मुख्यमंत्री कार्यालय कसे असावे असे नसावे : भाग 1
अ मॅन नोन बाय हिज कंपनी, सभोवताली जमा झालेले जमा केलेल्या सवंगड्यांवरून साथीदारांवरून सहकाऱ्यांवरून अमुक एखादी व्यक्ती नेमकी कशी एका क्षणात ओळखता येते. फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच कसे उत्तम बदल त्यांच्या कार्यालयात घडवून आणले त्यावर पुढल्या भागात सांगतो तत्पूर्वी काही धक्कादायक पुरावे सांगून सुरुवात करतो. छगन भुजबळ शिंदेंच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी खात्याचे मंत्री असताना त्यांचे खाजगी सचिव वादग्रस्त किंवा ज्यांच्यामुळे मंत्री असतांना गणेश नाईक एवढे बदनाम झाले कि गेली अनेक वर्षे सत्तेबाहेर होते ते संतोषसिंग परदेशी नेमके भुजबळांकडे खाजगी सचिव म्हणून रुजू झाले, त्यावर मी भुजबळांना म्हणालो, तुम्हाला पुन्हा एकवार भ्रष्टाचार केल्याने तुरुंगात जायचे नसेल तर आधी त्या परदेशाला खाजगी सचिव पदावरून मुक्त करा, त्यांनी ते लगेच केले पण पहिल्या पत्नीच्या वाईट चारित्र्यावरून एखाद्या पुरुषाने तिला घटस्फोट देऊन पुन्हा लग्न करावे आणि तीही नेमकी वेश्या निघावी तसे भुजबळांचे झाले किंवा त्यांनी तसे केले म्हणजे ज्या दयानंद चिंचोलीकर यास गैरव्यवहार प्रकरणी एकेकाळी मंत्री असतांना सुनील तटकरे यांनी त्यांच्या कार्यालयातून हाकलले होते त्या अत्यंत वादग्रस्त दयानंद चिंचोलीकर यांना भुजबळांनी खाजगी सचिव म्हणून नेमले आणि मी कपाळाला हात मारून घेतला. केवळ वाढदिवसानिमीत्ते मुलास ऑडी गिफ्ट करणाऱ्या दयानंद चिंचोलीकर यांच्या मुलीचे अलीकडले त्याने केलेले महागडे लग्न, हाती आलेले पुरावे मला अचंबित करणारे होते, तब्बल अकरा वेगवेगळ्या ठिकाणी या लग्नानिमित्ते महागडे स्वागत समारंभ आयोजित करणारे हे दयानंद चिंचोलीकर परदेशात शासनाच्या विना परवानगी असे जाऊन येतात जणू ते मुंबई ते पुणे जाऊन यावेत, भुजबळांनी परदेशी यांना बाहेर काढल्यानंतर, मंत्रालयात जो वादग्रस्त तो अधिक जबरदस्त, हा प्रकार सऱ्हास आढळतो तेच परदेशी बाबत घडले म्हणजे त्याला भुजबळांनी हाकलल्यानंतर हे महाशय थेट मुख्यमंत्री कार्यालयातच रुजू झाले, शिंदे गेले फडणवीस आले तरीही ते तेथेच आहेत, पैसे कमावताहेत. उद्या पुन्हा दयानंद चिंचोलीकर मुख्यमंत्री कार्यालयात रुजू होऊन पुनःसच एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे उजवे हात म्हणून काम करायला लागले तर मला अजिबात नवल वाटणार नाही.
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू इच्छितो, 2010 पूर्वी जर अमुक एखाद्या शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला नोकरदाराला जर परदेशात जायचे असेल तर शासन परवानगी आणि सोपासकारांशिवाय त्याची साधी नेपाळला देखील जाण्याची हिम्मत होत नसे, अलीकडे मात्र अगदी उठसुठ शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सारे नियम डावलून परदेशात ये जा करतात ज्यांची भली मोठी यादी माझ्याकडे आहे. एक अतिशय भ्रष्ट असे निवृत्त प्रशासकीय अधिकारी तर एवढे निर्ढावलेले होते कि ते एकाचवेळी येथे नोकरी करायचे आणि इंग्लड अमेरिकेतला आपला व्यवसाय गुंतवणूक आणि तेथे असलेले कुटुंब सांभाळायचे तरीही त्यांचा साधा बाल देखील बाका झाला नाही विशेष म्हणजे या निर्लज्ज अधिकाऱ्याने दादागिरीच्या एवढ्या मर्यादा ओलांडल्या होत्या कि ते त्या त्या वेळेच्या त्यांच्या खात्याच्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला देखील सांगून निघायचे, मी चार दिवस येथे नसेल अमेरिकेत असेल किंवा अन्यत्र. यापुढे असे अजिबात घडता कामा नये कि शासकीय परवानगी न घेता शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी राजरोस परदेशात जाऊन गुंतवणूक करताहेत फिरून येताहेत व्यवसाय करताहेत शासनाला न जुमानता न घाबरता, आता तर फडणवीस राज आहे ज्याची एकदा का सटकली कि मग ते कोणाचेही नसतात. देशाबाहेर जातांना सर्व प्रकारच्या सरकारी नोकदारांनी परवानगी विना जाऊ नये असे कडक आदेश शासनाने काढायला हवे त्यावर नियम मोडणाऱ्यांना तातडीने योग्य ती शिक्षा देण्यात यावी…
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साधा पासपोर्ट जरी काढायचा असेल तर शासकीय परवानगी घेणे अत्यावश्यक असतांना बहुतेक सारेच नियम धाब्यावर ठेवून सतत थेट परदेशी ये जा करतात एवढे ते बिनधास्त आहेत. विना परवानगी परदेश दौरा करून आल्यानंतर आयकर खात्यातून रिबेट मिळविणारे हे शासनातले समस्त, हाच एक मोठा फ्रॉड आहे असे मला वाटते. फडणवीसजी, मंत्रालयामध्ये शासनाच्या विविध विभागात गेल्या कित्येक वर्षांपासून सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे वास्तविक हे नियमबाह्य आहे किंवा अशी भरती करू नये असे उच्च न्यायालयाचे आदेश असतांना त्या राजशिष्टाचार विभागात जसे साळवे, बेग, कुलकर्णी आहेत तसे इतरत्र देखील निवृत्तीनंतर मंत्रालयात काम करणारे कितीतरी आहेत. मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचार आणि बिनधास्त वृत्तीचे कुरण, ते मोठ्या खुबीने साफ करणे आता अत्यावश्यक आहे…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी