ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी एकदम शी शी !!
ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी विहिरीत उडी मारू नये, ज्यांना लैंगिक दुर्बलता आहे अशा पुरुशांनी लग्न करू नये तद्वत जे राजकीय दृष्ट्या अक्कलशून्य आहेत त्यांनी राजकीय भविष्य वर्तवून स्वतःचे हसे करून घेऊ नये. भविष्य वर्तविणारे तसेही मला एकप्रकारे लुटारू अधिक वाटतात किंवा लुटणे लुबाडणे फसविणे हेच भविष्य वर्तविणाऱ्या मंडळींचे काम असते. स्वतःला ऍस्ट्रोगुरु म्हणवून घ्यायचे आणि नेमके खोटे भविष्य सांगायचे वरून सांगायचे कि मला राजकारणातले फारसे कळत नाही, थेट सांगा कि तुम्हाला भविष्यातलेच काही कळत नाही. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत असे भविष्य वर्तविणाऱ्या कुठल्या तरी थापाड्या ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी, नेमके फडणवीसच मुख्यमंत्री झाले आणि बाई तोंडावर पडल्या मग सारवासारव करतांना त्यांनी एका मुलाखतीत कुठलेसे एका राजाचे अगदीच तकलादू कथानक जोडून सारवासारव कारण्याचा प्रयत्न केला वरून मला राजकारणातले फारसे काही कळत नाही अशी कबुली पण दिली थोडक्यात त्यांना राजकारणातले काही कळत नाही पेक्षा या तद्दन उथळ ऍस्ट्रोगुरुला भविष्यातलेच काही कळत नाही असे मला याठिकाणी जाहीर सांगावेसे वाटते. आजकाल अमुक एखाद्या नेत्याची पक्षाची सुपारी घायची किंवा निखिल वागळे पद्धतीने पूर्वग्रह दूषित पद्धतीने पत्रकारिता करायची हा आजकाल बहुतेक पत्रकारितेत किंवा वाहिन्यातील उथळ धंदा, अशावेळी ज्योती जोशी पद्धतीच्या केवळ बोलघेवड्या मंडळींना हाताशी धरून त्यांच्याकडून वाट्टेल ते वदवून घेणे त्यावर पैसा मिळविणे त्यातून हे घडते. सांगितलेले भविष्य फसल्यावर ज्योती जोशी म्हणाल्या मला राजकारणातले काही समजत नाही, अग बाई तुला भविष्यातलेच काही समजत नाही, उगाच जोशी आडनावाला बदनाम करू नको आणि सुपार्या घेत फडणविसांवर असले फाल्तुक भविष्य देखील वर्तविणे नको….
www.vikrantjoshi.com
ज्यांची जन्म वेळेनुसार अगदी तंतोतंत कुंडली तेही त्या त्या वेळी एखाद्या तज्ज्ञाकडून तयार केलेली असते त्यावरून फारतर नेमके भविष्य वर्तविल्या जाते किंवा जाऊ शकते, मात्र बहुतेक भारतिय उथळ भविष्य सांगणार्या या अशा ज्योती जोशी छाप लोकांच्या कींवा अमुक एखाद्या बुवाबाजीच्या नादी लागून बहुतेकवेळा वेळ आणि पैसा वाया घालवितात असे माझे स्पष्ट मत आहे किंवा तसा आलेला अनुभव आहे. भारतीय छोट्या मोठ्या संकटात खचतात घाबरतात हतबल होतात आणि हमखास बुवाबाजी किंवा ज्योती जोशी पद्धतीच्या उथळ मंडळींच्या मागे लागतात वरून आणखी आणखी फसवणूक करून घेतात, उशिराने त्यांच्या लक्षात येते कि आपली फार मोठी फसवणूक झालेली आहे. भारतीयांनी सतत सावध असावे यापद्धतीच्या लुटारूंकडून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. फडणवीसां विषयी खोटे भविष्य वर्तविल्याबद्दल कुठल्या या उथळ ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी यांनी लोकांची जाहीर माफी मागावी आणि पुन्हा असा आगाऊपणा आपल्या हातून घडणार नाही हेही जाहीर सांगावे….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी