एकदाचे ठरले बंटीचे जमले,
अखेर गंगेत घोडे न्हाले :
मी जे महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितले होते कि ज्याला विचारावे तो नकार देतो, सारेच उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात, डुबती नय्याचा नाविक व्हायला एकही तयार होत नव्हता शेवटी जबरदस्तीने का होईना बुलढाण्याचे माजी आमदार बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात एकदाची काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली. वयाने आणि शरीराने धोड झालेल्या सरपंचाच्या पोरीला जर नवरा मिळत नसेल तर सरपंच त्याच्याकडे सालदार म्हणून काम करणाऱ्याला घरजावई करून घेतो. अगदीच कुंवारी म्हणून काय जगायचे त्यापेक्षा एखाद्याच्या गळ्यात वरमाला टाकून मोकळे व्हायचे तसे प्रदेश काँग्रेसचे झाले कारण ज्याला विचारावे तो पळ काढायचा नकार द्यायचा तोंड लपवत फिरायचा, विश्वजित कदमांसारख्या तरुणांपासून तर सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात किंवा जक्खड वृद्ध पृथ्वीराज चव्हाण पर्यंत अनेकांना आग्रहाने विचारण्यात आले अगदी बाथरूम मध्ये देखील जातांना काठी टेकत जाणार्या पुण्याच्या उल्हास पवारांकडे देखील काँग्रेसने आशाळभूत नजर टाकायला कमी केली नाही शेवटी एकदाचा बंटी सपकाळांनी होकार दिला. एका नटीने लग्न केले तिला नवऱ्यापासून मुलबाळ झाले नाही तो दररोज पाठ करून पुढल्या क्षणी ढाराढूर झोपायचा म्हणून तिने पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन दुसरा निवडला लग्न केले पण त्यानेही त्याकाळी शंभर रुपयांसाठी नसबंदी करून घेतली होती,तसे या काँग्रेसचे झाले म्हणजे नवख्या बंटी पाटलांपेक्षा अनुभवी आणि सतत चर्चेत राहणारे नाना पटोले मध्ये काय कमी होती ? वाईट याचे वाटते कि यादिवसात काँग्रेसची थेट सिल्क स्मिता झाली, उरले सुरले नेतेही आता तिला स्वीकारायला तयार नाहीत…
www.vikrantjoshi.com
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात नेत्यांमध्ये विविधता अभावाने आढळते, हर्षवर्धन सपकाळ त्याला अपवाद आहे, सामाजिक कार्य असो अथवा सांस्कृतिक चळवळ किंवा शेती किंवा राजकारण अगदी वेगळ्या ढंगाच्या बांधलेल्या बंगल्यापासून तर सातत्याने 35 वर्षे बाबा आमटे यांच्या कुटुंबसंगे आदिवासी भागात न थकता न थांबता सामाजिक कार्यातही झोकून देणारा हा नेता बुलढाण्यासारख्या आडवळणाच्या जिल्ह्यात शहरात राहूनही आपले वेगळेपण जपतो, वेगळ्या ढंगाने, मिळविलेल्या पैशांचा विनियोग करतो. वयाने सर्वाधिक लहान असणारा हा एकेकाळचा जिल्हा परिषद अध्यक्ष, खिसे उपडे करून चालणार्या प्रदेश काँग्रेसचा खर्च किंवा कार्यालयीन पगार देखील कोठून आणेल हीच नेमकी नेत्यांना भेडसावणारी चिंता, नानाभाऊ याच्या त्याच्या खिशात हात टाकून कसातरी खर्च भागवायचे, सपकाळांकडे चालून आलेले प्रदेशाध्यक्षपद म्हणजे सरपंचाकडून दिवस गेलेल्या तरुणीशी सरपंचाने आपल्याकडे सालदार असलेल्या मजुराशी लग्न लावून देण्यासारखे. त्यात सध्याच्या अति बलाढ्य महायुतीसमोर टिकाव धरणे तेही साधी आमदारकीही नसतांना म्हणजे एखाद्या मुंगीला कुस्ती खेळण्यासाठी विशाखा सुभेदारांच्या अंगावर सोडण्यासारखे. एकेकाळी प्रदेशाध्यक्ष होण्या काँग्रेसमध्ये मोठी चुरस असायची, आज काय ती अवस्था, जो तो तोंड लपवून नकार द्यायचा, शेवटी जरी जबरदस्तीने सपकाळांच्या तोंडात साखर कोंबल्या गेलेली असली तरी ती त्यांना कडू नक्कीच लागणार नाही, यालाच जबरदस्तीका रामराम म्हणतात…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी