ये जो पब्लिक है सब जानती है :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी जो तो उत्सुक असतो, भेट मिळावी म्हणून धडपडतो देखील कारण फडणवीस म्हणजे कॉलेजातली अशी देखणी चिकणी तरुणी मंद मंद स्मित करून बघणार्या प्रत्येकाला एका क्षणात आपलेसे करते, ती ज्याला त्याला भावते, हि केवळ आपलीच नेहमी असावी असे ज्याला त्याला वाटत राहते, मतदार मग तो कुठल्याही विचारांचा असला तरी आजतागायत राज्यातले फडणवीस असे एकमेव नेते म्हणून मी बघितले ज्यांना एखाद्या सिने हिरोसारखे किंवा एकेकाळच्या राजेश खन्नासारखे प्रसिद्धीचे आपुलकीचे आपलेपणाचे वलय आहे. फडणवीस जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्या क्षणापासून तर आजतागायत या मोठ्या पोझिशनवर आले असताना देखील त्या नागपुरात आजही ते एकेरी शब्दात देवेनभाऊ आहेत, याच नावाने त्यांना सतत संबोधल्या जाते. एक मोठी गम्मत या देवेनभाऊ बाबत त्या नागपुरातली सांगतो. समजा तुम्हाला अमुक एखादा मोठ्या किमतीचा प्रकल्प मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांकडून मंजूर करवून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्या नागपुरातल्या कुठल्याही वजनदार व्यक्ती कडे जाण्याची गरज नाही, एखाद्या चहाच्या ठेल्यावर किंवा पान टपरीच्या मालकाकडे तुमचे काम घेऊन जा तो लगेच तुम्हाला, माझे देवेन भाऊंशी कसे घरगुती संबध सांगून अमुक एखादे काम करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेल कारण नेमकी वस्तुस्थिती अशी कि सारेच नागपूरकर देवेंद्र यांच्या लहानपणापासून त्या साऱ्यांच्या ओळखीचे आहेत विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या नागपूरकरांचे ते खूपच लाडके आहेत…
www.vikrantjoshi.com
अनेक हिंदी सिनेमातून कित्येक वर्षे जे तुम्ही आम्ही बघत आलोय कि अमुक एखादी स्त्री किंवा पुरुष आपले अपत्य सुखी व्हावे सुरक्षित वाढावे यास्तव कुठल्याशा श्रीमंत घराच्या पायरीवर सोडून दूरवर निघून जातात किंवा कंसाच्या हातून आठवे अपत्य ठार मारले जाऊ नये म्हणून कृष्णाला यशोदेकडे वडील वसुदेव सोडून निघून जातात, आठ खासदारांचे पालक शरद पवार आणि नऊ खासदारांचे पालक उद्धव ठाकरे यांची यादिवसातली भूमिका हुबेहूब सिनेमातल्या त्या असाह्य निरुपा रॉय सुलोचना मन मोहन कृष्ण पद्धतीची नेमकी नक्की झाली आहे, आपली हि आठ नऊ लेकरे पुढली पाच वर्षे आपल्या घरी हलाखीच्या परिस्थितीत जगल्यापेक्षा त्यांना अत्यंत विश्वासू नरेंद्र आणि भरवशाच्या देवेंद्र यांच्या ओटीत टाकण्याचा निर्णय जवळपास दोघांचाही झाला आहे थोडक्यात निवडून आलेल्या खासदारांनी धोका देत इकडे तिकडे पळापळ करीत पवार आणि उद्धवजी दोघांनाही अधिक क्षतिग्रस्त व अपमानित करण्याऐवजी उद्धवजी, पवार यांनी हा धोपट मार्ग काढून आपली हि उरलीसुरली लेकरे सुरक्षित हातात सोपविण्याचा निर्णय दोघांनीही नक्की घेतला आहे, नरेंद्र आणि देवेंद्र यांचे त्या दोघांना जे सांगणे आहे ते मात्र अद्याप त्यांना मान्य नाही कि पवारांचे खासदार अजितदादा राष्ट्रवादीत आणि उद्धवजींचे खासदार एकनाथजींच्या शिवसेनेत विलीन व्हावेत त्याऐवजी आमच्या खासदारांचे एकतर स्वतंत्र स्थान असावे किंवा अन्य वेगळा तोडगा त्यातून काढावा,वारंवार पवार व उद्धवजी नरेंद्र व देवेंद्र दोघांनाही पटवून सांगण्याच्या सतत प्रयत्नात आहेत.
अगदीच काही उद्धवजी व पवारांच्या मनासारखे घडले नाही तर माझी नेमकी माहिती अशी कि या दोघांचेही निवडून आलेले खासदार आपणहून थेट भाजपमध्ये सामील होतील कारण त्या समस्त खासदारांना राजकीय बळकटी पुढे पुन्हा एकवार निवडून येण्यासाठी गरजेची आहे, राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विरोधात बसून खासदार म्हणून काम करणे म्हणजे एखादया उफाड्या नवविवाहितेचा नवरा लग्न झाल्या झाल्या पाच वर्षांसाठी थेट परदेशात निघून जाण्यासारखे, तिने इकडे प्रत्येक रात्र केवळ आठवणीत रमण्यासारखे. जे आज खासदार म्हणून पवार व उद्धवजी तर्फे निवडून आले आहेत त्यांचेही पार पडलेल्या निवडणुकीत मोठे बँक बॅलन्स बिघडलेले आहे तसेच त्यांना पुन्हा पुढल्यावेळी खासदसरकीला उभे राहायचे आहे, पुढल्यावेळी निवडणूक लढवून जिंकून यायचे असेल तर मतदाराना विकासाची कामे दाखवावी लागतील वरून आजकाल विनाखर्च निवडणूक लढविणे म्हणजे कानातला मळ विकायला काढून मुलीच्या लग्नात हुंडा देण्यासारखे, आपण उगाच निवडणूक लढविली आपण उगाच भाजपाविरोधात निवडून आलो हीच राज्यातल्या महायुती विरोधातल्या खासदारांच्या मनाची दयनीय शोचनीय अवस्था, एकांतात बसून डोक्यावरले केस उपटण्यापलीकडे निदान आज तरी काहीच त्यांच्या हस्ती नसल्याने जवळपास सारेच खासदार नेमका तोडगा काढून लवकरात लवकर नरेंद्र व देवेंद्र दोघानाही करकचून जवळ घेण्याच्या मनस्थितीत आहेत, आता नेमका निर्णय कोणता व कसा घ्यायचा हे त्या दोघांच्याच हातात असल्याने जो तो विरोधात निवडून आलेला खासदार आणि त्यापलीकडे जाऊन सांगतो राज्यातले बहुतेक आमदार देखील या कुंपणावरून त्या कुंपणावर लांब उडी घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आत्ता आत्ता पर्यंत ललिता पवारांच्या भूमिकेत शिरून ज्या पद्धतीने देवेंद्र यांना छळत आलेत त्यावर, आमचे चुकले झाले गेले विसरून जा हे अगदी जाहीर त्यांनी नरेंद्र देवेंद्र जोडगळीला सांगून सन्मानजनक शेवट या पंचवार्षिक योजनेत आपल्या नेतृत्वाचा करून मोकळे व्हावे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी