कोण मुख्यमंत्री नवे, हि घ्या नेमकी नावे :
मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही, काँग्रेस वगळता इतर सारे पक्ष हमखास सांगतील. समजा मुख्यमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे चालून आले तर त्यांच्याकडे होऊन होऊन होणार कोण तिकडे उद्धव सेनेत देखील नेमके तेच घडेल,उद्धवजींशिवाय अन्य नाव स्पर्धेतही नसेल, शरद पवारांना अर्थातच लेक सुप्रियाला भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे, त्यानंतरच त्यांना डोळे मिटायचे आहेत,भलेही आणखी पन्नास वर्षे लागली तरी त्यांना जगायचे आहे. मुख्यमंत्रीपद चालून येण्यात भाजपाची शक्यता सर्वाधिक त्यामुळे तेथे पहिले अडीच वर्षे फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून निवडायचे नंतर त्यांना दिल्लीत बोलावून घ्यायचे हे नक्की झाले आहे, शिंदे सेनेत फारतर उदय सामंत स्पर्धेत उतरतील, त्यांच्या कानावर तसे घालण्यात आलेले असल्याने यावेळी ते विधानसभा निवडणुकीची फार मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तयारीला लागले आहेत. केवळ अडचण आहे ती काँग्रेसची, कित्येक जोडपी जशी लग्न ठरल्यानंतर अंगावर अक्षता पडण्याआधीच जसा हनिमून उरकून घेतात तेच राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचे झाले आहे म्हणजे अजून बाजारात तुरी आणि यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत त्यातूनच त्यांच्यात निवडणूक आटोपण्याआधीच तीव्र स्पर्धा सुरु झाल्याने त्याचा फार मोठा फायदा, आपापसातील त्यांच्या हेव्यादाव्याचा मोठा फायदा महायुतीला होऊ शकतो. प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदेंपासून तर अविनाश पांडे नितीन राऊत नाना पटोले माणिकराव ठाकरे यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार भाई जगताप बाळासाहेब थोरात सतेज पाटील विश्व्जीत कदम सुनील केदार वर्षा गायकवाड मुकुल वासनिक पृथ्वीराज चव्हाण इत्यादी जे मान्यवर नेते आहेत त्यांच्यात आतापासून चुरस निर्माण झाली आहे पण काँग्रेस श्रेष्ठींचे एखाद्या चावट चालू तरुणासारखे असते म्हणजे एकाचवेळी अनेक तरुणींचा करकचून मुका घ्यायचा त्यातल्या प्रत्येकीला करकचून डोळा मारायचा आणि ऐनवेळी माळ भलत्याच तरुणीच्या गळ्यात घालून मोकळे व्हायचे. जेव्हा केव्हा त्यांनी या राज्यातले मुख्यमंत्री निवडले दरवेळी तेच घडले आणि जे इच्छुक असायचे एकतर ते रामराव आदिक पद्धतीने थेट इहलोकी अतृप्त इच्छेने निघून जायचे किंवा सुशीलकुमार विलासराव पद्धतीने मेरा नंबर कब आयोगा त्यांच्या श्रेष्ठींना विचारात बसायचे, समजा चुकुन यावेळी जर काँग्रेसच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले तर नेमके तेच घडणार आहे, ध्यानीमनी नसलेले एखादे ध्यान मुख्यमंत्री झालेले असेल…
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला महाआघाडी विरोधकांनी अद्याप हात का घातला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते आहे. सत्तेत आल्यानंतर आमच्यातर्फे उपमुख्यमंत्री फक्त आणि फक्त मुसलमान असेल शिवाय त्याच्याकडे गृहखाते सुपूर्द करण्यात येईल हे काँग्रेसने राज्यातल्या मशिदींमध्ये काँग्रेस आणि मुसलमानांचा अत्यंत विश्वासू नेता मुजफ्फर हुसेन मार्फत सांगून टाकले आहे त्यामुळे पुढल्या केवळ महिन्याभरात एकाचवेळी महायुती आणि हिंदूंचा मानसिक छळ करीत मोठा बदला घेतला जाईल या अत्यानंदात राज्यातले समस्त मुसलमान आहेत, त्यांना हि जी लालूच दाखविण्यात आलेली आहे ती जर मतांमध्ये परवर्तीत झाली तर महाराष्ट्रातल्या हिंदूंना त्याची मोठी किंमत नक्की मोजावी लागणार आहे. मात्र जे मुस्लिम नेते काँग्रेसपासून दूर आहेत पण त्यांचा राज्यातल्या मुसलमानांवर मोठा प्रभाव आहे असे नेते नक्कीच काँग्रेसच्या या दर्जाहीन खेळीपासून मतदारांना दूर ठेवतील. यावेळी सत्तेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सामील करून घेण्याचे महायुतीने जवळपास नक्की केलेले आहे, नाही म्हणायला वंचित महायुतीमध्ये नको असा आग्रह रामदास आठवलेंनी केला पण त्यांच्या हट्टाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत, थोडक्यात विधान सभा निवडणूक वंचित आघाडी आणि महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण असेल पण निवडणूक निकाल लागल्यानंतरच वंचितसह महायुती एकत्र येत सत्तेतवर बसण्याचा प्रयत्न करेल. तशीही आजतागायत वंचितची अवस्था म्हणजे लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी हनिमून साजरा न केलेल्या जोडप्यासारखी झालेली आहे म्हणजे नाही म्हणायला त्यांची राज्याच्या राजकारणात मोठी ताकद आहे पण रामदास आठवले पद्धतीने त्यांची एक दोन अपवाद वगळता सत्तेत कधी लॉटरी लागलीच नाही, यावेळी त्यांना फार मोठी संधी चालून आलेली आहे…
आणखी एक महत्वाचा मुद्दा त्या एकनाथ शिंदे यांना सुखावणारा, आनंदाने गिरक्या घेत सभोवताली नाचायला बागडायला लावणारा. यावेळी एकनाथ शिंदे यांना सिनेमातला धर्मेंद्र होण्याचे शंभर टक्के संधी आहे, कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा त्या बाळापूरच्या नितीन देशमुखांना चार चौघात शिव्या देण्याचेही त्यांना चान्सेस आहेत कारण हेच ते बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, ज्यांनी उभ्या राज्यात या एकनाथ शिंदेंना अवमानित केले आहे. आधी ते सुरतेला एकनाथांबरोबर पळाले पण त्यानंतर आल्यापावली बायकोच्या नावाने हंबरडा फोडत माघारी परतले पुन्हा उद्धवजींना जाऊन बिलगले आणि स्वतःचे फार मोठे नुकसान करवून घेतले त्यात अर्थात एकनाथ शिंदे यांचा बालही जरी बाका झालेला नसला तरी नितीन देशमुखांनी त्यांना दिलेला धोका एखाद्या प्रेयसींपेक्षाही मनाला त्यांच्या झोंबला. बाळापूरात गेली पंचावन्न वर्षे ज्या एक मुस्लिम कुटुंबाकडे स्थानिक नगरपालिकेची सत्ता आहे,बाळापूरच्या राजकारणात ज्यांना मान आहे ज्यांचा दबदबा आहे दरारा आहे नाव आहे त्यातलेच एक नतिकोद्दीन खतीब ज्यांच्या पाठीशी बाळापूर विधान सभा मतदार संघातले दलित मुस्लिमांचे एक लक्ष गठ्ठा मतदान आहे त्या खतीब यांची उमेदवारी ते काँग्रेसमधून वंचित मध्ये येताच थेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर करून टाकलेली आहे. एकनाथ शिंदे यांना आता एकाच काम असे कि त्यांनी त्याठिकाणी शिंदे सेनेतर्फे असा उमेदवार उभा करावा जो अगदी सहज नितीन देशमुखांची मते आपल्याकडे खेचून घेईल ज्यामुळे खतीब यांचा विजय सुकर होईल. कोण निवडून येईल त्यापेक्षा नितीन देशमुख कसे पराभूत होतील हाच आता एकनाथ शिंदे यांचा एकमेव उद्देश असेल. एकनाथजी पाहुण्याच्या काठीने साप मारून मोकळे व्हा आणि आनंदाने बागडायला लागा…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी