चंदू नव्हे अनिल थत्ते ठार येडा,
टळो पत्रकारितेतली इडा पीडा :
अगदी अलीकडे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपण खर्या अर्थाने ठार वेडे होतो आता अधिक झालो आहोत हे त्यांच्या एका व्हिडिओतून पुन्हा एकवार सिद्ध केले आहे. ‘ येडा चंदू ( चंद्रकांत पाटील )आणि खुळा दादू ( उद्धव ठाकरे ) यांची युतीतली प्रीती…कुणाला भीती ? ‘ असा मथळा देत त्यांनी सोशल मीडियावर तद्दन भरकटलेला व्हिडीओ टाकून स्वतःच्या उत्तम बुद्धीची कशी उभ्या आयुष्यात किंवा आयुष्यभर माती करवून घेतली हे त्यांनी पुन्हा एकदा जणू सांगून टाकले आहे. या व्हिडिओच्या अनुषंगाने मला तुम्हाला आठवण करून द्यायची अशी कि ब्राम्हण जात, हिंदुत्व आणि हिंदूंच्या असंख्य जाती पोटजाती त्यावर जर एखाद्याने खालच्या पातळीवर येऊन टीका केली, भलेही समोरचा कितीही बलाढ्य असला तरीही माझी क्षणार्धात सटकते आणि मी या अशा खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांवर तुटून पडतो. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अनिल थत्ते यांनी या व्हिडिओतून चक्क ताटाखालचे मांजर म्हटले आहे, अनिलजी आता तुम्हाला जर बदनामीच्या खटल्यातून स्वतःची सुटका करवून घ्यायची असेल तर बावनकुळे नेमके कोणाच्या ताटाखालचे मांजर आहे हे सिद्ध करावे लागणार आहे जर भारतीय जनता पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांची किंवा रा स्व संघांची शिस्त आणि सूचना पाळण्यात ते आनंद मानत असतील तर त्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना ताटाखालचे मांजर ठरवून तुम्ही बावनकुळेंना अपमानित केले आहे वरून तुम्ही त्यांच्या तेली जातीचा देखील फार मोठा अपमान केला आहे, आगीत तेल ओतणारे ते तेली, तेली तेल ओतायला जातात, अशी तुम्ही भारतातल्या समस्त तेली समाजावर खालच्या पातळीवर येऊन जाहीर टीका केली आहे. बीडचे संदीप किंवा जयदत्त क्षिरसागर, रामदास तडस, चंद्रशेखर बावनकुळे आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्धतीच्या तेली समाजाच्या ताकदवान देशसेवक समाजसेवक नेत्यांनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत कि तुमच्यासारख्या एका ब्राम्हण पत्रकाराने त्यांच्या तेली समाजाला आगीत तेल ओतणारे ते तेली असे जाहीर संबोधून त्यांना जगासमोर अपमानित करावे, थेट पंतप्रधानाच्या जातीचा अपमानास्पद उल्लेख करून तुम्ही त्यांचा आणि त्यांचे नेतृत्व मानणार्या प्रत्येकाचा अपमान केला आहे अर्थात अनिल थत्ते तुम्ही कसे नंबर एकचे फट्टू आहात मला ते चांगले ठाऊक असल्याने माझा हा शोध तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही जर तो व्हिडीओ गायब केला तर त्यात मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, तुम्ही तडकाफडकी तेली समाजाची जाहीर माफी मागावी…
www.vikrantjoshi.com
मीडियातल्या प्रत्येकाला मला हेच सांगायचे आहे कि टीका भूमिकेवर असावी, अमुक एखाद्याने आर्थिक मदत केली नाही आपले काळ्या कमाईचे काम केले नाही कि लगेच त्याला बोलण्यातून किंवा लिखाणातून अनिल थत्ते पद्धतीने झोडायचे नसते, चंद्रकांत पाटील किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आर्थिक दृष्ट्या कदाचित दाद न दिल्याने थत्ते यांची सटकली त्यातून ते जेथे संधी मिळते तेथे उगाच या पद्धतीच्या नेत्यांवर घसरून मोकळे होतात हा त्यांचा इतिहास मला तोंडपाठ आहे किंबहुना चंद्रकांत पाटलांनी याच अनिल थत्ते यांना फडणवीसांवर टीका करण्याची सुपारी न दिल्याने त्यांना आणि थत्तेंना घेऊन आलेल्या भाजपाच्या एका मीडियाशी संबंधित असणसर्या दलालाला आपल्या बंगल्यातून बाहेर काढल्याने तेव्हापासून अनिल थत्ते उगाचच चंद्रकांतदादांवर अनेकदा खालच्या पातळीवर टीका करतात, आता तर त्यांनी या व्हिडिओतून कहर केला आहे, भाजपाच्या या अतिशय चाणाक्ष अभ्यासू बुद्धिमान नेत्याला मंत्र्याला उत्तम संघटन कौशल्यातून भाजपाची राज्यात भक्कम बांधणी केलेल्या नेत्याला, पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून तेही बाहेरून येऊन सतत दोन वेळा विधानसभा जिंकणार्या चंद्रकांतदादांना अनिल थत्ते यांनी एकदा नव्हे तर व्हिडिओतून अनेकदा येडा खुळा संबोधून त्यांचा धडधडीत अपमान केला आहे. रावसाहेब दानवे अनिल थत्ते यांना चंद्रकांत पाटील येडा आहे येड्याचा बाजार आहे असे म्हणाले हेही थत्तेंनी सांगून टाकले आहे जे धडधडीत असत्य तद्दन खोटे आहे, मिस्टर थत्ते जर दानवे पाटलांना येड्याचा बाजार म्हणाले असतील हे सिद्ध करा, अन्यथा दानवे यांनी पातळी सोडली आहे हे सिद्ध होते ज्याचा फटका त्यांना बसू शकतो…
आता अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा, ज्याचा मी एक साक्षीदार आहे. 29 जानेवारीला सांताक्रूझच्या सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेल मध्ये आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता त्याला मी स्वतः विक्रांत आणि विद्युत मंडळाचे संचालक भाजपा नेते विश्वास पाठक एकत्र अगदी ठरवून गेलो होतो, आम्ही जेव्हा स्टेजवर शुभेच्छा द्यायला गेलो नेमके त्याचवेळी उद्धव ठाकरे देखील स्टेजवर आले पुरावा म्हणजे आमचे एकत्र फोटो देखील आले, उद्धव बाहेर पडत असतांना त्यांना समोरून चालत येणारे चंद्रकांत पाटील भेटले जे बोलण्यात कमालीचे मिश्किल म्हणूनच ओळखले जातात त्यांनी गमतीने उद्धवजींना विचारले, आपली पुन्हा युती कधी त्यावर दोघेही दिलखुलास हसले आणि आपापल्या मार्गाने निघाले विशेष म्हणजे त्याआधी मला मिलिंद नार्वेकर भेटले, दोन मिनिटे बोलणेही झाले. मीडियाने चंद्रकांतदादा आणि उद्धवजी यांच्या क्षणभर भेटीचा आणि बोलण्याचा काहीही कारण नसतांना विनाकारण विपर्यास केला, बेअक्कल कुठले !! जर त्या दोघांच्या बोलण्यात तथ्य असते तर मी बाजूलाच उभा होतो त्यावर मलाही गौप्य्स्फोट नक्की करता आला असता. केवळ या काही क्षणांच्या भेटीचा संदर्भ घेत अनिल थत्ते यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, ज्यातून अजिबात काहीही साध्य होत नसते. अनिल थत्ते आणि हा व्हिडीओ विषय येथेच संपत नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी