देवेन्द्रजी ऑन मिशन, अब नो कमिशन :
उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग, अशी आजच्या उथळ चंचल बहुतांश मीडियाची अवस्था आहे किंवा उचलली जीभ लावली टाळूला हि म्हण देखील त्यांनाच लागू पडते, आजची उथळ मीडिया लिहून बोलून मोकळी होते खरी पण त्या दिशाहीन लिहिण्या बोलण्याचे क्षणिक वाईट परिणाम जरी सत्ताधाऱ्यांना भोगावे लागत असले तरी दूरगामी वाईट परिणाम स्वतः मीडियावर होताहेत नेमकी तीच वस्तुस्थिती आहे म्हणजे केवळ 15 दिवसांपूर्वी फक्त राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी ज्या मीडियाने उदय सामंत हे बहुसंख्य आमदार आणि खासदारांना घेऊन शिंदे सेनेतून बाहेर पडताहेत, वेगळा गट स्थापन करून ते भाजपला पाठिंबा देत थेट रुसलेल्या फुगलेल्या एकनाथ शिंदेना एकटे पाडताहेत, पद्धतीच्या बातम्या पेरून ज्या मीडियाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी सनसनाटी निर्माण केली होती तीच मीडिया आता याक्षणी पूर्णतः तोंडावर पडली आहे कारण ज्या मीडियाने शिंदेंना सोडून सामंतांची थेट भाजपा व फडणवीसांशी कपोकल्पित जवळीक निर्माण करून हे राज्य कुठलीतरी सुपारी घेऊन काहीसे अस्थिर करण्याचे पोरकट प्रयत्न केले आज तीच मीडिया दणकन ढुंगणावर आपटली आहे कारण तेच उदय सामंत थेट पत्रक काढून अप्रत्यक्ष भाजपा आणि फडणवीसांवर तुटून पडले आहेत, आपले अधिकार काढून टाकले हे सुचवत त्यांनी मीडियासमोर येत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे…
www.vikrantjoshi.com
थोडक्यात अलीकडे मी जे सांगितले तेच नेमके घडले आहे, यावेळेचे मुख्यमंत्री नात्याने फडणवीस पूर्णतः बदललेले तुम्हाला पाहायला मिळतील हे जे मी म्हणालो तेच घडण्या सुरुवात झाली आहे, फडणवीसांनी तशी सुरुवातच केली आहे. राष्ट्रात सर्वाधिक भ्रष्ट महाराष्ट्र लागलेला हा काळिमा पुसून टाकण्याचा त्यांनी संकल्प नक्की सोडला आहे आणि कुठल्याही विरोधाला न जुमानता देशाचे नेतृत्व करण्या निघून जाण्यापूर्वी जे मोदींनी गुजराथमध्ये घडवून आणत त्यानंतर दिल्लीला प्रयाण केले होते तेच डिट्टो मोदी फडणवीस करणार आहेत करून दाखवणार आहेत त्यामुळे जर मीडिया म्हणाली त्यापद्धतीने सामंत हे भाजपा व फडणवीसांच्या गळाला लागलेले असते तर सामंत नाराज होणार नाहीत याची नेमकी व नक्की काळजी फडणवीसांनी घेतली असती पण तसे घडले नाही, खोटारडी व उथळ मीडिया पूर्णतः नेहमीप्रमाणे तोंडावर पडलेली आहे. उदय सामंत यांना येथे मला कोणताही दोष द्यायचा नाही तर त्यांना सावध यासाठी करायचे आहे कि फडणवीसांना यावेळी मंत्री आणि प्रशासनावर वचक निर्माण करून भ्रष्टाचाराचा ग्राफ वेगाने खाली आणायचा असल्याने विशेषतः संपूर्ण महत्वाच्या निर्णयांवर मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी विशेषतः त्या त्या खात्याचे सचिव परस्पर निर्णय घेत जो मोठा हात मारून मोकळे व्हायचे ते ह्यापुढे काहीही झाले तरी फडणवीस खपवून घेणार नसल्याने त्यांनीच तशा सूचना विविध खात्यांना दिल्या आहेत, मला कोणाचाही अवमान करायचा नाही, अधिकार हिरावून घ्यायचे नाहीत मात्र मुख्यमंत्री या नात्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेतांना ते निर्णय त्या संबंधीच्या नस्त्या फाईल्स माझ्या नजरेखालुनच जायला हव्यात या त्या सूचना मात्र उदय सामंत यांनी नाराज होत, माझ्या परस्पर शासन निर्णय घेऊन मोकळे होते आहे, मला विचारले जात नाही असे पत्रक काढले आहे किंबहुना उद्या असेच पत्रक अनेक मंत्री काढून मोकळे होतील कदाचित पण याआधी प्रशासकीय व शासकीय अधिकारी आणि त्या त्या खात्याचे मंत्री प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून जो धुडगूस घालायचे त्यावर नियंत्रण आणि वचक ठेवण्या फडणवीसांनी उचललेले हे कडक पाऊल आहे त्यात वावगे असे काही नाही, सरकार बदलते आहे हेच फडणवीसांना त्यातून सिद्ध करायचे आहे, सुरुवातिला सामंत पद्धतीने अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यातल्या अनेकांना मोठा आर्थिक फटका बसल्याने नक्की वाईट वाटेल, राग येईल पण दूरगामी विचार करता, मिस्टर सामंत, फडणवीसांचे हे बदललेले वागणे आज तुम्हाला त्याचे वाईट वाटेल पण दूरचा विचार केल्यास तुमच्यासारख्या प्रचंड ताकदीच्या नेत्यांना पुढे दीर्घकाळ सत्तेत टिकून राहण्यासाठी हेडमास्तर फडणवीसच उपयोगाचे नक्की ठरणार आहेत, माझे वाक्य लिहून ठेवा…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी