अखेर तानाजी धारातीर्थ पडला :
भगवत गीता वाचली का तानाजी, जे जे या राज्यातले हे असे आधुनिक लुटारू तानाजी आहेत, त्यांनी निदान भगवत गीता आधी वाचावी आजपासून त्यातल्या विचारांचे अनुकरण करावे म्हणजे सत्तेसभोवताली गेल्या 30-40 वर्षात ज्यांनी प्रचंड धुडगूस घालून कळत नकळत सतत हे राज्य लुटले लुबाडले नागडे करून सोडले आहे त्या तानाजी सावंत विचारांच्या त्या पद्धतीने वागणाऱ्या समस्त डाकुंनी ताळ्यावर यावे, आज केवळ तानाजीला त्यांच्या मुलाने जाहीर उघडे नागडे केले, तानाजीचे नागडे रूप नेमके विदारक सत्य उजेडात आले इतरांचे ते रूप अद्याप या समाजाला समजलेले नाही एवढाच काय तो तानाजी आणि इतरांमध्ये फरक. तानाजी तुम्ही मुलाचे नाव तेवढे ऋषी ठेवले पण त्याच्यावर संस्कार मात्र सतत लुटण्याचा लुबाडण्याचे झाले, बापाला काळ्या कमाईतून फुरसत नाही आणि घरात तर दरक्षणी खोऱ्याने पैसा येतो आहे, एवढ्या पैशांचे करायचे तरी काय त्यात वास्तव्याला बिघडलेल्या ऐय्याशी पुण्यात, ऋषीने आज अचानक बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतलेला नाही फक्त यावेळी त्याचे घरी वाद झाले आणि तो न सांगता घरातून निघून गेल्याने पापी बाप अस्वस्थ झाला किंवा पहिल्यांदा त्याच्यातला बाप जागा झाला तानाजी नाव असूनही एरवी अतिप्रचंड उद्धट उर्मट असलेल्या केवळ नावात तानाजी असलेल्या या बेधुंद बापाच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले, कधी नव्हे ते आज पहिल्यांदा रडव्या चेहऱ्याने त्याला तेही अगदी जाहीर पोलिसांसमोर तोंड उघडावे लागले, बिघडलेल्या पोराचे सत्य सांगावेच लागले, सांगतो ना तेवढा तानाजी आज नागडा झाला पण घरोघरी मातीच्या चुली, ज्या ज्या घरातून सत्तेच्या माध्यमातून लुटून आणलेला भरमसाठ पैसा येतो त्या साऱ्याच कुटुंबात फारसे काहीही वेगळे घडत नाही, काहींच्या पुढल्या पिढीत मुलबाळ नाही, काहींची मुले सतत ड्रग्सच्या अमलाखाली असतात, काहींच्या घरात बाप पैसा आणतो आणि त्यांची मुले ऋषिराज पद्धतीने देशात परदेशात जाऊन हे पैसे लुटून घरी येतात. हाच तो तानाजी गेली कित्येक वर्षे शिक्षण सम्राट आज नेतागिरीच्या भरवंशावर दहशत निर्माण करून राज्याला सतत लुटतो आहे त्यातला थोडा हिस्सा मतदारांवर लुटून आमदार नामदार होतो आहे. माझे हात दगडाखाली आहेत अन्यथा या तानाजीने आरोग्यमंत्री या नात्याने जो धुडघूस घातला होता ते बघून त्याच्याच तोडीचा त्याचा त्यावेळचा खाजगी सचिव कृष्णा जाधव देखील अचंबित होत होता. समजा ऋषिराज घरातून रागावून प्रयागला गेला असता तर तानाजीने किमान पोटच्या पोरांना उत्तम संस्कार दिले आपण म्हटले असते पण हे महाशय केवळ काहीच दिवस आधी दुबईला जाऊन लुटून आले होते म्हणून त्याला बँकॉकला न जाण्याचे सांगण्यात आले त्यातून घरी न सांगता नेहमीप्रमाणे खाजगी विमान भाड्याने घेत हे महाशय भूक भागविण्यासाठी बापाची जिरवण्यासाठी बँकॉकला पैसे घेऊन उधळण्या निघाले, ऋषिराजला कुठेही जाऊन रंग उधळण्यात मनाई नाही पण त्याने एकट्याने जाऊ नये याची काळजी एरवी बेरकी आणि बदमाश तानाजीला लागून राहिलेली असते म्हणून तानाजी न सांगता निघालेल्या ऋषिराजच्या काळजीत पडला. तानाजीचे घर आणि त्यांची हि अशी मुले त्यावर आणखीही लिहिता येईल पण तुम्ही देखील तानाजी आहात का तेवढे तपासून घ्या आणि असाल तर स्वतःमध्ये तातडीने बदल करा, देव नक्की मदतीला धावतो…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी