अशी हि पवारांची फसवाफसवी पाटलांची बनवाबनवी :
हर्षवर्धन पाटील एकतर तुम्ही जावई निहार ठाकरे यांना कायमचे इंदापूरात बोलावून तेथेच त्यांना वकिली करायला सांगा किंवा नवविवाहित दाम्पत्याला त्यांनी ठरविल्याप्रमाणे मुंबईत संसाराला लागू द्या, समोर राजकीय अपयश दिसल्यानंतर अलीकडे अनेकांकडून घरातील कर्तबगार महिला सदस्यांना पुढे करून निवडणुक प्रचारात त्यांची इच्छा असो अथवा नसो उतरवल्या जाते पुढे केल्या जाते, ज्या घरातून महिलांना राजकारणात उतरविले गेले आहे त्यात बहुतेक कुटुंबियांचे नेमके तेच गमक आहे त्यातून यशापयशाचा भाग वेगळा पण व्यक्तिगत मुलाबाळांवर त्याचा दूरगामी परिणाम होतो असे माझे निरीक्षण आहे अर्थात अंकिता आधीपासूनच राजकीय महत्वाकांक्षा बाळगून असणारी तरुणी पण तिच्या संसाराची बापाच्या प्रेमाखातर चाललेली फरफट काहीशी अस्वस्थ करणारी म्हणून या ठिकाणी मनातले साचलेले सांगून टाकले. पवारांचे घराणे अगदी सुरुवातीपासून इंदापूरच्या पाटील कुटुंबियांच्या विरोधात, जंग जंग पछाडून देखील थेट शरद पवार आणि अजितदादा या काका पुतण्याला इंदापूरातल्या आधी काका शंकरराव बाजीराव पाटील त्यानंतर त्यांचा पुतण्या हर्षवर्धन विरोधात कधीही यश मिळाले नाही, पाटील घराणे कधीही पवारांसमोर झुकले नाही. मित्रांनो हे तर असे झाले कि बहुतेक पुरुष बाहेर प्रचंड यश मिळवितात दादागिरी करतात पण तेच पुरुष घरात मात्र पत्नीसमोर गुढगे टेकतात, लोटांगण घालतात कान धरून माफी मागतात हीच ती शरद पवारांची दयनीय अवस्था म्हणजे देशात पंगा घेणारे पवार इथे घराशेजारी इंदापूरात मात्र राजकीय दृष्ट्या मान वर करून कधीही जगले नाहीत पण यावेळी कायम दगाफटका करीत सत्तेच्या राजकारणाची मधुर फळे चाखणारे इंदापूरातले हर्षवर्धन पाटील नेहमीच्याच लोभापायी अलगद पवारांच्या जाळ्यात अडकले आहेत, पवार अगदी शंभर टक्के इंदापूरच्या पाटलांकडून होणाऱ्या अपमानांचा बदला घेणार आहेत…
www.vikrantjoshi.com
वास्तविक पवार काका पुतण्याने नाही म्हणायला इंदापूरात स्वतःची मोठी ताकद नेत्यांची भरभक्कम फळी उभी केली त्यातूनच मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना त्यांची जागा दाखवून दिली ते आमदार झाले आणि सत्तेविना तडफडणारे हर्षवर्धन भाजपात गेले पण त्यांचे हे तात्पुरते पक्षांतर आहे नेमके फडणवीसांच्या लक्षात आले नाही त्यातून हर्षवर्धन यांनी फडणवीसांकडून अनेक फायदे करवून घेतले त्यानंतर नेहमीप्रमाणे ते स्वभावाला जागले त्यांनी फडणवीसांनी केलेल्या उपकारांवर लाथ मारून भाजपाच्या कट्टर शत्रूशी संधान साधले, पवारांच्या राष्ट्रवादीत ते गेले पण शरद पवारांची कधीही साथ न सोडणाऱ्या इंदापूरातल्या ज्या प्रवीण माने भरत शाह आप्पासाहेब जगदाळे तुषार जाधव पद्धतीच्या स्थानिक प्रभावी नेत्यांनी कायम फक्त आणि फक्त शरद पवारांना साथ दिली, हर्षवर्धन पाटलांच्या नाकात दम आणला वास्तविक यावेळच्या विधानसभा निवडणुकीत याच प्रभावी गटाला एकाचवेळी हर्षवर्धन पाटील आणि मामा भरणे म्हणजे अप्रत्यक्ष अजित पवार या दोघांनाही त्यांची जागा दाखवून द्यायची होती, काहीही कसेही करून इंदापूर विधानसभा शरद पवारांना जिंकून दाखवायची त्यांनी मनापासून ठरविले होते, गेली पाच वर्षे हे काका पाठीराखे इंदापूर विधानसभा मतदार संघ बांधत होते मात्र त्यांची तयारी मेहनत शरदरावांनी पाण्यात घालविली कि नेमीचीच खेळी खेळत त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले हे निदान आज तरी लक्षात येत नाही म्हणजे एकाचवेळी हर्षवर्धन पाटील आणि मामा भरणे दोघांनाही पराभवाचे पाणी चाखवायचे, आपला आवडता स्थानिक नेता अपक्ष उभा करीत त्याला आतून सर्वोतपरी सहकार्य करीत निवडून आणायचे असे तर पवारांनी ठरविले नसावे, शंका येते त्यातूनच हर्षवर्धन आणि कन्या अंकिता तसेच पुत्र राजवर्धन डोळ्यात तेल घालून प्रचार करताहेत…
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीला देखील मी अतिशय जवळून न्याहाळत बघत आलो आहे म्हणजे सिनेमातले बहुसंख्य एकमेकांशी विवाह करतात त्यानंतर काही वर्षे शरीर सुखाचा अत्यानंद घेतात मुले जन्माला घालतात, त्यांचे एकमेकांशी खूप छान सुरु आहे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत असतांना ते लक्ष्मीकांत बेर्ड रुही किंवा अशोक सराफ रंजना पद्धतीने जसे क्षणार्धात एकमेकांपासून कायमचे दूर जातात तेच नेमके आणि नक्की हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात अगदी शंभर टक्के घडणार आहे हे त्या दोन्ही टोकाच्या लबाड नेत्यांना एकमेकांविषयी हमखास ठाऊक असल्याने जोपर्यंत ते जवळ आहेत एकमेकांना बिलगून आहेत तोपर्यंत कोण कसा एकमेकांचा फायदा करवून घेईल त्यावर त्यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहे थोडक्यात नवरा परदेशात निघून गेल्यानंतर आपल्या प्रेमात पडलेली त्याची पत्नी हि केवळ तिची वेळकाढू भूमिका आहे हे जसे तिच्या प्रियकराला नेमके माहित असते तेच या दोघांना एकमेकांविषयी ठाऊक आहे, इंदापूरचे पाटील आणि बारामतीचे पवार कधीच एकत्र कायमस्वरूपी येणे अशक्य आहे, हर्षवर्धन यांना लागलेली सत्तेची चटक ते जेव्हा सत्तेत नसतात त्यादरम्यान त्यांना जणू वेड लागलेले असते. इकडे महायुतीशी हातमिळवणी आणि तिकडे लोकसभेला सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यात पुढाकार, हर्षवर्धन सत्तेच्या लोभापायी किती खालची पातळी गाठू शकतात हे आता भाजपा अजित आणि शरद पवार तसेच काँग्रेस नेत्यांच्या देखील नेमके लक्षात आलेले असल्याने जर अंकिता पाटील ठाकरे याच पद्धतीने बापाच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय वाटचाल कर्त्या झाल्या तर हेच पाटील घराणे कायमस्वरुपी राजकारणातून बाद होण्यास फारसा वेळ लागणार नाही. तसेही विकासाच्या नावाने बोंब अशी त्यांची मतदारांमध्ये प्रतिमा असल्याने हर्षवर्धन पाटील इंदापूरकरांच्या मनातून उतरलेले आहेतच…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी