कट्यार मणक्यात घुसली,
भाऊ तोरसेकरांची सटकली :
मुस्लिम आणि अभिनेता सैफ अली खान त्याच्यावर झालेला हल्ला, खरा आरोपी पकडल्या जाईपर्यंत अर्धवट नेत्यांची आणि विविध बेअक्कल मीडियाची वाहिन्यांची भूमिका, पोलीस तपास या अशा सणसणीत विषयावर भलेही अंदर का मामला अजिबात ठाऊक नसतांना बसल्या जागी पत्रकारितेतले भीष्म भाऊ तोरसेकर मूग गिळून बसतील असे कसे होईल ? आणि खरा आरोपी पोलिसांना मिळताच ज्याची मी वाट पहात होतो नेमके तेच घडले, मीडियावर घसरताना त्याचवेळी पोलिसांची ओढून ताणून बाजू घेण्यासाठी काहीही गरज नसतांनाचा भाऊंचा व्हिडीओ बाहेर आला, आधी मी तो संपूर्ण बघितला त्यानंतर एकटाच स्वतःला खोलीत बंद करून स्वतःशी कितीतरी वेळ वेड्यागत हसत सुटलो, कधी नव्हे ती माझी तुलना मग भाऊंशी केली. एकदा मी एका निष्क्रिय नगरसेवकांवर त्याला पुन्हा शिवसनेची उमेदवारी मिळावी म्हणून त्याच्या सांगण्यावरून प्रेमापोटी त्याच्या विकास कामांची बोंबाबोंब असतांना भला मोठा विशेषांक काढला होता, हा अंक घेऊन हा पठ्या जेव्हा बाळासाहेब ठाकरेंकडे गेला, अंक चाळून बाळासाहेब आधी मोठ्यांदा हसले त्यानंतर म्हणाले, त्या हेमंत जोशीसमोर एखादा दगड ठेवून दगडाविषयी त्याला लिहिण्यास सांगितले त्यावर देखील तो विशेषांक काढून मोकळा होईल, भाऊ तोरसेकर तर पत्रकारांचे माझे महागुरू आहेत कदाचित सुतावरून स्वर्ग गाठण्याची त्यांची हि सवय ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी…
www.vikrantjoshi.com
आपल्या या राज्यात जे हिंदुत्व महायुती किंवा देशात मोदी यांची कायम बाजू घेणारे माझ्यासारखे जे मीडियातले आहेत त्यात नक्कीच भाऊ आघाडीवर आहेत किंबहुना मतदारांचे मन परिवर्तन करण्यात त्याचा मोठा फटका राज्यातल्या महाआघाडीला जो बसला ती भाऊंची कामगिरी केव्हाही उत्तम पण जेथे महायुती किंवा भाजपा त्यांच्या नेत्यांचे चुकते तेथे हयगय न करता तेवढ्याच ताकदीने आम्ही फटकारायला देखील हवे जसे मी अलीकडे त्या पुरुषोत्तम खेडेकर विषयावरून थेट नितीन गडकरींनाही सोडले नाही, वास्तविक बोलायला वेगळे विषय मिळाले असते तरीही भाऊंनी ओढूनताणून मीडियाला मुर्खात काढण्यासाठी चुकीची माहिती देत ज्या पद्धतीने सैफ हल्ला आणि आरोपीची धरपकड या विषयावर व्हिडीओ काढला जरी भाऊंचे जगात लाखो फॉलोअर्स असले तरीही त्यांनी असे वेगवेगळे उदाहरणे देत भलतेसलते बोलून आपल्या पत्रकारितेची शान घालवू नये, भाऊ ग्रेट आहेत विषय अनेक आहेत. भाऊ जे म्हणाले कि मीडियाचे लक्ष भलतीकडे वळवून लोकांना गुंतवून ठेवत पोलिसांनी यावेळी नेहमीसारखी भूमिका न घेता नेमक्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, भाऊंच्या या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही कारण हे घडवून आणण्यासाठी पोलीस थेट दुर्गपर्यंत नक्कीच गेले नसते, या अतिशय दगदगीच्या दिवसात त्यांनी दूरवर जात मीडियाला गुंतवून ठेवलेच नसते. या प्रकरणाचे प्रमुख कर्तबगार आयपीएस पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांना मी अतिशय जवळून ओळखतो वरकरणी एरवी शांत संयमी वागणारा वाटणारा हा अधिकारी एवढ्या महत्वाच्या कामगिरीवर असतांना अतिशय सावध असतो, सावजावर वेळ येताच झडप घालतो, पोलिसांनी अजिबातच मीडियाला चकविलेले नाही, पोलीस तपासात नेमके काय घडले पोलीस सरतेशेवटी कसे मूळ आरोपीपर्यंत पोहोचले ते मी तुम्हाला नक्कीच काही दिवसात सांगणार आहे, केवळ तीन नव्हे तर पाच व्यक्तींच्या मागावर पोलीस होते त्यांचा तसा संशय होता त्यापैकी नेमका आरोपी सापडला आणि पोलिसांची शोध मोहीम थांबली…
सैफ आणि करीनाला मी बऱ्यापैकी जवळून ओळखतो, करीनाचे शाळेपासूनचे प्रेमप्रताप त्यातून तिच्यावर ऐन तारुण्यात आल्या आल्या ओढवलेला दुर्धर प्रसंग त्यामुळे प्रेमात वेडी होणाऱ्या करिनाने म्हाताऱ्या सैफशी लग्न केल्यानंतर निदान मला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही किंबहुना पोटच्या मुली वयात आल्यानंतर त्यांना चांगले वाईट जोवर समजत नाही नीट वळण लागत नाही तोवर आईवडिलांनी डोळ्यात तेल घालून त्यांना वाढवावे घडवावे. वास्तविक मी आमच्या व्यवसायावर कधी उघड भाष्य करीत नाही पण येथे तुम्हाला म्हणून सांगतो कि जेथे सैफ राहतो किंवा सैफवर ज्या इमारतीत हल्ला झाला त्याशेजारी दोन तीन इमारती सोडून आमचे कॉफी शॉप होते, जागा लहान पडते म्हणून आम्ही पुढे ते बंद करून दुसरीकडे नेले होते, या शॉप मध्ये लग्नानंतर सैफ आणि करीना नियमित येऊन बसायचे, कॉफी एन्जॉय करायचे, सैफ कायम स्वतःचे आयुष्य आपल्याच मस्तीत जगणारा, त्यामुळे त्याला सलमान पद्धतीने शत्रू असण्याची शक्यता नव्हती, चुकून जर तैमूर नावावरून हे हल्ला प्रकरण घडले असते तर मला वाटते फडणवीसांना यादिवसात डावोसला जाणे नक्कीच रद्द करावे लागले असते, सुदैवाने तसे काहीही नव्हते पण देशातल्या ज्या मुसलमानांनी बांगला देशी खतरनाक दरिद्री मुसलमानांना येथे आणून ठेवले आहे आजही सतत दरदिवशी आणताहेत त्यातल्याच एकाने हे कृत्य केले बरे झाले नेमके सत्य उजेडात आले. यापुढे फडणवीसांनी जे योगी आदित्य पद्धतीने ठरविले आहे मिस्टर जितेंद्र आव्हाड, तेही तुम्हाला सांगतो, पुढल्या वर्षभरात महाराष्ट्रात स्थानिक घातकी व बांगला देशी मुसलमान तुम्हाला औषधालादेखील सापडणार नाहीत…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी