महाराष्ट्र : एक पाऊल गटारात दुसरे पाऊल चिखलात :
आत्तापर्यंतची सर्वात अल्टिमेट पुणेरी पाटी वाचण्यात आली, ‘ संडासातून बाहेर पडतांना कडी उजव्या हाताने उघडावी ‘ शासन खऱ्या अर्थाने दोघे चालवतात त्यातले पहिले लोकप्रतिनिधी आणि दुसरे शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी, शासन चालविणाऱ्या जवळपास समस्त अधिकाऱ्यांकडे तो डावा गुहाने बरबटलेला हात म्हणून कायमस्वरूपी बघावे कि काय एवढे ते मस्तवाल झाले आहेत त्यात चूक अलिकडल्या समस्त लोकप्रतिनिधींची आहे ज्यांनी त्यांना आधी डोक्यावर बसून ठेवले म्हणून या अधिकाऱ्यांनी राज्याच्या डोक्यावर बसून हागुन ठेवायला सुरुवात केली. शासकीय प्रशासकीय अधिकार्यांकडे येणारा खोऱ्याने पैसा आणि मिळालेल्या अधिकाराचा सातत्याने दुरुपयोग, तुम्हाला हे लक्षातच आलेले नाही कि अलीकडे नेमके कोणाला सत्तेत बसवायचे हे तेच मोठ्या खुबीने ठरवतात. अतिशय धक्कादायक प्रकार असा कि अनेकांना आता विधानसभा लोकसभा लढवायची असते त्यादृष्टीने त्यांनी त्या खतगावकर खरात पद्धतीने खूप आधीपासून नेमका मतदार संघ निवडून त्यादृष्टीने तेथे लक्ष द्यायला सुरुवात केलेली असते. केवळ 20-22 वर्षांपूर्वी ज्यांना दोन वेळा जेवणाची भ्रांत होती असे जवळपास सारेच सरकारी अधिकारी जेव्हा व्यवसायात राजकारणात जमिनींमध्ये कल्पनेपलिकडे गुंतवणूक करतात किंवा पालांडे पद्धतीचे अधिकारी चक्क तुरुंगात जाऊन आल्यानंतर देखील केवळ सत्तेतल्या लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने पुन्हा मोक्याच्या ठिकाणी रुजू होतात हेच लोकप्रतिनिधींचे फार मोठे अपयश आहे त्यांनी नेमका पैसा कोठून मिळविला, सत्तेतल्या किंवा विरोधक लोकप्रतिनिधींना हा सवाल विचारण्याची साधी ताकद देखील होत नाही एवढे ते या मस्तवाल भ्रष्ट अधिकाऱ्यांसमोर गांडू ठरतात. तोंडावर आलेल्या विधान सभा निवडणूक लढविण्यास महाराष्ट्रातले विजय नाहटा पद्धतीचे अचानक नवश्रीमंत झालेले जवळपास 50 अधिकारी जोरदार प्रयत्न करताहेत किंबहुना बालाजी खतगांवकर पद्धतीच्या जवळपास 10 प्रभावी प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांची नावे उमेदवार म्हणून निश्चित झालेली आहेत, जेव्हा प्रशासनावर सरकारचा वचक राहत नाही तेव्हा ते राज्य रसातळाला जायला फारसा वेळ लागत नाही…
www.vikrantjoshi.com
आता महायुतीसाठी आणखी एक धोकादायक आणि धक्कादायक पुरावा !! हरियाणा विधान सभा मतमोजणीला जेव्हा त्यादिवशी सकाळी सुरुवात झाली, सुरुवातीला पोस्टल द्वारे प्राप्त झालेल्या मतमोजणीला जशी सुरुवात झाली तशी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गटातल्या मीडियाने म्हणजे विविध नालायक प्रसार माध्यमांनी मित्र पक्षांनी आनंदाने उर बडवायला यासाठी सुरुवात केली होती कारण ते जवळपास 60 पेक्षा अधिक जागांवर आगेकूच करीत होते. तथाकथित शेतकरी नेता राकेश टीकेत तर जणू दिल्ली जिंकली या आवेशात मीडियासमोर येऊन मदमस्त होत नाचत बोलत बडबडत होते. आजतागायत जे देशातल्या भाजपाच्या लक्षात आलेले नाही नव्हते तेच या राज्यातल्या महायुतीचे झाले आहे म्हणजे पोस्टल मतदान प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर फक्त आणि फक्त शासनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केल्या पाठविल्या जाते. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक दरम्यान घडणार आहे म्हणजे विधानसभेला महायुतीविरोधात मतदान करायचे हे येथेही नक्की ठरले आहे किंबहुना महायुतीविरोधात प्रचार किंवा आंदोलने उभी करतांना मोठ्या खुबीने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड निधी पुरवितात हे नेमके सत्य विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना नेमके ठाऊक असताना त्यांना देखील हाताबाहेर गेलेल्या प्रशासनाला वठणीवर आणणे अशक्य झालेले आहे किंबहुना सिद्धार्थ खरात पद्धतीचे सरकारी अधिकारी महायुतीविरोधात उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत हे ठाऊक असतांना देखील महायुती मूग गजळून बसते आहे एवढे आपल्या राज्यातले सरकारी अधिकारी कर्मचारी हाताबाहेर गेलेले आहेत…
जे हरियाणात घडले त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत नक्की घडणार आहे म्हणजे उद्या जर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान महायुतीविरोधात निर्णायक वळणावर येऊन जर महाआघाडी सत्तेवर आली तर त्यात मला अजिबात नवल वाटणार नाही कारण जशी हरियाणामध्ये शासन प्रशासनाला भाजपा महायुती ऐवजी काँग्रेस प्रणित आघाडी सत्तेत पाहिजे होती तेच किंवा त्यापेक्षा व्यापक वातावरण येथे महाराष्ट्रात आहे हे मी तुम्हाला शपथेवर सांगतो आहे, आत्ता याक्षणी महायुतीच्या नेत्यांनी खाड्कन डोळे उघडून या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकसभेला माझ्यासारख्या बहुसंख्य मतदारांची नावे मतदान यादीतून गायब होती, त्यात शासकीय अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक अभ्यासू गट हि नावे गाळण्यात आघाडीवर होता का, माहिती घ्या, माझ्या वाक्यात नेमका मतितार्थ दडलेला आहे. राज्यातली महायुती बेसावध होती, शासनात नोकरी करणाऱ्यांनी हे राज्य अप्रत्यक्षरीत्या आपल्या ताब्यात घेतले आहे, सरकारात काम करणारे शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी भीतीने ज्याला चळाचळा कापतील तेच खरे कर्तबगार राज्यकर्ते, महायुतीसाठी रात्र
वैऱ्याची आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी