मतदारांच्या मनातली अढी, पाटलांचा वाडा
विरुद्ध देशमुखांची गढी :
माझा बहुतेकवेळा शिवराज पाटील चाकूरकर होतो म्हणजे लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर दिल्लीतल्या सत्तेत असतांना कधी ते मंत्री असतांना तर कधी सभापती असतांना दिवसातून जसे तीन तीन वेळा एखादया हिरोसारखे कपडे बदलायचे माझे बहुतेकवेळा लिखाणातून बोलण्यातून तेच होते, साधारणतः तीन परिच्छेदातून मी जे लिहितो किंवा बोलतो अनेकदा तिन्ही ठिकाणी माझे विषय वेगवेगळे असतात हे तुम्ही लक्षात असू द्या. याचठिकाणी मी काही दिवस जे आधीच सांगितले नेमके तेच घडणार आहे म्हणजे लातूर शहर विधानसभा भाजपातर्फे शिवराज पाटलांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर या महाआघाडी काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांच्या विरोधात लढवतील, माझे वाक्य पुन्हा लिहून ठेवा, आणि त्या निवडूनही येतील विशेष म्हणजे निवडणूक प्रचारात वयानुपरत्वे भलेहि शिवराजजी फारशी धावपळ करतांना दिसणार नाहीत पण प्रचार कार्यालयात ज्या एका खमक्या अनुभवी प्रेमळ लाडक्या आवडत्या मितभाषी आणि येणाऱ्या धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची काळ्जी घेणारा जो बुजुर्ग आणि लोकाभिमुख नेता ठाण मांडून बसलेला लागतो सुदैवाने हि जबाबदारी जातीने शिवराज पाटील चाकूरकर पार पाडणार आहेत त्यांनी तसे अर्चनाताईंना सांगून ठेवले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे श्रीमन्त आणि एकवटलेला असा लिंगायत समाज सोलापूर लातूर पंढरपूर भागात मोठ्या प्रमाणात पसरलेला मात्र अलीकडे लिंगायत समाजातला अमुक एखादा नेता सत्तेत नसल्याने हा समाज कमालीचा अस्वस्थ झालाय पण अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपाने उमेदवारी जवळपास नक्की केलेली असल्याने सारेच लिंगायत आणि लातूर विधानसभा मतदार संघातले शिवराज पाटलांवर अतोनात अतोनात करणारे सारेच एकमेकांच्या हातात हात घेऊन आनंदाने झिम्मा फुगडी खेळताहेत. आमच्या देव्हाऱ्यातील देव म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर असे त्यांचे वर्णन काँग्रेसच्या अमित देशमुखांनी थेट जाहीर सभेत केले होते एवढे हे चाकूरकर कुटुंब संपूर्ण लातूर जिल्ह्यातले लोकमान्य लोकांच्या मनातले. अर्चना पाटील चाकूरकर यांचा विजय आतापासूनच नक्की समजल्या जातो…
www.vikrantjoshi.com
यादिवसात विशेषतः सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात असा अपप्रचार सतत केला जातोय कि राज्यातले महाराष्ट्रतले विशेषतः संघ भाजपा नेते वागायला बोलायला अतिशय उर्मट उद्धट ऍरोगंट हलकट हेकट आहेत जे ते प्रत्यक्ष अजिबात नाहीत किंबहुना मी जे संघभाजपावाल्यांना कायम सतत अनेकदा सांगतो कि राहुल गांधी यांचे अवास्तव महत्व काँग्रेसपेक्षा तुम्हीच अधिक वाढविले जसे या दिवसात राहुल यांच्या त्या जिलेबी बाबत केलेल्या जाहीर वक्तव्यावरून जेवढे त्यांना दरक्षणी हिणवल्या जाते त्यातून त्यांचे महत्व कमी न होता याउलट त्यांना मोठी सहानुभूती तर मिळतेच वरून वाचणाऱ्यांना हा भाजपाचा किळसवाणा प्रचार प्रकार वाटतो तेच या आरोपाचे म्हणजे जे संघ भाजपावाले नाहीत त्यावर त्यांना अजिबात बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी करू नये नुकसान त्यातून नक्कीच विरोधकांचे होईल. आमच्या ओळखीत एका बाईला तिच्या कुरूप नवऱ्यापासून चार मुले होती त्यातले तीन त्या नवऱ्यासारखे आणि एक देखणे होते याचा अर्थ ते मूल तिला एखाद्या देखण्या पुरुषापासून झाले असा निघत नाही तो केवळ योगायोग असतो तेच भाजपाचे म्हणजे अमुक एखादा उद्धट नेता जसा भाजपामध्ये असू शकतो तसा तो इतरही पक्षात असतो किंवा पूर्वीचे अजित पवार अनेकांच्या अंगावर खेकसायचे याचा अर्थ अख्खी राष्ट्रवादी बोलायला वागायला उद्धट उर्मट होती असे नाही किंवा देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार रावसाहेब दानवे पद्धतीचे नेते सतत कार्यव्यस्त असूनही अंगावर धावून जातात तुम्ही कधी ऐकले पहिले का, चंद्रकांत पाटील अतुल सावे सुधीर मुनगंटीवार पद्धतीचे सारेच भाजपाचे मंत्री सतत एवढे दिलखुलास हसतात कि बघणाऱयाला भीती वाटते आता यांची हसता हसता दातांची कवळी बाहेर पडते कि काय याउलट मला सुषमा अंधारे कायम सिनेमातल्या अमिताभ सारख्या अँग्री वूमन वाटतात त्या तशाच वागतात बोलतात किंवा भाजपा कार्यालयात केव्हाही जा अगदी समोर हनुमंताच्या मूर्तीसारखे बसलेले ते मुकुंद कुलकर्णी असे वाटते कि पुढल्या क्षणी ते तुम्हाला कडेवर घेऊन तुमचे लाड करायला पटापट मुके घ्यायला सुरुवात करतात कि काय, तिकडे ते जगमान्य भाजपा नेते सुनील देवधर बोलायला वागायला एवढे मनमोकळे आणि सुसंस्कृत कि त्यांच्याशी गप्पा मारतांना एखाद्या प्रियकराला थेट प्रेयसीला मांडीवर घेऊन गप्पा मारण्याचा फील येतो किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा एवढे शांत कि एखाद्याने त्यांच्या डोक्यावर टपली जरी मारली तरी ते असे करणार्याचा मुका घेऊन मोकळे होतील आणि हे असे सारेच भाजपा संघ नेते वागण्या बोलण्यात शिस्त पाळतात हलकटपणा टाळतातअर्थात तुम्ही श्वेता शालिनी यांना देखील भाजपा नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघत असाल तर मात्र माझा नाईलाज आहे…
आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. जम्मू हरियाणाच्या विधानसभेला मिळालेल्या यशानंतर लगेच महाराष्ट्रात देखील समस्त अति हुशार मंडळींचा येथल्या भाजपाबाबत दृष्टिकोन बदलला आहे मी मात्र जेव्हा मराठा आंदोलन अतिशय जोमात आणि जोरात होते आणि राज्यातील महायुती विशेषतः भाजप संपली पद्धतीच्या बोंबा जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकसभा निवडणूक निकालानंतर अनेकांनी ठोकायला सुरुवात केली होती तेव्हा देखील मी हेच सांगत असे महायुती संकटात नाही किंबहुना पुढल्या वेळी देखील महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, नेमके तेच घडणार आहे हे आता या निकालानंतर अचानक अनेक सांगू बोलू लागलेले आहेत. पुढल्या वेळी मित्रांनो महायुती सत्तेत आल्यानंतर पुढला मुख्यमंत्री महायुतीमधल्या फक्त आणि फक्त भाजपाचा असेल, भाजपा श्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांऐवजी मुख्यमंत्री करण्याची जी मोठी चूक केली ती ते यावेळी नक्की करणार नाहीत पुन्हा कधीही शिंदे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत त्याऐवजी पहिले अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस त्या आर आर पाटील पद्धतीने पुन्हा मुख्यमंत्री होतील जसे आबांनी गृहखाते मागून घेतले होते, अडीच वर्षानंतर मात्र या राज्याचे मुख्यमंत्री उदय सामंत असतील आणि तेच का मुख्यमंत्री होतील तेही मी तुम्हाला नक्की सांगणार आहे..
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी