पत्नीचे केले राजकीय वाटोळे,
पुरुषोत्तम खेडेकर आणि घोटाळे :
राज्यातल्या या दिवसात असलेल्या ब्राम्हणांच्या अस्वस्थतेला केवळ नितीन गडकरी हेच पूर्णतः जबाबदार आहेत, समस्त ब्राम्हणांचे संघाच्या गडकरींवर केवळ नितांत प्रेम असल्याने ब्राम्हण मूग गिळून आहेत अन्यथा दुसऱ्या एखाद्या ब्राम्हणाने अशी घोडचूक केली असती तर नक्कीच आतून धुमसणाऱ्या ब्राम्हणांना रस्त्यावर उतरून शिवीगाळ करायला राग व्यक्त करायला वेळ लागला नसता, पण ब्राम्हणांचे आवडते नेते असल्याने गडकरी ब्राम्हणांच्या रोषापासून थोडक्यात बचावले आहेत कारण गडकरींच्या हातून फार मोठी चूक घडली आहे त्यांनी ब्राह्मणद्वेष्ट्या ब्राम्हणांना बदनाम करणाऱ्या ब्राम्हणांना संपवायला निघालेल्या त्यांना अगदी उघड आपल्याकडे असलेल्या टग्या वृत्रीच्या तरुणांकडून दरदिवशी अपमानी करून अतोनात छळणाऱ्या, वेळोवेळी शरद पवारांच्या सूचनेवरून सांगण्यावरून विशेषतः जातियतेचे विष पेरून त्याचा फायदा शरद पवारांना कसा सतत होईल हि भूमिका अगदी उघड राबविणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांचा जाहीर सत्कार स्वहस्ते करून वरून त्यांच्यावर भाषणातून स्तुतीसुमने उधळली आहेत थोडक्यात एखाद्या निलाजऱ्या व्यक्तीने आपल्या आईवर सतत बलात्कार करणार्याचा सार्वजनिक स्थळी पुष्पहार घालून सत्कार करण्यासारखे मोठे पाप नितीन गडकरी यांच्या हातून घडलेले आहे. अलीकडे जे मी या पुरुषोत्तम खेडेकरांविषयी सांगितले तेच नेमके सत्य आहे कि आयुष्याच्या अखेरीस उगाचच ब्राम्हणांना सतत पाण्यात पाहणाऱ्या खेडेकर यांना पश्चाताप झाला असल्याने त्यांनी पुन्हा एकदा झालेल्या चुकांची सारवासारव करून पुन्हा एकवार भाजपाशी जवळीक साधण्याचा कदाचित स्थापन केलेल्या आणि पूर्णतः प्रयोग फसलेल्या शिवधर्माला बासनात गुंडाळण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू त्यामागे दिसतो आहे…
www.vikrantjoshi.com
पुरुषोत्तम खेडेकर सार्वजनिक बांधकाम खात्यात वादग्रस्त अभियंता म्हणून कार्यरत होते त्याचवेळी त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर या तीन तीन वेळा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून भाजपातर्फे निवडून यायच्या, एवढेच काय गोपीनाथ मुंडे त्यांना मंत्रिमंडळात देखील नक्की स्थान देणार होते आणि हे घडले असते तर चिखली विधानसभा मतदार संघाचा इतिहास बदलला असता कदाचित श्वेता महल्ले आमदारकीला उभ्याही राहिल्या नसत्या अर्थात तेव्हापासून मी या खेडेकर दाम्पत्याला बऱ्यापैकी आतबाहेर ओळखतो, सारे काही सुरळीत सुरु होते पण अचानक पुरुषोत्तम खेडेकर यांना तेही सरकारी नोकरीत असतांना अवदसा आठवली आणि त्यांनी आधी ब्राम्हणांवर उघड उघड आगपाखड करायला सुरुवात केली त्यानंतर अचानक हिंदू धर्माविरोधी भूमिका घेत चक्क बौद्ध धर्माच्या चालीवर स्वतःचा शिवधर्म काढला ज्याला पुढे खुद्द मराठ्यांनी देखील फारसे उचलून धरले नाही, थोड्याफार कुटुंबांनी तो स्वीकारला, पण अजिबात वाढला नाही याउलट डोके फिरल्यासारखे वागून खेडेकर यांनी काही काळ ब्राम्हणांना भीतीच्या छायेखाली नक्की आणून ठेवण्याचा आणि राज्यातल्या समस्त हिंदूंना अस्थिर करण्याचा एवढा प्रयत्न काही काळ केला कि अगदी सुरुवातीला थेट संघ वर्तुळात देखील जर हा धर्म राज्यात फोफावला तर त्याला कसे तोंड द्यायचे यावर चिंतन होऊ लागले होते ज्यात खुद्द गडकरी देखील सामील असायचे आणि हेच गडकरी ज्यांच्या जातीला आणि त्यांच्या कट्टर हिंदुत्वाला ज्या खेडकर यांनी आव्हान दिले होते त्यांच्या त्या डेन्जर भूमिकेला विसरून जर हेच गडकरी संपलेल्या खेडेकर यांना जाहीर प्रतिष्ठा मिळवून देत असतील तर गडकरी यांचे डोके फिरले आहे असेच म्हणावे लागेल…
मिस्टर गडकरी, राज्यात आणि देशात भाजपाचे महत्व झपाट्याने वाढते आहे हे अगदी सुरुवातीला शरद पवार यांच्या लक्षात आले त्यातून खेडेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवधर्माची कल्पना प्रत्यक्ष अमलात आणल्या गेली, भाजपा आणि युतीला खिळखिळे करण्यासाठी हा अतिशय घातक असा प्रकार अस्तित्वात आला वरून स्वतः पुरुषोत्तम खेडेकर आणि कोण ते साळुंखे एकामागून एक ब्राम्हण विरोधी ब्राह्मणांना खालच्या पातळीवर बदनाम करणारे त्यांना संपविण्याची भाषा करणारे एकामागून एक अनेक पुस्तके काढून मोकळे झाले होते थोडक्यात ज्या ब्राम्हणांना आणि भाजपाला संपविण्याची उग्र भाषा आणि दादागिरी करून या दोघांनाही जेरीस आणणार्या पुरुषोत्तम खेडकर यांचा सत्कार त्यांच्या 75 व्या वाढदिवसा निमीत्ते पुण्यात गडकरींच्या हस्ते करण्यात आला आणि गडकरी यांनी तो केला त्यावर आम्हा ब्राम्हणांची मान खाली तर गेली पण आपणच आपले शत्रू कसे त्याची प्रचिती गडकरींच्या या किळसवाण्या कृत्यातून उघड झाली. कधी खेडेकर तर कधी जरांगे, पवारांनी हिंदूंना अडचणीत आणतांना कधीच लाज बाळगली नाही. सुदैव समस्त हिंदूंचे कि राज्यातल्या समस्त मराठा समाजाच्या हे असले किळसवाणे प्रकार लक्षात आले अन्यथा मोठी किंमत साऱ्यांनाच मोजावी लागली असती. अर्थात समस्त मराठे आर्थिक दृष्ट्या पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांनी म्हणे अनेक जमिनी मराठा सेवा संघाच्या नावाने घेतल्या त्या जमिनी मालमत्ता आणि जमा झालेला पैसा पुढे नेमका मराठा सेवा संघाच्या भल्यासाठी वापरल्या जाणार आहे कि एखाद्या कुटुंबाच्या घशात तो जाणार आहे हेही नेमके उजेडात आणण्याची आवश्यकता आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी