हे तुम्ही वाचले ऐकले नसेल तर तुमचे आयुष्य व्यर्थ ठरेल :
मैं जो भी कहूगा सच कहूगा, सच के सिवा कुछ ना कहूगा !! आता तो नेता हयात नाही पण त्या नेत्याला लावण्या बघण्याचा लावणी नृत्य करणाऱ्या लावण्यवतींशी जवळीक करण्याचा एवढा छंद होता कि त्याने पुणे ते औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या चौफुला गावात स्वखर्चातून एक भव्य तमाशा थिएटर उभारले विशेष म्हणजे लावण्य्या आणि लावण्यांच्या प्रेमापोटी हा नेता औरंगाबाद ते पुणे किंवा मुंबई मुद्दाम कारने प्रवास करीत असे क्वचित तो विमानाने ये जा करायचा अर्थात असे आजतागायत विशेषतः महाराष्ट्रातले कितीतरी नेते ज्यांची नावे तुम्हाला सांगता येतील ज्यांना तमाशाची प्रचंड आवड होती किंबहुना कितीतरी नेत्यांनी प्रसंगी बदनामीची काळजी चिंता न करता तमाशात नाचणार्या देखण्या तरुणींसोबत संबंध ठेवले नि त्यातून मुले जन्माला आली, डॉ किशोर शांताबाई काळे यांचे कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र कुठे वाचायला मिळाले तर अवश्य वाचा, मी ते अनेकदा वाचतांना खूप वेळा मनसोक्त रडलो आहे किंवा जळगावला असताना कोल्हाट्यांच्या वस्तीत मी राहत असे त्यांचे जगावेगळे जीवन अनेकदा मला अस्वस्थ करीत असे. येथे विषय फार वेगळा आहे, मला देवेंद्र फडणवीस आत बाहेर नेमके कसे हे पुढल्या काही भागात तुम्हाला भीडभाड न बाळगता सांगायचे आहेत भलेही त्यांना वाईट वाटले तरी…
www.vikrantjoshi.com
ते दोघेही माझ्या विदर्भातले असले म्हणून काय झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रा स्व संघाचे असूनही ते दोघेही अतिशय स्वार्थी मतलबी आहेत त्यावर पुढे अनेक उदाहरणे देईलच पण सुरुवात अशी कि या दोघांनाही रस्त्याने फिरायला फडणवीस याना तर स्वतः ड्रायव्हींग करायला एवढे आवडते कि ते आजही अनेकदा मुंबईतल्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करतात माझी नेमकी माहिती आहे किंबहुना फार पूर्वी हेच फडणवीस जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या ओबडधोबड रस्त्यावर भल्या पहाटे थेट नागपुरातून हॉर्न सोडून सारे काही वाजणाऱ्या एका अँबेसिडोर कारमधून शिर्डीला पोहोचले त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि आल्या पावली ते पुन्हा नागपुरात पोहोचले खरे पण त्यानंतर त्यांना काही महिने ट्रॅक लावून कंपलसरी आराम करावा लागला त्यानंतरही त्यांनी कारने प्रवास करण्याचे सोडले नाही, गडकरी आणि फडणवीस दोघेही स्वार्थी यासाठी कि केवळ स्वतःची रस्त्याने ड्रायव्हिंग करण्याची हौस भागविण्यासाठी त्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळेविणले, हे तर असे झाले कि एखाद्या बेवड्याने घरातले देवघर पाडून त्याठिकाणी बार उभारावा, एवढेच नव्हे तर सत्तेत आल्या आल्या नागपूर ते मुंबई कार चालविण्याची केवळ हौस भागविण्यासाठी याच फडणवीसांनी थेट शासकीय तिजोरीवर दरोडा टाकून चक्क त्या समृद्धी महामार्गाची उभारणी केली बघता बघता हा महाकाय प्रकल्प पूर्ण देखील केला, ज्या पद्धतीने एकेकाळी नितीन गडकरी यांनी फडणवीस पद्धतीने शासकीय तिजोरीवर दरोडा टाकून मुंबई पुणे जलद गती महामार्गाची उभारणी केली होती आज त्याच पावलावर पाऊल फडणवीसांनी ठेवले आहे दोघाही नागपूरकर संघ स्वयंसेवकांनी फक्त आणि फक्त रस्त्याने ड्रायव्हिंग करतांना भविष्यात त्रास न होऊ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास सारेच रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर सुसज्ज उभारले विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊ नयेत त्यावर नेमकी भूमिका वेळोवेळी शरद पवारांनी घेतली, आडकाठी निर्माण करणारे दोन्ही वेळेस विरोधात शरद पवार होते हे विशेष पाण्या दोघांनीही बलाढ्य शरद पवारांचे ऐकले नाही त्यांचा विरोध जुमानला नाही, शरद पवारांशी पंगा घेतला ना शरद पवार पद्धतीने केवळ पश्चिम महाराष्ट्राचा विचार न करता उभ्या राज्यात रस्त्यांचे दर्जेदार जाळे उभारले ना आता भोगा आपल्या कर्माची फळे, शरद पवार म्हणूनच फडणवीसांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत, पवारांचे काही चुकले असे मला अजिबात वाटत नाही कारण केवळ स्वतःची हौस भागविण्यासाठी या दोघांनी राज्यातल्या रस्त्यांचा सरकारी तिजोरीवर भार टाकून जो ऐतिहासिक बदल घडवून आणला त्यावर या दोघांनाही जेवढ्या शिव्या देता येतील देत राहा आणि रस्ते होऊ न देण्याच्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या शरद पवारांनाचे मनापासून कौतुक करा…
हिंदी सिनेमात डान्स साठी जशा हेलन आणि बिंदू प्रसिद्ध, एकेकाळी एकदम तोंडाला पाणी सुटायचे तसे राज्याच्या राजकारणाचा जेव्हा केव्हा अगदी जगभर विषय निघतो त्या त्या प्रत्येकवेळी टॉपवर ते दोघे फक्त त्यापैकी एक अर्थातच शरद पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस, या दोघांचाही मी एवढ्या खोलवर अभ्यास केलाय कि जर त्यांची काही गुपिते मी उघड केली तर मला त्यातून एवढा पैसा मिळेल कि त्यानंतर मला उरलेल्या आयुष्यात काहीही करावे लागणार नाही, त्यातलेच एक गुपित याठिकाणी उघड करतो. समजा शरद पवारांना तुम्ही त्यांच्या होणाऱ्या चुका दाखवून दिल्या तर ते बारीक डोळे करून तुमचे सांगणे मनापासून ऐकतो आहे असे दाखवतात आणि तुम्ही उठून गेल्यानंतर एकटेच खिडकीशी उभे राहून मोठ्यांदा हसायला लागतात आणि पुढल्याच क्षणापासून तुमचे महत्व कमी करायला सुरुवात करतात, हे मला स्वतः गोविंदराव आदिक यांनी देखील सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसांचे नेमके उलटे आहे, जेव्हा केव्हा एखादा त्यांची होणारी चूक त्यांना तोंडावर सांगतो त्यावर फडणवीस दुर्लक्ष करताहेत असे सांगणाऱ्याला उगाचच वाटते तो वैतागून बाहेर पडतो पण घडते भलतेच, केलेल्या सूचनांवर जर तशी आवश्यकता असेल तर फडणवीस होणारी चूक पुन्हा न होऊ देण्याची शपथ घेतात ज्यातून सूचना करणारा मनापासून भरवतो आणि आनंदाने जागच्या जागी उड्या मारायला लागतो. त्यानंतर चुका काढणाऱ्याला फडणवीस कायम जवळ करतात त्याच्याकडे आपला सच्चा साथीदार नजरेने बघायला लागतात. देवेंद्र फडणवीसांचे असे कितीतरी किस्से पुढल्या भागात….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी