आनंदी आनंद गडे महायुतीकडे,
आघाडीच्या नेत्याचे तोंड वाकडे
समस्त वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, मला या संकटातून आता तुम्हीच वाचवा किंवा एखादा उपाय तरी सुचवा, मी विशेषतः महायुती सरकारातले किंवा त्यांच्या घटक पक्षांमधले गुपिते फोडतो तुम्हासमोर उघड करतो म्हणून दर दिवशी मला त्यांच्या प्रमुख नेत्यांची प्रचंड बोलणी खावी लागताहेत, माझी अवस्था एखाद्या सोशिक नवविवाहितेसारखी झालेली आहे म्हणजे बेवड्या व्यसनी नवऱ्याने रात्री घुटका खाऊन दारु पिऊन नियमित शारीरिक अत्याचार करावेत आणि भल्या पहाटेपासून खाष्ट सासूची बोलणी टोमणी सहन करावीत तसे एखाद्या गरीब गाईसारखी माझी दयनीय अवस्था झालेली आहे तरीही तुमच्यासमोर तोंड उघडले नाही असे माझ्याकडून कधीच घडले
नाही घडत नाही, उपाय सुचवा मला या जाचातून वाचवा. याठिकाणी पुन्हा एक गुपित तुमच्यासमोर आज उघड करायचे आहे, महायुतीशी संबंधित तीन ठार वेड्या फार मोठ्या धेंडांची सत्यकथा तुमच्यासमोर उघड करतो आहे. मुंबई ते थेट गडचिरोली चंद्रपूर पर्यंत शिंदे फडणवीसांनी उभ्या केलेल्या समृद्धी महामार्गाविषयी आजपर्यंत तुम्ही खूप काही वाचले ऐकलेले आहे पण जे तुम्हाला माहित नाही तेच नेमके येथे उघड करणार आहे. सुरुवात त्या ठार वेड्या बड्या धेंडांपासून करतो त्यापैकी पाहिले नाव अर्थात देवेंद्र फडणवीस दुसरे एकनाथ शिंदे आणि तिसरे आहेत समृद्धी महामार्गाचे बॉस अनिल गायकवाड. पुढल्या काही दिवसातच थेट ठाणे भिवंडीपासून समृद्धी महामार्ग तुमच्यासाठी ओपन केल्या जाणार आहे, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे या महामार्गाचे व्यापारीकरण सौंदर्यकरण अशा पद्धतीने हि पंचवार्षिक योजना संपेपर्यंत केल्या जाईल जे केवळ राज्यातल्या नव्हे देशातल्या नव्हे तर जगातल्या पर्यटकांचे प्रथम क्रमांकाचे
आकर्षण केंद्र आवडते पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेले असेल. युरोप अमेरिका विशेषतः चीनला देखील लाज वाटावी यापद्धतीने विविध ठिकाणी दर्जेदार टाऊनशिप्स व्यापारी संकुले मॉल्स पंचतारांकित हॉटेल्स तसेच आसपासच्या शहरांचा विकास आणि महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचे मनमोहक दर्शन मराठी खाद्य संस्कृती मराठीचा पराक्रमी इतिहास प्रेक्षणीय स्थळे इत्यादी विविधांगी जागतिक दर्जाचा हा महामार्ग हे तिघे कामकिडे ठार वेडे उभे करून मोकळे होणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या लगत जर तुमची मालमत्ता असेल किंवा आत्तापासून ओळखीने जर या महामार्गाच्या व्यापारी संकुलातून तुम्हाला गुंतवणूक शक्य असेल तर नक्की करून ठेवा, पुढल्या पिढीची ती मोठी आर्थिक सोय असेल…
www.vikrantjoshi.com
आणखी एक गुपित फोडतो. बघा, आपण काजू बदाम मनुका अंजीर हे असे महागडे ड्रायफ्रूट्स हलव्यात घालतो पण गाजर स्वस्त झाल्याशिवाय जसा हलवा करत नाही तेच नेमके रायगड जिल्ह्याचे झाले आहे म्हणजे आत्ता आता पर्यंत रायगड जिल्ह्यात शेतकरी
कामकरी पक्षाचा बोलबाला होता, पाटील घराण्यात एकी होती तोपर्यंत सारेकाही ठीक होते पण सदानकदा केवळ जयंत पाटील पुढे त्यातून शेकापचे नेते कार्यकर्ते आणि पाटील यांचे घरातले त्या पंडित पाटील दिवंगत मीनाक्षीताई पद्धतीचे सारेच वैतागले आणि शेकाप
झाडांच्या पानगळीसारखी झडायला संपायला सुरुवात झाली आणि उरली सुरली शेकाप त्या रवींद्र चव्हाण यांच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष होण्याची वाट पहाते आहे. आधी ठाणे जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा त्यानंतर थेट गोवा बॉर्डरपर्यंत ज्या वेगाने चव्हाण यांनी आधी
जवळपास संपलेली पार खंगलेली खूपच ढेपाळलेली विशेषतः शिवसेनेसमोर एकेकाळी अगदीच क्षयरोग्यासारखी भासणारी भाजपा चव्हाण यांनी ज्या वेगाने युक्तीने पुन्हा उभी केली तीच दखल त्यांच्या श्रेष्ठींनी घेतली म्हणूनच पुढले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत
हे आता तुम्हाला सांगणे म्हणजे चार पाच लग्ने उरकणार्या नटीने मी वर्जिन आहे असे नव्या नवऱ्याला सांगण्यासारखे. आदिती तटकरे नितीश राणे भरत गोगावले ऐवजी जर तातडीने थेट गणेश नाईक यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविल्या गेले तर चव्हाण
यांची त्या जिल्ह्यातली अख्य्या कोकणातली फार मोठी ताकद वाढणार आहे थोडक्यात भाजपा अधिक शक्तिमान होण्यास नाईक चव्हाण हि जोडगळी भाजप महायुतीला मोठी फायद्याची ठरणार आहे. उरले सुरले पाटील घराणे आणि समस्त शेकाप नेते कार्यकर्ते एकदा का चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले रे झाले कि शम्भर टक्के भाजपामय होणार आहेत. आगरी कोळी माळी हि रायगड जिल्हयातली शेकापची मोठी ताकद आहे जी नेमकी फडणवीस बावनकुळे आणि चव्हाण यांनी हेरली होती, तळ कोकणातले ठाणे जिल्ह्यातले आगरी कोळी समाजाचे मतदार आणि नेते अगदी ठरवून एखाद्याला अगदी सहज निवडून आणतात प्रसंगी भल्या भल्या नेत्यांना परभूत करून मोकळे होतात, या भाजपा नेत्यांच्या दूरदृष्टीला ढोपरापासून सलाम….