महायुती अशी पुरून उरली,
महाआघाडी खड्ड्यात गेली :
आजपर्यंत मुस्लिम खतरेमें अशी मशिदीतून बांग देण्याचा अवकाश कि लगेच मुसलमान हिरव्या झेंड्याखाली एकत्र जमायचे विरोधकांवर तुटून पडायचे, यावेळी मात्र नेमके वेगळे घडले, मुसलमान आणि महाआघाडीमुळे हिंदुत्व कसे खतरेमे, याचा नेमका प्रचार आणि प्रसार महायुतीच्या पथ्यावर पडला आणि बघता बघता राज्याच्या कानाकोपऱ्यातले समस्त हिंदू येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्याने आजतागायत कधी नव्हे ते एकमेकांच्या कानात सांगत एकत्र आले विशेष म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात मतदान केले जे अद्याप महायुती विरोधकांच्या पचनी न पडल्याने आधी ते अवाक झाले कोड्यात पडले आणि नेमके उत्तर न सापडल्याने त्यांनी मतदान यंत्रणेवर विनाकारण आगपाखड करयला सुरुवात केली आहे. आधी आपण फक्त हिंदू आहोत त्यानंतर आपला पक्ष जात किंवा आवडत्या नावडत्या नेत्यांविषयीची आपली भूमिका यावर समस्त हिंदू ठाम होते त्यातून त्यांनी उघड आणि कट्टर हिंदुत्व स्वीकारणाऱ्या महायुतीला मतदान केले तिकडे उद्धव ठाकरे असूनही त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि मुसलमानांचे लांगुलचालन करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला पार अडगळीत नेऊन सोडले, यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे महाआघाडीतून तातडीने बाहेर पडण्याचे नक्की केले आहे ती कृती तातडीने प्रत्यक्षात उतरवली नाही तर उद्धव ठाकरे एकेकाळी आपले अत्यंत आवडते नेते होते हे राज्यातले हिंदू झपाट्याने विसरून मोकळे होतील. अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि ज्या महायुतीला राज्यातल्या समस्त मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्दयांवर धारेवर धरले होते, त्याच मराठ्यांनी त्यांना सतत भडकविणाऱ्या शरद पवारांच्या महाआघाडीकडे केवळ कट्टर हिंदू या नात्याने पूर्णतः या निवडणुकीत पाठ फिरविली आणि महायुतीला एकगठ्ठा मतदान करून मराठेतर मंडळींच्या मनात त्यांच्याविषयीचा अलीकडे निर्माण झालेला राग द्वेष आणि गैरसमज समस्त मराठा कुणब्यांनी विधान सभा निवडणुकीतून पूर्णतः संपविलेला आहे. विदर्भ आणि कोकणात जर अमुक एखाद्या पक्षाच्या बाजूने स्थानिक कुणबी समाज नसेल तर एखाद्या बलाढ्य पक्षाला देखील धारातीर्थ पडावे लागते त्यातूनच लोकसभेला महायुतीची जी प्रचंड हानी झाली होती यावेळी याठिकाणी मराठा कुणबी समाज पुन्हा महायुतीच्या बाजूने झुकल्याने वेगळे निकाल बाहेर आले…
www.vikrantjoshi.com
मध्य प्रदेशातल्या शिवराजसिंह चौहान यांच्या पावलावर पाऊल ठेवत एकनाथ शिंदे यांच्या अफलातून डोक्यात आलेली लाडकी बहीण योजना, अर्थात या योजनेमुळे तिकडे जसे शिवराजसिंह मुख्यमंत्री झाले नाही येथेही एकनाथजींच्या बाबतीत नेमके तेच घडले आहे अर्थात यातला गमतीचा भाग सोडा पण लाडक्या बहिण योजनेचा प्रत्येक घरात एवढा सकारात्मक इफेक्ट मी याआधी कधीही बघितलेला नाही म्हणजे कुटुंबातल्या समस्त महिलांनी प्रेमाने घरातल्या पुरुषांना थेट धमकावून आणि शपथ देऊन सांगितले होते कि काहीही झाले तरी आपल्याला मतदान करायचे आहेच तेही केवळ महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करायचे आहे. महायुतीने आणलेल्या साऱ्या योजना जर आम्ही सत्तेत आलो तर एका क्षणात रद्द करू, उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा चुकीचा मेसेज गेला आणि मागच्यासारखे यावेळी देखील उद्धव ठाकरे सारेच निर्णय रद्द करून राज्याचे गरिबांचे महिलांचे मोठे नुकसान करतील त्यातून मतदार सावध होत त्यांनी एकगठ्ठा मतदान महायुतीला केले. समस्त भारतीय मतदारांचे वैशिट्य असे कि त्यांनी नेमके कोणाला मतदान केले हे ते सांगायचे टाळतात त्यामुळे महायुतीला हिंदूंचे मतदान मोठ्या प्रमाणावर होते आहे हे अगदी निकाल बाहेर येईपर्यंत महाआघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या ते लक्षातच आले नाही म्हणून त्यांना पराभवाचा धक्का सहन झाला नाही, त्यांना नैराश्याने गाठले आहे. सुशिक्षित हिंदू मतदार बांगला देशात सत्ता पलटी दरम्यान हिंदूंवर झालेले अत्याचार विसरले नव्हते आणि मुसलमानांच्या वादग्रस्त भूमिकेचे वृत्रीचे होणारे दुष्परिणाम विशेषतः संघ भाजपा परिवार उभ्या राज्यातल्या व्हाट्सअप ग्रुपवरून पुरावे देत ज्यापद्धतीने हिंदू मतदारांशी अप्रत्यक्ष सतत संपर्क साधून होते त्यातून विशेषतः विविध विचारांचे असूनही हिंदू तरुण आणि एकूणच मतदार पूर्णतः महायुतीकडे झुकले होते त्यांनी तडफेने मतदान केले जणू अप्रत्यक्ष मुसलमानांना या हिंदू तरुण मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली. आपल्याला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे हे थेट महायुतीच्या उमेदवारांना देखील माहित नव्हते एवढी गुप्तता हिंदू मतदारांनी पाळली किंबहुना घरात सुद्धा त्यांनी त्यावर चर्चा कारण्याचे टाळले होते. हि नाही म्हणायला थोड्या अधिक प्रमाणात फडणवीस शिंदे आणि महायुतीची लाट होती त्यापेक्षा मी म्हणेन हि जबरदस्त हिंदुत्वाची लाट होती, हिंदू एकत्र आले असले तर मुस्लिम विचारांचा ते एका क्षणात कसा सुफडासाफ करतात, राज्यातल्या मर्द हिंदू मतदारांनी ते उभ्या देशाला दाखवून दिले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी