काँग्रेस सत्तेत नाही, पुन्हा सत्तेत येईल असे दूरदूरपर्यंत वाटत दिसत नसल्याने प्रत्येक राजकीय पक्षाला फन्ड्स देणारा जो एक वर्ग असतो तो त्यामुळे त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही, मुंबईतले काँग्रेस मुख्यालय चालविण्यासाठी अगदीच काटकसर केली तरीही महिन्याला पंचवीस लाख रुपये लागतात पण सत्तेतून पायउतार झाल्यापासून ज्यांनी काँग्रेसच्या भरंवशावर अमापसमाप कमविले त्यांच्याकडे मागायला जावे तर ते घरात लपून बसतात किंवा मागणाऱ्यांना साहेब घरात नाहीत सांगून आल्या पावली परत पाठविल्या जाते, जे आत्ता आता पर्यंत सत्तेत होते राज्यात आमदार खासदार नामदार होते ते देखील एकजात खिसे उपडे करून दाखवतात वरून कर्जाचे आकडे फुगवून सांगतात आणि चक्क ढसाढसा रडायला लागतात, किमान नाना पटोले अध्यक्ष असेपर्यंत ते महिन्याला इकडून तिकडून कसेही करून जमा करून आणायचे पण त्यांचीही अवस्था संध्याकाळी मोळी विकून आल्यानंतर चिल्यापिल्यांना दाणापाणी घालणार्या विधवा स्त्रीसारखी काँग्रेसने करून ठेवली होती, खरे खोटे देव आणि तो देवेंद्र जाणो पण असे म्हणतात कि अनेकदा मग नाना काँग्रेसचा खर्च भागविण्यासाठी आपला सखा देवेंद्रकडे पदर पसरायचे तेव्हा कुठे कसेतरी भागायचे, आता तर पहिल्या दिवसापासूनच काखा वर करून चालणार्या नवख्या संपत्तीअपंग ज्याला त्याच्या वाड्याबाहेरही फारशी ओळख नाही त्या कानाकोपऱ्यातल्या बंटीदादाला काँग्रेसने आणून बसविले आहे, हे तर असे झाले कि माझा विटाळ गेला आहे सांगून लग्न करणार्या स्त्रीसारखी सपकाळांची अवस्था तरीही काँग्रेसन त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षाची माळ घातली आहे आणि त्यांनीही विशेष म्हणजे घालून घेतली आहे जणू एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आहे, आनंद घेण्याचा उपयोग शून्य….
www.vikrantjoshi.com
राजकारणात उगवत्या सूर्याला सारेच नमस्कार करणारे असतात, नपुसंक पुरुषाचा सहवास जसा नकोसा होतो तेच काँग्रेसचे झाले म्हणजे राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळावर मी नजर फिरवीत असतांना माझ्या असे लक्षात आले कि विठ्ठलराव गाडगीळ आणि पी चिदंबरन यांची मुले सोडल्यास आज त्यातली एकही पुढली पिढी काँग्रेसकडे उरलेली नाही, साऱ्यांनी स्वतःचा ज्योतिरादित्य माधवराव शिंदीया करवून घेतला आहे, विशेष म्हणजे ज्यांना काँग्रेस चालविण्याचा प्रचंड अनुभव आहे त्या साऱ्यांचा राहुल गांधी यांनी अक्षरश: घरगडी करून ठेवला आहे जो तो मान खाली घालून त्या पृथ्वीराजबाबासारखा काँग्रेसमधला आजचा भगवानदादा झाला आहे. ऑफ द रेकॉर्ड सांगतो कि जेव्हा प्रणिती आणि राहुल यांच्या लग्नाची हूल भारतभर उठली तेव्हा म्हणे सुशीलकुमार आपल्या लाडक्या लेकीला म्हणाले, पोरी तू भलेही आणखी दाह वर्षे लग्न करू नको किंवा हयातभर अविवाहित राहा पण काहीही झाले तरी माकडाच्या हाती कोलीत देऊ नको, बेटा जिथे तो राहुल त्या खर्गे यांना शाळेत जशी कान धरून ढुंगण वर करून उभे राहण्याची शिक्षा गुरुजी द्यायचे तेच तो उद्या माझा देखील खर्गे करून मोकळा होईल, तेव्हा कुठे प्रणिती राहुल समोर जरी दिसला तरी धूम ठोकून एखाद्या भिंतीआड लपून बसायची. महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेसच्या बजुर्ग नेत्याला विश्वासात घेत राहुल गांधी विषय त्याच्यासमोर काढा, आधी तो ढसाढसा रडायला लागतो त्यानंतर पिलेला असेल तर शिव्यांची लाखोली वाहात मी आता त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वाट पाहतोय हेच सांगतो. राज्यातले हिंदू विशेषतः अतिशय प्रभावी मराठा नेते केव्हाच काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत, फारच थोडे शिल्लक आहेत ज्यांना शंभर म्हशींमध्ये एक रेडा म्हणून चिडविल्या जाते, दलित आणि मुस्लिम काँग्रेसच्या हक्काचे होते त्यांनी देखील काँग्रेसला तलाक दिला आहे, एक गौप्य्स्फोट करतो, शरद पवारांनी पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून किमान राज्याची सूत्रे हाती घ्यावीत असा त्यांच्याकडे काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरला आहे, स्वतः शरद पवार देखील बाशिंग बांधून तयार आहेत पण त्यांचीही ती अट कि मी येड्या राहुलला डोक्यवर बसवून घेणार नाही, बघूया सोयरीक जमते कि काँग्रेस आता हयातभर विधवा म्हणूनच जगणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी