हिरो पुरुषोत्तम खेडेकर, परतले पूर्वीच्या भूमिकेवर :
अमुक एखाद्या नेत्याच्या भूमिकेची जनता खिल्ली उडविते थट्टा करते जे मला ग्रामीण भागात विशेषतः पाहायला ऐकायला मिळाले म्हणजे जो तो त्या संजय राऊतांच्या अलिकडल्या बदललेल्या भूमिकेवर त्यांची थट्टा उडविताना दिसले म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत खुलेआम सतत जाहीर कायम अतिशय जहरी टीका करीत होते, महायुती हि योजना कायमची बंद करेल, निवडणुकीनंतर भगिनींना आपली फसवणूक झाली महायुतीने फसवणूक केली हे म्हणण्याची वेळ येईल असे जे वारंवार संजय राऊत सांगायचे आज तेच राऊत आणि त्यांची शिवसेना, भगिनींना आम्ही महिन्याला दोन नव्हे तर तीन हजार रुपये देऊ, सांगताहेत त्यावर त्यांच्या या बदललेल्या भूमिकेवर राज्यातले सारेच थट्टा करताहेत, मोठ्यांदा हसताहेत. त्याचवेळी मराठा सेवा संघाच्या जन्मदात्याने म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील आपली भूमिका नेमकी विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर बदलली असतांना त्यांच्या या बदलत्या भूमिकेचे मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषतः समस्त मराठ्यांमध्ये कौतुक केल्या जाते आहे किंबहुना मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी जी त्यांची पूर्वीची कडवी जहाल अशी हिंदुत्ववादी भूमिका पुन्हा घेतली आहे जे त्यांनी चक्क पत्रक काढून जाहीर केले आहे, माझी समस्त मीडियाला किंवा लोकप्रिय व्हाट्सअप ग्रुप्सला हात जोडून विनंती आहे कि पुरुषोत्तम खेडेकर यांनी नव्याने जी भूमिका घेतली आहे ज्या भूमिकेवर त्यांनी एक पत्रक देखील काढले आहे कृपया त्या पत्रकाला प्रसिद्धी देत विशेषतः खेडेकर यांनी त्यांची जी बदनामी सतत केल्या जाते कि ते शरद पवार यांचे प्यादे म्हणून काम करतात त्या पवारांना त्यांनी कशी आयुष्याच्या संध्याकाळी जागा दाखवून दिली आहे ते प्रामुख्याने मराठेतर जनतेला सतत यादिवसात पटवून सांगावे…
www.vikrantjoshi.com
पुरुषोत्तम खेडेकर यांनी भूमिका का बदलली त्यावर त्यांच्या काही जवळच्या विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांनी, खेडेकर का बदलले असावेत त्यावर मला नेमक्या शब्दात समजावून सांगितले.रेखाताई आणि पुरुषोत्तमम दाजी दोघेही तसे सुरुवातीपासून कट्टर हिंदुत्ववादी किंबहुना एकेकाळी भाजपाच्या आमदार असलेल्या रेखाताईंचे फार मोठे राजकीय नुकसान एकतर पुरुषोत्तम खेडेकरांमुळे झाले म्हणजे खेडेकर यांच्या वादग्रस्त भूमिकेतून भाजपाच्या एकेकाळी रेखाताई अत्यंत यशस्वी अशा नेत्या, भाजपा नेत्यांचा पक्षाचा त्यांच्यावर मनापासून लोभ असतानाही त्या अडगळीत सापडल्या विशेष म्हणजे शरद पवार यांनी याच खेडेकर दाम्पत्याचा मराठ्यांना भडकवितांना त्यांना इतर समाजापासून वेगळे करण्यासाठी किंवा आरक्षणाच्या आंदोलनात देखील अत्यंत महत्वाचे म्हणजे उभ्या राज्यातले जे समस्त मराठा शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव फक्त आणि फक्त पुरुषोत्तम खेडेकर यांचा आहे त्यांना महायुती पासून दूर नेण्यात मोठ्या खुबीने खेडेकर यांचा वापर करून घेतला पण ज्या रेखाताई एकेकाळी राजकारणातल्या सक्षम धुरंदर नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या त्यांना किंवा त्यांच्या पुढल्या पिढीला याच पवारांनी कधीही काहीही दिले नाही, राजकीय पटलावरून रेखाताई कायमच्या विस्मृतीत गेल्या. अत्यंत महत्वाचे म्हणजे खेडेकर दाम्पत्य अतिशय कडवे शिवराय भक्त आहेत ज्यांना शरद पवार उद्धव ठाकरे मनोज जरांगे आणि महाआघाडीची मुस्लिम धार्जिणी भूमिका त्यांचे सततचे यांच्याकडून होणारे लांगुलचालन अजिबात पटले नाही रुचले नाही आवडले नाही म्हणून धाडसी पराक्रमी कडवे हिंदू पुरुषोत्तम खेडेकर यांनी चक्क एक पत्रक काढून मोठा झटका महाआघाडीला दिला आहे, महाराष्ट्राला जिजाऊ व शिवरायांच्या विचारांचे समृद्ध सरकार मिळो अशी सदिच्छा त्यांनी यात व्यक्त केली आहे थोडक्यात मुस्लिमांना जवळ करणारे म्हणजे शिवरायांचे कट्टर शत्रू मुसलमानांना बिलगणाऱ्या महाआघाडीला पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट फाट्यावर मारले आहे…
जे महायुतीला नेमके लागू पडते तेच येथे खेडेकर लिहितात, ‘ राज्यात सर्वसमावेशक तसेच लोककल्याणकारी योजना राबविणारे सहिष्णू, बंधुभावाचे जतन करून आनंददायी व सुखदायक वातावरण निर्माण होईल असे सरकार निवडून आणण्यासाठी न चुकता पण काळजीपूर्वक मतदान करावे ‘ थोडक्यात खेडेकर यांचे हे संपूर्ण पत्रक नेमके महायुतीला लागू पडणारे आणि महाआघाडीचा कुठेही उल्लेख न करता, मुस्लिम धार्जिण्या थोडक्यात जिजाऊ आणि शिवरायांच्या शत्रूंना जवळ करणाऱ्या महाआघाडीला मतदान न करण्याचे अतिशय युक्तीने चतुराईने खेडेकर यांनी आवाहन केले आहे. या निवडणुका पार पडू द्या पण त्यानंतर मात्र माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आधुनिक लढाऊ जिजाऊ रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर यांना पुन्हा एकदा राजतल्या भाजपाने विशेषतः त्यांच्या आणखी एका लाडक्या आवडत्या भावाने देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मुख्य प्रवाहात आणावे असा आग्रह धरण्यासाठी मी त्यांच्या काही नेत्यांना नक्की गळ घालणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी