शपथविधी भव्य दिव्य सोहळा आगळा वेगळा :
1980 ते आजतागायत कितीतरी शपथविधी बघितले पण 5 डिसेंबरचा शपथविधी याआधीच्या 2014 दरम्यान वानखेडे स्टेडियम मधल्या शपथविधी पेक्षाही अतिशय आगळा वेगळा कौतुकास्पद अभिमानास्पद भव्य असा सोहळा होता, आजतागायत अनेक मंत्रीमंडळे आली आणि गेली पण फारशी लक्षात राहणारी कधीही नव्हती, या सोहळ्याचे वैशिट्य असे कि फडणवीसांचे राज्यभरातून मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स आले होते त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते त्याहीपुढे संपूर्ण राज्यात ज्या पद्धतीने यावर्षी चक्क दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केल्या गेली ते बघून अक्षरश: डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पुणे मुंबई विदर्भात सगळीकडे चोहीकडे आनंदी आनंद ओसंडून वाहात होता जणू सारेच्या सारे हिंदू एकवटले होते आणि घराघरातून गावागावातून ढोलताशे बडवीत आनंदसागरात डुंबले होते थोडक्यात ज्या पद्धतीने फडणवीसांचा शपथविधी सोहळा संपूर्ण राज्यात साजरा केल्या गेला ते बघून मला शिवराज्याभिषेकाची किंवा राम सीता स्वयंवराची केवळ कथा सिनेमातून गाण्यातून अनुभवलेली आनंदयात्रा या शपथ विधी सोहळ्यानिमित्ते प्रत्यक्ष अनुभवता आली. फडणवीसांची मोदींच्या या लाडक्या लेकाची देशभरातली लोकप्रियता काय सांगावी, शपथविधी मंचावर त्या मोदींच्या अवतीभोवती या आश्वासक नेत्याचा कौतुकसोहळा बघण्यासाठी देशभरातला असा एकही मोठा नेता नव्हता ज्याने या शपथ समारंभाला हजेरी लावली नाही. बहुसंख्य केंद्रीय मंत्री विविध राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजपा अध्यक्ष नड्डाजी अमित शाह असे सारेच्या सारे मान्यवर फडणवीसांविषयीच्या प्रेमापोटी वेळात वेळ काढून एकत्र आले होते, या कौतुक सोहळ्याला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी राज्यभरातून आल्याने मला या समारंभाचा खर्या अर्थाने आयोजक असलेल्या मोहित कंबोजची काळजी वाटत होती कारण जराशी जरी आणीबाणी निर्माण झाली असती तरीही मोठे संकट ओढवले असते पण जमलेल्या साऱ्यांनी संपूर्ण समारंभ शांततेत निभावून नेला…
www.vikrantjoshi.com
काहींना चुगल्या करण्याची सवय असते काहींना सतत नकारात्मक बोलण्याची खोड असते. काहींना मधूनच मोठ्यांदा पादण्याची सवय असते तशी मला अनेकदा अनेक राजकीय गुपिते उघड करण्याची सवय आहे हे आता तुम्हालाही माहित झाले आहे. आज फडणवीसांचे इतरांना फारसे माहित नसलेले गुपित येथे मला उघड करायचे आहे. या शपथविधी सोहळ्याला व्हीव्हीआयपी प्रवर्गात पहिल्या तीन रांगा फिल्मस्टार्स आणि बड्या उद्योगपतींसाठी सोडलेल्या होत्या आणि चौथ्या रांगेत जे फडणवीसांना अतिशय जवळचे नातेवाईक आणि मित्र आहेत त्या साऱ्यांची उपस्थिती मम मनाला यासाठी भारावून गेली कारण ते सारेच्या सारे फडणवीस यांच्या सर्वाधिक जवळचे असूनही आजतागायत मला कधीही पुढे पुढे करतांना किंवा फडणवीसांच्या नावाचा गैरफायदा घेतांना चुकूनही आढळली नाहीत किंबहुना जमलेले हेजिवलग मित्र आणि कुटुंब सदस्य आम्ही कसे फडणवीसांना जवळचे असे ना दर्शविणारे त्यामुळे इतर जमलेले त्यांच्याकडे कायम एखादया तिऱ्हाईतासारखे बघणारे असतात म्हणजे शैलेश जोगळेकर फडणवीसांना एवढ्या जवळचे कि त्या दोघानांही झोपेत एकाचवेळी म्हणे एकसारखी स्वोने पडतात पण हेच जोगळेकर त्या सागर बंगल्यावर आल्यानंतर कोपऱ्यातल्या साध्या टायपिस्टच्या खुर्चीवर शांतपणे बसून आपल्या कामात गर्क होतात, काम आटोपले कि खालची मान वर न करता कुठलाही उथळ रुबाब न दाखवता मुकाट्याने बाहेर पडतात थोडक्यात चहा पेक्षा किटली गरम असे यातल्या एकाचेही वागणे बोलणे अजिबात नसते…
देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्याला फडणवीसांच्या या कुटुंब सदस्यांच्या रांगेत मी मुद्दाम जागा मिळविली कारण त्या साऱ्यांना मी जवळून बघतो ओळखतो त्यांच्याकडे अतिशय आदराने बघतो. याच शैलेश जोगळेकर यांची मुलगी आणि जावई किंवा फडणवीसांचे बालपणापासून असलेले शाळकरी मित्र आल्हाद राजे, शैलेश जोगळेकर आणि अमोल काळे, कालच्या समारंभात अमोल यांचे नसणे मनाला अस्वस्थ करून गेले पत्नी मीनल सहकुटुंब आल्या होत्या, आल्हाद यांची नेपाळ राजघरण्यातल्या पत्नी शीतल किंवा देवेंद्र यांच्या मामांकडले अमरावतीचे कलोती कुटुंब सारेच्या सारे कुठेही आम्ही कसे फडणवीसांचे कुटुंब सदस्य या तोऱ्यात मिरवितांना ना दिसले ना तसे वागले. माझ्या शेजारी त्यांचा नागपुरातला शाळकरी बडा उद्योगपती मित्र दीपेन अग्रवाल तर एखाद्या लहान मुलासारखा मोठ्यांदा आवाज काढून समारंभ एन्जॉय करीत होता. मुंबईकर उद्योगपती आणि फिल्मस्टार्स इतरही अनेक मान्यवर, जबरदस्तीने आलो, असे त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही भाव नव्हते आणि शपथ घेतांना ज्या पद्धतीने फडणवीस यांचे जमलेल्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले तेच स्वागत त्यांनी शिंदेंच्या म्हणाल तर त्यागाला म्हणाल तर दिलदार वृत्तीला मनापासून केले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी