हे गुपित तुम्हाला सांगू कसे ?
राजा जनकाने लावलेल्या पणात देशोदेशीचे अनेक राजकुमार सहभागी झाले होते, रामाने पण जिंकला सीता रामाची झाली तो भाग वेगळा मात्र भाग घेणाऱ्या इतरही राजकुमारांना तुच्छ लेखणे योग्य नाही नव्हते नेमके ते तसेच अगदी हुबेहूब विधानसभेला त्या वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी विधानसभा मतदार संघाचे झाले आहे म्हणजे सरतेशेवटी उमेदवारी भाजपाने जरी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती त्यांचे कार्यालयीन सहकारी सुमित वानखेडे यांच्या पदरात टाकली होती तरीही इतर दोघे वानखेडेंच्या तुलनेत अगदीच दुबळे होते असे अजिबात नाही वास्तविक आर्वी विधान सभा मतदार संघावर खऱ्या अर्थाने त्याआधीचे आमदार दादाराव केचे यांचा सर्वार्थाने सर्वाधिक हक्क होता, त्यांना डावलून नाही म्हणायला त्यांच्यावर तसा अन्याय जरी झालेला असला तरी भाजपा प्रेमापोटी दादाराव केचे यांनी झालेला अन्याय मनातल्या मनात गिळून विधानसभा प्रचारात भाग घेतला, वानखेडेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, एक वाक्य येथे आत्ताच लिहून घ्या, अमुक एखाद्याकडे जर नाईलाजाने नाही म्हणायला जरी दुर्लक्ष झाले तरी त्या नेत्याला पुन्हा एकवार नामी संधी देऊन पुन्हा एकदा सोनीयाचे दिवस आणून ठेवणारे तेच फडणवीस त्यामुळे आज ना उद्या दादाराव राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्वाच्या पदावर विराजमान झालेले तुम्हाला नक्की दिसतील. सुमित वानखेडे यांना उमेदवारी मिळाली त्यांनी खासदाराच्या पत्नीला मयुरा अमर काळे यांना जवळपास 40 हजार मतांनी पराभूत केले पण वानखेडे यांच्या उमेदवारी स्पर्धेत जसे दादाराव केचे अधिक तुल्यबळ होते त्यात आणखी एक नाव होते ज्यांचे उमेदवारीसाठी वानखेडे यांच्या आधीपासून फार पूर्वीपासून प्रयत्न सुरु होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उजवे हात श्री सुधीर दिवे हे ते नाव, गडकरींच्या राजकीय आयुष्याचे ते एक साक्षीदार आणि पूर्ती उद्योग समूहाचे राखणदार. कायम जमिनीवर पाय मिठ्ठास वाणी आणि नागपूरकरांचे लाडके व आवडते. वास्तविक तुल्यबळ वानखेडे, केचे, दिवे हे तिघेही पण माळ वानखेडे यांच्या गळ्यात पडली. हे सारे येथे तुम्हाला का सांगतोय तर त्या सुधीर दिवे यांच्यासाठी, संघ आणि भाजपाचे संस्कार काय आणि कसे असतात, ते मला येथे तुम्हाला सांगायचे आहे जे मला आपणहून आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले आहे. वानखेडे पद्धतीने दिवे यांचा देखील उमेदवारीसाठी तुल्यबळ दावा नक्की होता पण उमेदवारी वानखेडे यांना जाहीर झाल्यानंतर पुढल्या क्षणी याच दिवे यांनी वानखेडे यांच्या प्रचार कार्यालयाचा ताबा घेतला, तेथेच मतदान होईपर्यंत मुक्काम केला, वानखेडे प्रचारासाठी तिकडे वणवण भटकत होते कारण प्रतिस्पर्धी उमेदवार थेट विद्यमान खासदाराची बायको होती मात्र तुम्ही प्रचार करा मी बाकीची जबाबदारी घेतो असे दिवे यांनी वानखेडेंना जे सांगितले तेच नेमके केले करून दाखविले त्यातून वानखेडेंच्या विजयात दिवे यांचा सिंहाचा वाटा होता हे ज्याच्या त्याच्या तोंडून बाहेर पडले. फडणवीस आणि गडकरी दोघेही समसमान तुल्यबळ नेते आणि उत्सुक कोण तर त्यांचे थेट उजवे हात, पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुठेही गडकरी दिवे दोघांचीही आदळआपट नाही किंवा आकांडतांडव त्यांनी केले नाही. मिस्टर फडणवीस माझ्या पक्क्या माहितीनुसार जसे तुम्ही दादाराव केचे यांचे राजकीय पुनर्वसन करणार आहात त्याचवेळी जर तुम्हाला सुधीर दिवे यांना देखील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले तर मला वाटते ते देखील कौतुकास्पद ठरेल. बघूया पुढे काय घडते ते…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी