मुख्यमंत्रीजी दिलेला शब्द पाळा अवदसा टाळा :
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे कार्यालये एकप्रकारे सिनेमातल्या एखाद्या आण्टीचा अड्डा असतो, वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते चेहरे इकडून तिकडे तिकडून इकडे फारतर ये जा करतांना दिसतात मात्र नवनवे मंत्री मंडळ येत जात असते त्यांच्या कार्यालयात काम करणारे कायम असतात, मंत्रिमंडळ कार्यालयात त्याच त्या स्टाफचे विशेषतः पी ए म्हणजे स्वीय सहाय्यक आणि पी एस म्हणजे खाजगी सचिव आणि ओ एस डी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांचे फार मोठे जबरदस्त हादरवून सोडणारे लुटपाट करणारे थेट डाकू पद्धतीचे रॅकेट मंत्रायलयात मंत्री मंडळात कार्यरत आहे कार्यरत असते, भल्या भल्या मान्यवरांना ताटकळत ठेवणारे हे पी ए पी एस आणि ओ एस डी मनमानी कारभार कसा करायचा असतो त्याचे ज्वलंत असे उदाहरण आहे ज्याचा अगदी सुरुवातीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिशय तिटकारा आहे असे राकेटियर डाकू पद्धतीचे नेमके मंत्री कार्यालयातले कर्मचारी कोण कोणते फडणवीसांना हि नावे तोंडपाठ आहेत नेमकी माहित आहेत त्यांच्याकडे भरभक्कम पुरावे आहेत त्यातून फडणवीसांनी सुरुवातिला 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक निर्णय घेतला होता तशा सूचना त्यांनी त्यावेळी प्रत्येक मंत्रीमंडळ सदस्यांना दिल्या होत्या कि कार्यालयातील अमुक एखादा स्टाफ घेतांना तो माझ्या नजरे खालून घालण्यात यावा, त्यामागे रॅकेटियर बिलंदर बदमाश उद्धट करप्ट अशा या सरकारी नोकरदारांना त्यांना मंत्री मंडळ आस्थापनेतून हाकलून लावायचे होते पण त्यावेळी फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेऊनही त्यातल्या त्यावेळेच्या एकही मंत्र्याने त्यांचे आदेश अजिबात जुमानले नाहीत त्या आदेशांना अक्षरश: केराची टोपली दाखविली आणि आधीचे जे जे अत्यंत हलकट बदमाश असे हे जे रॅकेटियर होते तेच नेमके त्यावेळेच्या मंत्र्यांनी स्वतःच्या कार्यालयात आस्थापनेवर घेतले, ज्यांना फडणवीसांनी कडवा विरोध दर्शविला होता ते देखील सारेच थेट सुट्टीवर गेले पण रुजू मात्र मंत्री कार्यालयातच झाले…
www.vikrantjoshi.com
फडणवीसनानंतर अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उर्वरित अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर या कलंकित स्टाफने एवढा गोंधळ घातला कि खुद्द शिंदे यांच्या कार्यालयात जे घडले ते सतत सहज घडत असते म्हणजे शिंदेंच्या कार्यालयातला आरोग्य मदत करणाऱ्या विभागाच्या प्रमुखाचा स्वतःचाच असा स्टाफ होता ज्यांना पगार या प्रमुखाच्या खिशातून दिल्या जायचा म्हणजे मंत्र्यांचे जे पीए पीएस ओएसडी असतात त्यांचा स्वतःचा देखील वेगळा स्टाफ असतो, यातले बहुतेक महागड्या कार्स मधून ये जा करतात त्यांचा स्वतःचा ड्रायव्हर मंत्रालयाबाहेर त्या त्या साहेबांची कार पार्क करून ठेवतो. असे एक ना अनेक किस्से तुमच्या अंगाचा थरकाप उडवून मोकळे होतील, खास तुम्हासाठी,भेटणाऱ्या भल्याभल्यांशी अतिशय उर्मट वर्तन करणाऱ्या गजानन पाटलांना यावेळी अजित पवारांनी शपथ घेतल्या घेतल्या ढुंगणावर लाथ घातली खरी पण याच अजित पवारांच्या कार्यालयात जानवे घालणाऱ्या अशा एका फार मोठ्या दरोडेखोर निवृत्त अधिकाऱ्याला त्या सुनील तटकरे यांनी केवळ स्वतःची कामे करवून घेण्यासाठी बसविले जे बघून एखाद्याला वेश्यागमन करण्याचा नाद जडला कि तो कसा एड्स झालेल्या रांडेवर देखील चढायला कमी करत नाही, अजित पवारांच्या कार्यालयातले हे गजानन पाटलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने खतरनाक असे माकड बघून तटकरे यांना हि अशी गचाळ उपमा मला देणे भाग पडले….
या ठिकाणी या लिखाणाचे प्रयोजन यासाठी कि पुन्हा एकवार यावेळी देखील मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांनी पुन्हा एकदा तेच पूर्वीचे उत्तम आणि आवश्यक असे धोरण अवलंबिले आहे म्हणजे त्यांना न विचारता कुठल्याही हलकट नीच करप्ट स्टाफला कुठल्याही मंत्री उपमुख्यमंत्र्याने घेता कामा नये हे त्यांनी सांगून ठेवले असतांना देखील अजितदादा पद्धतीने जवळपास समस्त मंत्रिमंडळ सदस्यांच्या कार्यालयात चोर पावलांनी या हलकट कर्मचाऱ्यांनी चंचू प्रवेश करायला केव्हाच सुरुवात केलेली आहे थोडक्यात फडणवीसांसारख्या शिस्तप्रिय मुख्यमंत्र्यांना अजिबात न जुमानता पूर्वीच्याच ज्या बदमाश मंडळींना जे जे मंत्री आपल्या आस्थापनेवर घेतील त्या साऱ्यांची नावे मी या पद्धतिने नक्की उघड करून मोकळा होईल. थोडक्यात मंत्री मंडळ आस्थापना हा विषय मी येथेच संपविणार नाही. आता अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा पुन्हा त्या मुख्यमंत्र्यांसाठी, यापुढे ज्या ज्या शासकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारताबाहेर जायचे असेल त्यातल्या कित्येकांना कुटुंब सदस्यांच्या नावाने व्यवसाय करायचा असेल गुंतवणूक करायची असेल त्यातल्या प्रत्येकाने शासनाच्या विना परवानगी असे काहीही करायचे नाही नसते हा जो शासकीय कायदा आहे त्याचे अजिबात उल्लंघन करता कामा नये त्यावर फडणवीसांनी कडक भूमिका घेण्याची त्यांना हात जोडून विनंती आहे तसेच गेल्या दहा वर्षात ज्यांनी परदेश प्रवास व्यवसाय व गुंतवणूक केली आहे त्यांनी तपशीलवार माहिती व पुरावे शासनाकडे सादर करण्याचे आदेश जर फडणवीसांनी काढले किंवा काढावेत तर मला वाटते राज्यातले कितीतरी सरकारी अधिकारी कर्मचारी एकतर तुरुंगात जातील किंवा थेट घरी बसतील…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी