ब्राम्हण द्वेष भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी
माझ्या आयुष्याची जी सत्यकथा आहे ती तशीच हुबेहूब जवळपास महाराष्ट्रातील साऱ्याच समस्त ब्राम्हण वर्गाची आयुष्य गाथा आहे असावी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हे तालुक्याचे ठिकाण, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले हे माझे मूळ गाव. मी केवळ ९-१० वर्षांचा असेन तेव्हा आई गेली त्यानंतर वडिलांनीच आम्हाला कसेबसे वाढविले. वडील शिक्षक होते रा.स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक पदाधिकारी होते त्याकाळी शिक्षकांना अगदीच जेमतेम पगार असायचा, आमचे कुटुंब मोठे त्यामुळे वडील गावगाड्याची भिक्षुकी करायचे, गावातल्या ब्राम्हणांनी त्यांना क्वचित खचित पूजापाठ सान्गण्यासाठी थोडक्यात भिक्षुकी करण्यासाठी बोलावले असेल कारण उघड होते, आम्ही सारे विशेषतः वडील फारसे ब्राम्हणत्व पाळत नसू कारण आईविना तेही गावातल्या ब्राम्हणांच्या भरवशावर घरातली चूल पेटणे अशक्य होते, दरिद्री ब्राम्हणांकडे येऊन ब्राम्हण स्त्रीने स्वयंपाक करून खाऊ घालणे शक्य नव्हते, बारी समाजाच्या स्त्रीने आम्हाला लहानाचे मोठे केले स्वयंपाक करून खाऊ घातले, आमची काळजी घेतली. नेमके हेच कारण असते कायम माझ्या सतत अस्वस्थ राहण्याचे होण्याचे कि आम्हाला ब्राम्हणेतर वर्गाने लहानाचे आजपर्यंत साऱ्या अर्थाने मोठे केले असतांना जेव्हा माझ्यासारख्या बहुसंख्य असंख्य ब्राम्हणांचा ब्राम्हणेतर द्वेष दुस्वास राग करतात, आपली नाळ एवढी जुळलेली असतांना हे असे का…?
आता अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा, मला सांगा, आजपर्यंत आजतागायत एकही मुस्लिमाने ब्राम्हणांचा द्वेष केला राग केला दुस्वास केला एखादे उदाहरण दाखवा, कदाचित औषधालाही सापडणार नाही. म्हणजे ज्या मुस्लिमांचा समस्त ब्राम्हणांनी सतत कायम दुस्वास केला विरोध केला पाक धार्जिण्या असलेल्या काही मुस्लिमांना कायम अगदी सुरुवातीपासून अंगावर घेतले त्यांच्याशी उघड पंगा घेतला त्या मुस्लिमांनी कधीही उघड राज्यातील कानाकोपऱ्यातल्या समस्त ब्राम्हणांचा अजिबात राग केला नाही, असे पाकधार्जिणे मुस्लिम हिंदू विरोधी आहेत पण कधीही ते एकट्या ब्राम्हण वर्गाच्या विरोधात नव्हते नाहीत म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने समस्त हिंदूंना कायम मुस्लिम विरोधात उभे केले ते मुस्लिम मात्र कधीही एकट्या ब्राम्हणांच्या विरोधात रस्त्यावर उतरले कधीही ऐकलेले नाही कानावर पडले नाही पण ज्या ब्राम्हणेतर हिंदूंनी आम्हाला पोटाशी धरायला हवे तेच ब्राम्हणेतर हिंदू या राज्यात आमच्या का मागे लागलेले आहेत, डोक्याला मनाला झिणझिण्या आणणारे वेदना देणारे हे जातीयवादाचे अजब महाभयंकर अस्वथ करणारे जीव नकुसा करणारे समीकरण…
www.vikrantjoshi.com
कुठेतरी हे थांबायला पाहिजे विशेष म्हणजे फक्त सार्वजनिक व्यासपीठावरच ब्राम्हण विरोध आहे, व्यक्तिगत आयुष्यत जर ब्राम्हणेतर आमच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले नसते तर आजपर्यंत अनेक ब्राम्हणांना भीका मागाव्या लागल्या असत्या. फार कमी ब्राम्हण आपल्यातल्या गरजू गरीब ब्राम्हणांच्या पाठीशी उभे असतात उलट बहुतेकांना एखाद्या ब्राम्हण कुटुंबाची चाललेली फरफट बघून मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात अशावेळी ब्राम्हणांच्या पाठीशी हमखास ब्राह्मणेतर अतिशय ठामपणे उभे राहतात असतात. मला मुंबईत धुळ्याच्या रोहिदास पाटलांनी घर दिले नसते आणि बारामतीच्या शरद पवारांनी कार्यालय तेही विकत घेऊन दिले नसते तर मला हे आजचे यश कधीही बघायला मिळाले नसते. राज्यातले समस्त बहुसंख्य मराठे माझ्या पाठीशी कायम उभे राहिले त्यातूनच मला पुढे जाता आले आणि हीच कथा असते बहुतेक ब्राम्हणांच्या घरातली, हे तर असे झाले कि एखाद्या तरुणीवर चार भिंतीच्या आड ओसंडून प्रेम करायचे आणि चार चौघात मात्र जणू ती ओळखीचीच नाही असे दाखवायचे, नका असा विचित्र राग मनात धरून, आमच्याशी नका वागू समस्त ब्राम्हणेतर हिंदूंनो, लढा द्यायचा असेल तर आम्हाला साथ द्या जात्यंध पाकधार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात लढायला नेहमीप्रमाणे आजतागायत…
क्रमश: हेमंत जोशी.