बामन देवा, समस्त मराठा आणि निवडणुका :
ज्यांना मोगल काळापासून अनेक संकटांना तोंड देत मोगल मुस्लिमांशी जीवघेणा सामना करावा लागला राज्यातील त्या समस्त मराठ्यांनी महाआघाडीकडे पूर्णतः पाठ फिरविली आणि फडणवीसांच्या महायुतीविषयी विष कालवणार्या महाआघाडीच्या नेत्यांना वाकुल्या दाखवत राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या समस्त मराठा मतदारांनी साऱ्यांना आश्चर्याचा धक्का देत महायुतीच्या विजयात मोलाची महत्वाची भूमिका पार पाडली. थोडक्यात जे लोकसभेला घडले ते विधानसभा निवडणुकीला अजिबात घडले नाही, कोणत्याही नेत्यांच्या भूलथापांना अजिबात बळी न पडता जवळपास सारेच मराठे आश्चर्याचा धक्का देत शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्या महाआघाडीकडे पाठ फिरवून ते अत्यानंदाने फडणवीस शिंदे आणि अजितदादांच्या महायुतीला मनापासून सहकार्य करून मतदान करून त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यात फार मोठे योगदान दिले. आश्चर्य म्हणजे समस्त मराठ्यांकडून देवेंद्र फडणवीसांना आश्वासक नेता म्हणून मिळलेली पसंती स्वतः फडणवीस ज्याला त्याला सांगताहेत कि मराठा मतदारांची कौतुकास्पद पाठिवर थाप आणि पसंतीची पावती त्यांना यादिवसात मनापासून सुखावते आहे….
www.vikrantjoshi.com
या विधानसभेला घडलेला आता आणखी एक विशेषतः महायुतीच्या बाबतीत कौतुकास्पद अभिमानास्पद प्रकार सांगतो आणि वाईट याचे वाटते कि वयानुपरत्वे त्या महान व्यक्तीला पश्चिम महाराष्ट्रपलीकडे फिरता आले नाही अन्यथा आणखी काहीतरी वेगळे चमत्कार या निवडणूक निकालात तुम्हाला नक्की पाहायला मिळाले असते. तुम्हाला हे कदाचित कानावर पडले नसेल पण शरद पवार यांना अप्रत्यक्ष आव्हान देत ज्या एका वृद्धाने केवळ हिंदुत्वाच्या प्रखर देश प्रेमातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक उमेदवार म्हणजे आपल्या अनुयायांना निवडून आणण्यात फार मोठी जबाबदारी पार पाडली ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते संभाजी भिडे गुरुजी, त्यांची या वयातली पायपीट आणि सततचा लोकांशी सुसंवाद आणि संपर्क नाही म्हणायला भिडे गुरुजी यांच्या प्रयत्नांतून प्रचारातून तुळजापूरचे राणा जगजितसिंह पाटील, भोर मुळशीचे शंकर मांडेकर, शिराळ्याचे सत्यजित शिवाजीराव देशमुख, कराड उत्तरचे मनोज घोरपडे, इचलकरंजीचे राहुल प्रकाश आवडे, कोल्हापूर दक्षिणचे अमल महाडिक, कराड दक्षिणचे अतुल भोसले, भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडचे शंकर शेठ जगताप, खानापूरचे सुहास बाबर, हातकणंगलेचे अशोक माने इत्यादींना निवडणून आणण्यात भिडे गुरुजी यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य महाआघाडीच्या नेत्यांना किंवा शरद पवारांना देखील फार अस्वस्थ करून गेले. सतत भिडे गुरुजींच्या विरोधात भडकविणार्या शरद पवारांना तुमच्यापेक्षा महागुरू संभाजी भिडे आम्हाला कसे अधिक जवळचे आणि प्राणप्रिय हे त्या त्या मतदारांनी आणि मराठा कुणबी समाजाने देखील मतपेटीतून पवारांना दाखवून दिले. असे राज्याच्या प्रत्येक प्रांतात जर भिडे गुरुजी जन्माला आले तर हिंदुत्वाचे श्रेष्ठत्व कधीच कमी होणार नाही…
लोकसभेचे निकाल हिंदुत्वविरोधात आल्यानंतर पायाला भिंगरी लागल्यागत महाराष्ट्रातील जे दूरदूरपर्यंत संघ भाजपाशी अजिबात संबंधित नव्हते पण प्रखर हिंदुत्ववादी होते अशा वारकऱ्यांनी त्यांच्या मंडळांनी किंवा संत, कीर्तनकार, भारुडकार, प्रवचनकार मान्यवर लोकप्रिय शिक्षकांनी किंवा समस्त भजनी मंडळांनी क्षणाचीही उसंत न घेता विशेष म्हणजे मुस्लिम द्वेष किंवा राग जिभेवर न आणता प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणीत लोकांमध्ये जे आमूलाग्र मत परिवर्तन घडवून आणले ती प्रेरणा घेत मुख्यत्वे समस्त हिंदू मोठ्या प्रमाणावर मतदानाला तर उतरलेच पण मुस्लिम धार्जिणी भूमिका घेणाऱ्या महाआघाडीच्या उमेदवारांविरोधात जेथे तेथे मतदान करून आले. महायुतीचे यश अमुक एका मुद्दयांवर मिळाले असे अजिबात नाही किंबहुना त्यात अनेक निर्णयांचा सार्वजिनक कामांचा जसा मोठा सहभाग आहे त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशामागील सूत्रधार होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर सहकार्यवाह अतुलजी लिमये. आपल्या कुशल संघटन कौशल्याने आणि रणनीतीने त्यांनी महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने आणून ठेवला. राज्याच्या कानाकोपऱ्यातला एकही स्वयंसेवक भूक तहान विसरून प्रसंगी घरची शिदोरी खाऊन वणवण भटकून त्याने मतदारांची मने आणि मते फिरविली नाहीत जिंकली नाहीत असे घडले नाही. आधी लगीन कोंढाण्याचे भूमिकेत शिरून संघ स्वयंसेवकांनी शेवटच्या पंधरा दिवसात तर घरातली प्रसंगी सारी महत्वाची कामे बाजूला ठेवून केली ती प्रचारासाठी फक्त पायपीट. हिंदुत्व जागे झाले तर काय घडते हे प्रखर देशभक्तांनी महाराष्ट्रात यावेळी दाखवून दिले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी