नेमके असे घडले, फडणवीस तसे पुरून उरले :
रा स्व संघासाठी सुरुवातीची काही वर्षे अतिशय कटकटीची दगदगीची धकाधकीची आणि जीवघेणी होती मोठ्या संघर्षाची होती त्यात त्यांच्याकडे ना पैसा होता ना पुरेसे संख्याबळ होते केवळ कणखर मानसिकता आणि प्रखर देशप्रेमाच्या भरवशावर अख्खे कुटुंब हिंदुत्वासाठी लढत झगडत होते, त्या दिवसात जे माझे वडील मला कायम सांगायचे तेच गंगाधरराव फडणवीस देखील जाण्याआधी लहानग्या देवेंद्रला सांगून गेले. वडील सांगायचे, हेमंत अतिशय लहान वयात तू खिशात पैसे नसतांना घराबाहेर पडतोय, पण एक लक्षात ठेव कि ज्या गावात स्थिरावशील तेथल्या साऱ्यात मोठ्या पैलवानाला दादाला गुंडाला त्याची भर चौकात कॉलर पकडून, त्याची जागा दाखवून द्यायची त्यानंतर आपोआप सारे गाव तुम्हाला घाबरायला लागते आणि मी घराबाहेर पडल्यानंतर तेच केले जे नेमके देवेंद्र फडणवीसांनी देखील केले करून दाखविले, देवेंद्र नागपुरात साधे नगरसेवक असल्यापासून तर आजचे प्रचंड यशस्वी नेते देवेंद्र, त्यांनी ज्या क्षेत्रात ते होते किंवा आहेत तेथल्या सर्वात बलाढ्य पैलवानाला ते आधी भिडले त्यानंतर त्यांचे काम सोपे झाले सोपे होते. आज आपण दमके कोठे आहोत किंवा जेथे आहोत तेथे नेमका सर्वाधिक ताकदवान पैलवान कोण कोणता आणि तो कसा याचा ते आधी विचसार करतात त्या त्या पैलवानांचा नकळत अभ्यास करतात त्यानंतर त्याला बेसावध ठेवत असा काही खिंडीत गाठतात कि पैलवानाला त्यानंतर पळता भुई थोडी होते. आता आणखी एक गुपित फोडतो नंतर नेमक्या विषयाला हात घालतो. राज्यातल्या संघ आणि भाजपा मधल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीचे माझ्याविषयी अतिशय वाईट मत यासाठी आहे कारण त्यांच्या मते मी दुल्हे राजा मधल्या जॉनी लिव्हरच्या भूमिकेत सदैव त्यांच्या आसपास वावरत असतो म्हणजे त्यांच्याकडून नेमकी माहिती घेत असतांना त्यांना उगाचच वाटत् राहते कि मी त्यांचा खास माणूस आहे पण जेव्हा मी त्यांच्या कडून घेतलेली नेमकी माहिती लेखातून किंवा व्हिडिओतून उघड करतो तेव्हा त्यांच्या ते लक्षात येते कि हा आपल्यासाठी केवळ जॉनी लिव्हर थोडक्यात हेमंत जोशी हा सर्वसामान्यांचा खबऱ्या आहे….
www.vikrantjoshi.com
आता फडणवीसांचे गुपित फोडतो. राज्याच्या राजकारणात उतरल्यानंतर आपल्याला साम दाम दंड आणि भेद चारही बाबतीत अतिशय तुल्यबळ असलेल्या शरद पैलवानाला चारी मुंड्या चीत आणि चिट करायचे आहे थोडक्यात एकदा का समुद्रात पोहायचा उत्तम सराव झाला कि नदी नाल्यांमध्ये पोहताना काहीही वाटणार नाही किंवा अभिनयात एकदा का अमिताभ आपल्यासमोर फिका पडला कि त्यानंतर सुपरस्टार पद आपोआप आपल्याकडे चालून येईल हे सारे फडणवीसांच्या लक्षात आले किंवा त्यांना ते वाक्य आठवले कि गावातल्या पैलवानाला चारी मुंड्या चीत केले कि सारे गाव आपोआप घाबरायला लागते, त्यांनी नेमके तेच केले, आधी पवारांचा त्यांच्या वागण्या बोलण्याचा डावपेचांचा सखोल त्यांच्या भोवताली असलेल्या प्रत्येकाचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्या ते लक्षात आले कि केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या भरवशावर तेथल्या काही दिग्गज ताकदवान राजकीय घराण्यांच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर शरद पवार सतत कायम राज्यातले आणि देशातले सत्ताकारण आणि राजकारण गाजवून सोडतात, एखाद्या बलाढ्य राजकीय नेत्याला किंवा पक्षाला देखील ते केवळ या पश्चिम महाराष्ट्राच्या भरवंशावर घाम फोडतात, स्वतःला हवे ते पदरात पडून घेतात. विशेष म्हणजे 2014 मध्ये मुख्यमंत्री होण्याआधीच फडणवीसांनी शरद पवार आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीचा सखोल तंतोतंत अभ्यास करून तेथे भाजपा आणि संघाच्या मोजक्या मंडळींसह खोलवर पाय रोवायला सुरुवात केली, आणि हीच त्यांच्या राजकीय परिपकवतेची पहिली मोस्ट मॅच्युअर्ड झलक होती. पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूरचे मोहिते पाटील पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील सातारचे भोसले काका पुतणे अशी अनेक ताकदवान राजकीय घराणे होती जी शरद पवार यांच्या डावपेचांना धूर्त स्वार्थी राजकारणाला मनापासून कंटाळली होती पण पवारांच्या विरोधात जायचे म्हणजे स्वतःचा क्षणार्धात विजय सिंह मोहिते पाटील करून घ्यायचा हेच प्रत्येकाच्या डोक्यात असल्याने पवार यांच्या बाजूचे आणि विरोधातले सारेच नेते पवारांना अतिशय दबकून घाबरून वचकून होते…
एखादा आर आर पाटील पद्धतीचा नेता जर पवारांना प्रसंगी आव्हान देत पुढे जात असेल अशावेळी पवार त्याचा एकतर राजकीय खात्मा करायचे किंवा त्याला आपल्याकडे ओढून मांडलिकत्व पत्करायला भाग पाडायचे. अजित पवारांचे देखील फारसे वेगळे नव्हते ते तर काकांच्या दबावाखाली पार वैतागले होते कंटाळले होते काकांपासून विभक्त होण्यासाठी मोठ्या संधीच्या शोधात होते पण काकांना तेही वचकून असल्यांने फारतर अधून मधून ते जाहीर कुरकुर करायचे आणि रडणाऱ्या बाळाला आईने दूध पाजण्यासाठी अंगावर घेतले कि ते बाळ जसे पुढल्या क्षणी उगी होते तेच काकांनी एकदा का तेही घुश्यातच जवळ घेतले कि अजित बाळ लगेच शांत व्हायचे आणि पुढल्या क्षणी बंडाची भाषा संपवून हेच दादा जोरजोराने हसायला लागायचे. अशी बारीक सारीक निरीक्षणे न्याहाळीत फडणवीसांनी जणू इंग्रजांच्या पावलावर पाऊल ठेवत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मुंडे महाजनांच्या मृत्यूनंतर मोठी जोखीम पत्करीत प्रवेश केला आणि पवारांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळलेल्या अनेक दिग्गज घराण्यांना आपल्या वागण्या बोलण्याने आणि सर्वोतपरी सहकार्य करण्याच्या पारदर्शी भूमिकेतून लवकरच आपलेसे करायला सुरुवात केली विशेष आश्चर्य म्हणजे अगदी सुरुवातीलाच पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या अजित पवार आणि सातारचे भोसले घराणे थेट फडणवीसांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले तेवढ्यात शरद पवारांचे खानदानी राजकीय शत्रू इंदापूरचे हर्षवर्धन पाटील तर थेट भाजपामध्ये दाखल होत शरद पवारांना वाकुल्या दाखवायला लागले….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी