हि घ्या फडणवीसांच्या कार्यालयातली
गुपिते आणि गौप्यस्फोट :
ज्यांचा राज्यातल्या राजकारणाशी सत्तेशी सततचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दरक्षणी संबंध येतो त्यांना आता तातडीने स्वतःमधे काही बदल करवून घ्यावे लागतील अन्यथा महाराष्ट्र हे राष्ट्रातले जगातले सर्वाधिक भ्रष्ट राज्य प्रांत म्हणून ओळखल्या जाईल एवढा धुडगूस सत्तेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित ज्याने त्याने घातला आहे मात्र त्याचवेळी एकमेव आशेचा किरण राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी हा सत्तेतलाधुडगूस भ्रष्टाचार बेधुंद कारभार खपवून न घेण्याचे शंभर टक्के नक्की केले आहे. विशेषतः यावेळच्या उमेदवारांनी विधान सभा निवडणुकीत खर्च केलेला पाण्यासारखा पैसा डोळे विस्फारणारा ठरला, अतुल चव्हाण, रावसाहेब कांबळे पद्धतीच्या अनेक असंख्य वादग्रस्त भ्रष्ट अधिकाऱ्यांचा या विधानसभेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध सहभाग होता अनेक शासकीय प्रशासकीय आजी माजी सरकारी अधिकाऱ्यांची भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशातून सत्तेच्या हव्यासात जागी झालेली राक्षसी महत्वाकांक्षा यावेळी जी शिगेला पोहोचली आहे, त्यावर फडणवीस अतिशय कडक पाऊल उचलतील माझी तशी माहिती आणि खात्री आहे किंबहुना बोलण्यात व्यवहारात अतिशय निर्ढावलेले तानाजी सावंत पद्धतीचे जे आमदार किंवा शिंदे मंत्रिमंडळातले अनेक मंत्री वगळण्यात आले ती भाजपा आणि फडणवीसांनी घेतलेल्या कडक भूमिकेची झलक होती सुरुवात होती हे समस्त बदमाषांनी लक्षात घ्यावे…
www.vikrantjoshi.com
स्वतः दरोडे घालायचे आणि इतरांना उपदेशाचे डोस पाजायचे किंवा त्यांचे काळे धंदे तेवढे सतत वाकून पाहायचे आपले झाकून ठेवायचे किंवा स्वतः नित्यनियमाने वेश्यागमन करायचे आणि पोटच्या पोराला हनुमंत राहा सांगायचे हे फडणवीसांना कधीही न जमणारे, किंबहुना त्यांच्याविषयी आजतागायत जे मी सांगितले आहे पुढे सांगणार आहे तेच नेमके सत्य आहे असते एव्हाना तुमच्या ते लक्षात आले असेलच. फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली, मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे बदमाश किंवा भ्रष्टाचाऱ्यांची साधी बघण्याची देखील हिम्मत होणार नाही त्या प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी आणि अश्विनी भिडे या दोघांची नियुक्ती करण्यात आली. अनेक नेत्यांना आमदारांना अधिकाऱ्यांना यापुढे महत्वाच्या कामानिमित्ते अनेकदा भिडे व परदेशी या दोघांशी संबंध येणार आहे, त्या दोघानांही मी फार जवळून ओळखतो ते दोघेही शिस्तीचे आहेत पण तेवढेच समाजपयोगी, कोणत्याही कामाबाबत अतिशय सकारात्मक आहेत तेव्हा मनात उगाच भीती दडपण न बाळगत मनमोकळेपणाने त्यांना जाऊन भेटा आपापली कामे सांगा, लगेचच ते तुम्हाला सहकार्य करून मोकळे होतात. मिस्टर भूषण गगराणी, पुरे झाले त्या म्यून्शिपाल्टीत बसणे, आम्हाला तुम्ही त्या सुजाता सौनिक यांच्या जागी बघायचे आहे.ज्याचा मी रा स्व संघाचे सर्वोत्तम संस्कार जपणारा तेही सरकारी अधिकारी म्हणून आता उल्लेख करणार आहे त्याचा म्हणाल तर त्याग म्हणाल तर राष्ट्र कर्तव्य कुठल्या उंचीचे, तुम्हाला ते गुपित सांगितल्यानंतर फडणवीस महाराष्ट्र घडवून बदलवून कसे तिकडे दिल्लीत निघून जाणार आहेत, तुमच्या ते लगेच लक्षात येईल. प्रमोट होऊन का होईना पण निवृत्ती आधी बहुतेक सरकारी अधिकाऱ्यांचे स्वप्न असते प्रशासकीय अधिकारी होण्याचे जे 2014 पासून ऑन ड्युटी 24 तास फडणवीस सत्तेत असतांना किंवा नसतांना देखील त्यांच्या सेवेत असणाऱ्या सरकारी अधिकारी दिलीप राजूरकर यांना प्रत्यक्षात उतरविणे केव्हाच अगदी सहज शक्य होते पण एक दिवस त्यांनी फडणवीसांना थेट सांगून टाकले कि मला तुमच्या संगतीने अखेरच्या श्वासापर्यंत तेही विना अपेक्षा राष्ट्रसेवेत रमायचे आहे मला प्रशासकीय अधिकारी व्हायचे नाही आणि ते पुन्हा आपल्या कामाला लागले. त्यांच्या सोबतीचे अगदीच एखादा विवेक भिमानवार सारखा सुसंस्कृत अधिकारी सोडल्यास केव्हाच प्रशासकीय सेवेत रुजू झाले आणि आणखी श्रीमंत होऊन मोकळे झाले. फडणवीसांचा जो सर्वाधिक कट्टर शत्रू असेल तो देखील राजूरकरांकडे कौतुकाचा दृष्टिक्षेप टाकतो, राष्ट्र प्रथम आणि फडणवीसांच्या सेवेला अग्रक्रम, हे एकमेव स्वप्न त्या दिलीप राजूरकरांचे. बघा एखाद्या अत्यंत सुंदर स्त्रीच्या देखील शरीरावर कुठेतरी डाग असतो तसे नकळत एखादा चतुर बदमाश लांडगा त्यांच्याही कार्यालयात असू शकतो घुसू शकतो पण जर त्याचे दुष्कृत्य देवभाऊंच्या लक्षात आले तर काय होऊ शकते ज्याला त्याला माहित असते पण त्यांच्या कार्यालयातले जवळपास सारेच त्या देवराम पळसकर पद्धतीचे म्हणजे जिभेवर साखर डोक्यावर बर्फ आणि बखोटीला संस्कारांची शिदोरी, एखाद्या उत्तम प्रमुखाचे कार्यालय सर्वोत्तम कसे असू शकते, फडणवीसांच्या कार्यालयात जाऊन यावे आणि जवळून बघावे…
2014 ते आत्ताआत्तापर्यंत फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाशी जवळीक असणारे असेच एक आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग, मुख्यमंत्री कार्यालयातून ब्रिजेश सिंग बाहेर पडल्याचे मोठे दुःख आम्हा पिता पुत्राला झाले आहे. कुठे थांबायचे हे जर यापुढे एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला कळले नाही तर शंकरराव चव्हाणांनंतर छडीचा उत्तम वापर करण्याचे कसब फडणवीसांकडे आहे हे निदान यापुढे देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत ज्याने त्याने प्रत्येकाने मग तो दलाल असेल अधिकारी किंवा आमदार नामदार प्रत्येकाने लक्षात ठेवावे. शेवटी ज्या एका सामान्य दिसणार्या पण असामान्य असणाऱ्या संघ स्वयंसेवकाने आमच्यातल्याच एका पत्रकाराने किंवा नागपुरातल्या फडणवीसांच्या पेंद्याने, फडणवीसांच्या आजवरच्या सततच्या राजकीय आणि सत्तेतल्या उत्तम कार्याचा प्रत्येक क्षण जगासमोर मांडून फडणवीस नेमके कसे आगळे वेगळे हे न थकता न थांबता ज्याने सांगितले किंवा सांगताहेत तो डाऊन टु अर्थ माझा अतिशय लाडका, एकेकाळचा झक्कास पत्रकार केतन पाठक, तुमच्या प्रत्येकासमोर जगातल्या सार्यांसमोर आजचा जो जसाच्या तसा देवाभाऊ उभा करण्याचे मोठे श्रेय जाते ते अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वरकरणी खडूस पण आतून देशभक्तीने पेटलेला हा भावनाप्रधान फडणवीसांचा सवंगडी एकमेव केतन पाठक, माझ्या कायम हृदयात कोरल्या गेलेला हा फडणवीसांचा अगदी सुरुवातीपासूनचा फॅन फॉलोअर आणि त्यांचा सुदामा देखील…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी