अब आयेगा असली खेल का मजा :
बघा रा स्व संघाच्या डोक्यातून एखादी कल्पना संकल्पना जन्म घेते सुदैवाने केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने अशा एखाद्या कल्पनेला योजनेला त्यामुळे लगेचच प्रत्यक्ष जन्म दिला जातो. तुमच्या ते कितपत लक्षात आले मला माही नाही पण केवळ दहा वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थान जगामध्ये विविध प्राचीन दर्जेदार हिंदुत्वाचे प्रतीक अशा मंदिरांच्या पर्यटनासाठी ओळखल्या जावा त्यासाठी आधी हिंदुस्थानात असलेल्या यापद्धतीच्या पर्यटनासाठी पोषक अशा मंदिराचा पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा असे सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान मोदींना आग्रहाने सांगितले त्यांच्यासमोर तयार केल्या गेलेली मंदिरांची माहिती फोटो उपयुक्तता त्रुटी सारे काही अभ्यासपूर्ण विस्ताराने मांडण्यात आले आणि मोदी तयारीला लागले, माझी खात्री आहे कि 2030 नंतर किंवा त्याआधीच संपूर्ण हिंदुस्थान मंदिरांच्या पर्यटनासाठीचा देश म्हणून पर्यटकांचा सर्वाधिक लाडका देश असेल, आजतागायत पर्यटनातून उत्पन्नाच्या बाबतीत अगदीच त्रोटक असा देश म्हणून हिंदुस्थान ओळखल्या जायचा नजीकच्या काळात हिंदुस्थानला पर्यटनातून सर्वात अधिक उत्पन्न मिळेल त्यावर विद्यमान केंद्र सरकार तातडीचे निर्णय घेत ते लगेच अमलात आणल्या जाताहेत. मंदिरांचा झपाट्याने केल्या जाणारा विकास जीर्णोद्धार अचंबित करणारा आहे अर्थात हा मुद्दा मला राज्यातल्या महायुती सरकारमुळे आठवला….
www.vikrantjoshi.com
सतत 45 वर्षे फक्त आणि फक्त राजकीय पत्रकारिता, त्यामुळे आजतागायतच्या राज्यकर्त्यांचे विविध बारकावे मला तोंडपाठ आहेत म्हणजे बोटावर मोजता येतील अशा काही मंत्र्यांची कामगिरी थक्क करणारी असते जसे 10+2+3 हा शिक्षणातला आमूलाग्र बदल जर एकेकाळचे शिक्षणमंत्री मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांनी उत्तमरीत्या राबविला नसता तर आपले विद्यार्थी आजही इतर भारतीयांच्या तुलनेत अडाणी अज्ञानी म्हणून ओळखल्या गेले असते वरून त्यांना जागतिक स्तरावर कुठेही स्थान मिळाले नसते किंवा सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल केवळ त्या खात्याचे मंत्री या नात्याने नितीन गडकरी यांनी आधी राज्यात त्यानंतर केंद्रात घडवून आणले नंतर थेट भारताला रस्ते आणि पुलांच्या बाबतीत अमेरिकेशेजारी जवळपास आणून बसविले तेच दिवंगत आर आर पाटलांबाबत येथे मला सांगता येईल, राज्यातल्या ग्रामविकासाचा विकास या खात्याचे महायुतीचे मंत्री या नात्याने गिरीश महाजन यांची कामगिरी कौतुकास्पद आहे पण राज्यातल्या प्रत्येक खेड्याचा झपाट्याने विकास हा तेथल्याच ग्रामस्थांना हाताशी धरत वरून त्यांना शासकीय आर्थिक मदत देऊन कसा अति जलद पद्धतीने करून घ्यायचा असतो त्याचे श्रेय काल आज आणि उद्या केवळ आर आर पाटलांना देण्यात येईल. आर आर पाटील ग्रामविकास खात्याचे मंत्री असतांना संपूर्ण खेड्यांमधून संचारलेला उत्साह त्यातून खेड्यांची झालेली प्रगती थक्क करणारी होती…
किस्सा तसा पूर्वीचा आहे पण आज तो त्या महायुती सरकारमुळे आठवला. पूर्वी माझ्या शेजारी जलपा नावाची गोरो गोमटी सुंदर तरुण आँटी राहायची, तिचा माझ्यावर विशेष लोभ होता, संध्याकाळी घरी परतल्यानंतर मला भांडी घासावी लागायची बघून तिच्या डोळ्यात मी एकदा अश्रू पण बघितले, मग मीच तिला सांगितलं कि मला एखादी छान भांडेवाली शोधून दे, त्यानंतर काही दिवसांनी मी नेमकी भांडी विसळत असतांना जलपा एका बाईला घेऊन आली, मला हायसे वाटले, बरे झाले माझ्यासाठी बाई शोधली, मी तिला म्हणताच, जलपा उत्तरली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही कशी उत्तम भांडी घासता ते दाखवायला मी माझ्या बाईला आणले आहे !! नेमके हे असेच विद्यमान महायुती सरकार विषयी मला येथे सांगायचे आहे कि चौधरी गडकरी आर आर आबा हे केवळ एका खात्यासाठी उत्तम कामगिरी पार पाडणारे त्या त्या वेळेचे मंत्री पण ज्या पद्धतीने केवळ अडीच वर्षात या सरकारने झपाटल्यागत निर्णय घेऊन ते फक्त कागदावर न ठेवता म्हणजे पब्लिकला च्यू न बनवता थेट प्रत्यक्ष तात्काळ अमलात आणले, हे आजतागायत मी फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ वगळता ना कधी अनुभवले ना कधी बघितले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजतागायत नक्की काय घडत होते तेही तुम्हाला सांगतो. नेमके जनतेच्या उपयोगाचे निर्णय घेऊन हे सरकार कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील असे काम करायचे असे शिंदे आणि फडणवीसांनी एकत्र बसून अगदी सुरुवातीला ठरविले त्यावर त्यांना राज्यातले त्या त्या विषयातले जे तद्न्य आहेत ते अमुक एखादी योजना समोर मांडायचे त्यानंतर लगेच ज्या खात्याचा तो निर्णय त्या खात्याच्या सचिवांना आणि मंत्र्यांना विश्वासात घेत लगेच पुढल्या काही दिवसात निर्णय जाहीर केल्या जायचा त्यानंतर वेळ न घालविता त्यावर अंमलबजावणीला सुरुवात केल्या जायची. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे पुढे येणाऱ्या नव्या सरकारला किमान दहा वर्षे आता काहीही वेगळे करण्याची कोणतेही ठोस निर्णय घेण्याची अजिबातच गरज यासाठी नाही कारण या महायुतीने जे निर्णय घेतले आहेत ते त्यांनी फक्त जसेच्या तसे राबविले तरीही जनता त्यांना अगदी शंभर टक्के डोक्यावर घेऊन नाचली नेही तर मला हेमंत जोशी म्हणू नका वाटल्यास विशाखा सुभेदार म्हणा जोकर म्हणा बावळट ठरवा हाफ मॅड म्हणा. अनेकदा अमुक एखादी योजना जाहीर करण्यापूर्वी पाळी टळून गेलेल्या बाईसारखी अजितदादांची चिडचिड व्हायची पण त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी दरवेळी मोठ्या खुबीने फडणवीसांनी पार पाडली आणि महायुती सरकार बघता बघता अजरामर झाले…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी