घडले बिघडले : हिंदुत्व टिकले शिंदे तरले :
तारुण्य ओसरले आणि पैसे संपले कि ज्यांच्याकडले हे संपले सरले त्यांच्याकडे क्षणाचाही विलंब न लावता वेळ न दवडता जमलेले जमणारे सारेच पाठ फिरवतात. लाडक्या बहिणी सारख्या सर्वोत्तम उत्तमोत्तम योजना आणणे राबविणे त्यातूनच विशेषतः एकनाथ शिंदे हे दीर्घकाळ राज्यातल्या जनतेवर अधिराज्य गाजवतील कारण फडणवीसांच्या तुलनेत तेही राज्यातल्या जनतेला नेता नेतृत्व म्हणून अगदी मनापासून भावले आवडले आहेत मात्र पैसे कमवायचे आणि त्यातले काही बाजूला काढून थोडेसे लोकांवर उधळायचे कि माणसे आपल्या बाजूला होतात हा दीर्घकाळापासून राबविल्या जाणारा ठाणे पॅटर्न त्यांनी तातडीने मोडीत काढणे तेही त्यांना दीर्घकाळ राजकारणात टिकून राहायचे असेल मोठ्या गरजेचे आहे. नव्या मुंबईतले गणेश नाईक देखील पैसे वाटणे माणसे जिंकणे या पॅटर्न मधून बाहेर पडायला तयार नाहीत पण शिंदे आणि नाईक या दोघात महत्वाचा मोठा फरक असा कि गणेश नाईक आणि कुटुंबीयांनी आधी मोठ्या प्रमाणावर विविध व्यवसाय उभे करून उत्पन्नाचे मोठे स्रोत उभे केले त्यामुळे वरच्यावर मिळणारे नाईक लोकांत वाटून मोकळे होतात त्यांच्या कुटुंबाला फारशी आर्थिक झळ पोहोचल्याचे कधी घडले नाही इकडे शिंदे यांच्या कुटुंबात ते आणि डॉ श्रीकान्त एवढेच काय ते कमावते पुरुष, त्यात दोघेही सतत व्यस्त असल्याने अशावेळी शिंदे यांना अजय अशर पद्धतीच्या लबाड भागीदारांवर कायम अवलंबून राहावे लागते आणि स्वार्थी हिशेबी बेरकी भागीदार कधीही कोणाचा नसतो तो तुम्हाला लुटून लुबाडून फसवून गंडवून केव्हा कुठे पसार होईल ज्याचा अजिबात भरवसा ठेवायचा नसतो, वर्षानुवर्षे मी जे बघतो तेच तुम्हाला याठिकाणी सांगतो कि विवेक जाधव पद्धतीचे मंत्रालयात दलाली करणारे सारेच उगवत्या सूर्याला, असे काही सत्तेत आलेल्यांना एका क्षणात बिलगतात जणू ते त्यांचे वर्षानुवर्षे सख्खे नातेवाईक आहेत किंवा सत्तेतून पायउतार होणाऱ्यांकडे ते पुढल्या क्षणी साधे ढुंकून देखील बघत नाहीत, शिंदे बाप लेकाने नेमके हे असे लबाड सभोवताली बाळगले असल्याने हेच लबाड एक दिवस त्यांनाच एकाकी करतील त्यापेक्षा शिंदे हे फडणवीस आणि भाजपाच्या संगतीत सुदैवाने आले असल्याने त्यांनी संघ भाजपा पद्धतीने आवश्यक त्याठिकाणी खर्च आणि कर्तृत्व व कामातून तसेच कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकांना जिंकणे जवळ करणे केव्हाही उत्तम जे दीर्घकाळ टिकणारे असते. अत्यंत महत्वाचे म्हणजे यापुढे महाराष्ट्रात ज्यांचे हिंदुत्व कट्टर त्यांनाच सत्तेत येणे राहणे शक्य ठरणारे असेल हे त्रिवार सत्य आहे आणि हेच नेमके उद्धवजींच्या ध्यानात आल्याने त्यांनी विधान सभा पराभवानंतर महाआघाडीच्या नाराजीची अजिबात पर्वा न करता पुन्हा एकवार हिंदूंना, मराठी माणसाला कुर्वाळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे किंबहुना चार पावले मागे येत फडणवीसांची त्यांनी अलीकडे भेट घेणे हा त्यातलाच एक कावा पण उद्धवजींपेक्षा एकनाथ शिंदे केव्हाही मोठ्या भरवशाचे हे भाजपा आणि फडणवीस नेमके जाणून असल्यामुळे त्यांनी आधी शिंदे यांना विश्वासात घेतले त्यानंतर फडणवीस उद्धवजींना भेटले. महत्वाचे असे कि उद्धव ठाकरे राज्यात लोकांच्या मनातून साफ उतरल्याने त्यांना पुन्हा ताठ मानेने उभे राहण्यासाठी यापुढे दीर्घकाळ प्रयत्न करावे लागणार आहेत आणि भाजपाला अगदी सतत संगतीने आणखी एक हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पर्यायी हिंदुत्व मानणार्या पक्षाची या राज्यात गरज असते, त्यांना कुठलीही निवडणूक एकट्याने लढणे आणि जिंकणे कठीण आहे हे माहित आहे असते, एकनाथ शिंदे यांनी हि पोकळी यापुढे भाजपा संगतीनेच युती करून भरून काढावी, संघ भाजपाला ठाकरे परिवारानंतर मनापासून भावले ते एकमेव एकनाथ शिंदे ज्याचा शिंदे यांनी खुबीने युक्तीने सकारात्मक उपयोग करून घ्यावा.पैसे फेकले कि सारे मिळते हा भ्रम मनातून काढून टाकावा कारण तारुण्य आणि श्रीमंती ओसरली कि सख्खा भाऊ किंवा प्रियकर सुद्धा पाठ फिरवतो. एकनाथ शिंदे हा बहुजनांचा फार मोठा लाडका आणि आश्वासक चेहरा आहे तो राजकारणात दीर्घकाळ असाच तळपत राहावा ज्याला कधी नव्हे ते रा स्व संघाने थेट मोहन भागवत यांनी देखील हृदयातल्या कुप्पीत जेरबंद केले आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी