आंदोलन मनोज जरांगे : महायुतीला तोटे कि फायदे :
देवेंद्र फडणवीस गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत अनेकदा सत्ता त्यांच्या हाती असूनही स्वतःसाठी त्यांनी कारखाने शाळा कॉलेजेस विविध व्यवसाय थोडक्यात सत्तेच्या माध्यमातून जे जे समस्त नेत्यांसारखे श्रीमंत होण्यास सहजगत्या मिळविता येते तयातले त्यांनी काहीही स्वतःसाठी आजतागायत ना केले ना ते कधी करतील, जेथे दूरदूरपर्यंत अजाबात संबंध नाही तेथे ओढूनताणून त्यांना बदनाम करणे समस्त हिंदूंना आता या पातळी सोडून वागण्याचा मनापासून उबग आला आहे म्हणजे उद्या गावाच्या मूल न होणाऱ्या एखाद्या सरपंचाला खूप वर्षांनी मूल झाल्यानंतर हेच शरद पवार आपणहून नक्की फडणवीसांकडे बघत डोळे मिचकावतील हेही आता लोकांच्या लक्षात आले आहे किंवा एखादी नटी अचानक जर परदेशात एखाद्याबरोबर पळून गेली तर हेच शरद पवार, चार दिवस झाले फडणवीसांचा काही पत्ता लागत नाही अशीही बोंब ठोकून मोकळे होतील. माझे पुढले वाक्य आजच आता याठिकाणी लिहून ठेवा कि येत्या विधानसभेत राज्याची महायुती शम्भर टक्के सेफ असेल ते अगदी सहज सत्तेत बसू शकतील मात्र जर जागांचे वाटप दोन्हीकडे म्हणजे महायुती आणि महाआघाडीत व्यवस्थित झाले नाही तर 1995 दरम्यान जे घडले तेच नेमके घडेल किंवा तीच शक्यता अधिक वाटते म्हणजे विधान सभा निकालानंतर अपक्ष मोठ्या प्रमाणावर निवडून येतील असे आजच्या त्यांच्यातल्या अंतर्गत स्पर्धेतुन सतत जाणवते आहे कारण राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी मोठी चुरस आहे एकाचवेळी आठ ते दहा नेत्यांना आमदार होण्याची स्वप्ने आत्तापासूनच पडायला लागलेली आहेत स्पर्धेतल्या प्रत्येकाकडे कार्यकर्ते आहेत पैसा आहे राजकीय आर्थिक सामाजिक जातीची ताकद आहे म्हणून तगडी स्पर्धा आहे त्यामुळे ज्या बलाढ्य नेत्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार नाही ते अपक्ष निवडणूक लढवतील त्यानंतर ज्यांना सत्तेत बसायचे आहे त्यांना आधी खूप काही अटी लादून पदरात सत्तेचे मोठे घबाड पाडून घेतील. पुढले सरकार अपक्षांच्याच हातात आहे हे लिहून ठेवा. अत्यंत महत्वाचे म्हणजे जरांगेच्या आंदोलनाचा फायदा महाआघाडीला नव्हे तर महायुतीला होणार आहे कारण जरांगे यांना मानणारे राज्यातले बहुसंख्य असंख्य मराठे निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला असतील आणि ज्यांना शरद पवारांविषयी मनापासून मोठा राग आहे ते मराठेतर एकवटल्याने त्यांनी अगदी आत्तापासून महायुतीलाच सहकार्य करण्याचे नक्की केले आहे शिवाय मुस्लिम सोडल्यास बौद्ध व्यापारी ब्राम्हण यावेळी महाआघाडीसोबत जाणार नाहीत तसेही राज्यातल्या ब्राम्हणांना महाआघाडीशी अजिबातच देणेघेणे नाही म्हणून शरद पवार टेन्स आहेत कारण पून्हा एकवार सुप्रियाला मुख्यमंत्री करतांना त्यांना समोर अडचणींचा डोंगर उभा दिसतोय…
www.vikrantjoshi.com
महाराष्ट्रातून आता ब्राम्हण वाद ब्राम्हणांविषयी असूया हे विषय जवळपास बाद झाले आहेत, केवळ देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून बाद करण्यासाठी वेळोवेळी मुद्दाम ब्राम्हण वाद विषयाला शरद पवार आतून हळूच कळ लावायचे आणि अलगद बाजूला व्हायचे, वास्तविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले समस्त मराठा आणि ब्राम्हण एकमेकांच्या जवळचे एकमेकांवर प्रेम करणारे, आपण का एकमेकात उगाच भांडत बसलोय आपण का म्हणून ब्राम्हणांना सतत पाण्यात पाहतोय, विशेषतः हा प्रकार थेट मराठा तरुणांच्या लक्षात आल्याने आणि मराठ्यांना आरक्षण देणे हा विषय दूरदूरपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हाती नसल्याने ज्यांच्या हा विषय हाती आहे त्या सत्तेतल्या नेत्यांना छळायचे सोडून केवळ राजकीय महत्व कमी करण्यासाठी पवारांनी मुद्दाम ब्राम्हण वाद आणि फडणवीसाना डोकेदुखी त्यांची बदनामी हे विषय उकरून काढत राज्यातल्या मराठ्यांना विनाकारण मराठेतर हिंदूंपासून दूर नेले हे मराठ्यांच्या लक्षात आल्याने, बादरायण संबंध लावून फडणवीसांना त्रास देत त्यांची बदनामी करणे हा विषय यापुढे राज्यातल्या मराठ्यांनी आता जवळपास पूर्णतः थांबविला आहे, हे नेमके विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घडले असल्याने महाआघाडीतले कर्तेधर्ते शरद पवार यादिवसात पूर्णतः धास्तावले आहे काहीसे काळजीत पडले आहेत. राज्याचा गृहमंत्री या नात्याने जर कुठे देवेंद्र फडणवीस कमी पडत असतील किंवा चुका करीत असतील तर त्यांना धारेवर धरणे केव्हाही योग्य पण ज्यात अर्थाअर्थी संबंध नाही त्यात ओढाताण करून जाणूनबुजून फडणवीसांना ओढायचे नंतर त्यांना विनाकारण वाट्टेल ते बोलायचे, आपल्या समाजाची हि चूक आहे, ज्या हिंदूंवर मराठ्यांवर फडणवीसांचे मनापासून प्रेम आहे त्यांना मानसिक त्रास दिल्याचा हळू हळू का होईना पण ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना आता मनापासून पश्चाताप होतो आहे विशेष म्हणजे ज्या फडणवीसांना आजतागायत प्रत्यक्ष किंवा खाजगीत विशेषतः मराठा किंवा त्यांच्या कुठल्याही नेत्यांविषयी अपशब्द काढलेले नाहीत त्यांना यापुढे केवळ ब्राम्हण आहेत म्हणून किंवा आपले नेते आपल्या खांद्यावर बंदूक ठेऊन जो नेम फडणवीसांवर धरायला सांगताहेत, नेमकी वस्तुस्थिती आता मराठ्यांच्याही लक्षात आल्याने त्यांच्याविषयीचा विनाकारण उफाळलेला राग जवळपास पूर्णतः निवळलेला आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे.खरी गम्मत सत्तेच्या सभोवताली वावरणार्या मतलबी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे बघतांना येते, यादिवसात ते मोठ्या खुबीने कुंपणावर बसून आहेत म्हणजे एकाचवेळी हे सत्ताकेंद्रित अधिकारी महायुतीला बाहुपाशात घेतात पण त्याचवेळी महाआघाडीच्या नेत्यांना देखील करकचून डोळा मारीत लव्ह यु म्हणतात, त्यांच्यातले हिशेबी अधिकारी निवडून बाजूला काढले पाहिजेत, कारण हा प्रकार गंभीर आहे राज्याला मागे नेतो…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी