आवळला फास, सुधीरभाऊंचा
खेळ खल्लास भाग 2 :
सुधीर मुनगंटीवारांचे उथळ अवखळ चंचल राजकारण नेमके मोदी शहांच्या लक्षात आले, व्यक्तिगत फायदे आणि स्वतःच्या समाजापलिकडे इतरांना ढुंकूनही न बघण्याची सततची सवय त्यांनीच मग यावेळी मुनगंटीवार यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न देण्याच्या सूचना फडणवीसांना केल्या फडणवीसांचा नाईलाज झाला आणि मुनगंटीवार यांना यावेळी मंत्री मंडळापासून कोसो दूर ठेवण्यात आले. देशाचे राज्याचे राजकारण अलीकडे अधिक प्रगल्भ झाले आहे त्यात फडणवीसांसारखा एखाद्या दक्ष पोलीस अधिकाऱ्यासारखा 24 तास अलर्ट नेता आणि राजकारणीही, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांची तंतोतंत नेमकी माहिती त्यांच्याकडे असते. लागोपाठ दोन वेळा लोकसभेला चंद्रपूरातून पराभवाची धूळ चारणार्या सुधीरभाऊंवर तसेही मोदी शहा थेट 2019 पासूनच रुसलेले होते तरीही देवेन्द्रजी यांनी आपणहून मनाचा मोठेपणा दाखवत सुधीरभाऊंना सत्तेच्या राजकारणात सांभाळून घेतले त्यांना सत्तेत अंतर दिले नाही, जर सुधीरभाऊंनी व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून भाजपाला दोन्ही निवडणुकीत जिंकून आणले असते तर त्यांच्याकडे फडणवीस मोदी शाह नड्डा इत्यादींनी नक्कीच दुर्लक्ष केले नसते पण 2019 च्या लोकसभेला दिवंगत बाळू धानोरकर आणि 2024 च्या लोकसभेला त्यांच्या पत्नीला प्रतिभा धानोरकरांना मिळालेला विजय केवळ सुधीर मुनगंटीवार यांची नकारात्मक भूमिका आणि अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि भाजपाचे नुकसान घडवून आणणार्या मुनगंटीवार यांना तुमच्याशिवाय यापुढे चंद्रपूर जिल्ह्याचे राजकारण हे नवगणित मोदी शहा यांनी जवळपास साऱ्यांना सांगून टाकले, मुनगंटीवार यांचे राजकीय महत्व तातडीने कमी केले शिवाय व्यक्तिगत श्रीमंती आणि समाजापलीकडे विचार न करणाऱ्या सुधीरभाऊंना त्यांची नेमकी जागा त्यांच्या श्रेष्ठींनी दाखवून दिली. वास्तविक सुधीरभाऊंचे हे पक्षांतर्गत काहीसे फसवे काहीसे घातक राजकारण फडणवीसांच्या केव्हाच लक्षात आले असल्याने त्यांनी केव्हाच काहीशी फटकळ भूमिका खडसे पद्धतीने सुधीरभाऊंच्या बाबतीही अंगिकारली होती पण त्या दोघांच्या एका कॉमन मित्राने फडणवीसांचे मन वळवून पुन्हा एकवार सुधीरभाऊंना फडणवीसांच्या जवळ आणून ठेवले मात्र लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत सुधीरभाऊंची संशयास्पद भूमिका जी अख्या चंद्रपूर जिल्ह्याच्या संघ भाजपाला खटकणारी ठरली तेथेच पुन्हा एकवार फडणवीसांची सटकली आणि मोदी शहा यांच्या कानावर देखील स्थानिक नेत्यांनी भाऊंची संशयास्पद घातक भूमिका जशीच्या तशी कानावर टाकली, अशाप्रकारे भाऊंचे सत्तेतले काउंट डाऊन सुरु झाले. मुनगंटीवार विषय येथेच संपत नाही…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी