बहीण भाऊ भिडले तुंबळ युद्ध रंगले राजकारण रंगले :
काही नेते त्या फडणवीसांसारखे अति भावनिक असतात जे कधीही असू नयेत, काही नेत्यांचा भास्कर जाधव राणे बंधू किंवा उदयन राजे पद्धतीने अगदी नाकावर राग असतो, वात पेटवायचा अवकाश लगेच भडका उडतो पण जे नेते थंड डोक्याने खून करणाऱ्या एखाद्या सिरीयल किलर सारखे असतात बोलतात वागतात त्यांच्या वाटेला जातांना विरोधकांनी आधी किमान शंभर वेळा तरी विचार करावा जो विचार अजित पवारांच्या डोक्यात शिरला नाही आणि त्यांनी थंड डोक्याने एखाद्याला संपविणाऱ्या त्या शरद पवारांशी थेट पंगा घेतला कधी नव्हे त पवार घराण्यात फूट पाडली त्यापेक्षा पक्षांतर न करता जर आहेत ते मधुर संबंध अजित पवारांनी त्या फडणवीसांशी जपले असते तरीही त्यांना जी भीती वाटायची तसे काहीही घडले नसते, मैत्रीला जगणार्या अतिभावनिक देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तुरुंगात जाऊ दिले नसते. अतिशय थंड डोक्याने निर्णय घेणाऱ्या शरद काकांशी अजितदादांनी पंगा घेतला आणि एकाचवेळी स्वतःसहित अनेकांचे नुकसान करून ठेवले म्हणजे तिकडे समस्त भाजपा संघवाले मनातून दुखावले, सर्वसामान्य मतदार भाजपापासून दूर गेले तिकडे अजितदादा कायमचे पवारांच्या घरातून हृदयातून हाकलले गेले एकनाथ शिंदे अजितदादांच्या स्पर्धेतून अस्वस्थ झाले सावध झाले सर्वाधिक महत्वाचे म्हणजे बदनाम भ्रष्ट अजित पवारांना तेही भाजपाने संरक्षण दिल्याने राज्यातले सर्वसामान्य मतदार आधी अस्वस्थ झाले नाराज झाले निराश झाले त्यानंतर ते भाजपापासून दूर झाले थोडक्यात काय अजित पवारांनी थंड डोक्याच्या माथेफिरू नेत्याशी म्हणजे मोक्याच्या प्रसंगी एखाद्या सिरीयल किलर पेक्षाही खतरनाक ठरणाऱ्या शरद पवार यांच्याशी पंगा घेतला आणि चहूबाजूंनी एकाचवेळी अनेकांचे नुकसान केले…
www.vikrantjoshi.com
कुठल्याही राजकीय विरोधकाने शक्यतो थंड डोक्याच्या डेंजर नेत्याशी कधीही पंगा घेऊ नये जो त्या नांदेड जिल्ह्यातील कंधार विधानसभा मतदार संघात सख्य्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने म्हणजे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी एरवी सरळ शांत सुस्वभावी केवळ दिसणाऱ्या पण प्रसंगी शरद पवार पद्धतीने महाखतर्नाक ठरणाऱ्या ठरलेल्या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी कौटुंबिक आणि राजकीय पंगा घेतला त्यांची आधी प्रचंड बदनामी केली नंतर त्यांना लोकसभेला पराभूत करतांना महत्वाची भूमिका पार पाडली, आशाताई यांनी बंधू प्रतापरावांना डिवचून नाकावर टिच्चून दिवंगत वसंत चव्हाण यांना मोठी राजकीय ताकद दिली त्यांना निवडून आणण्यात मेजर भूमिका पार पाडली वरून वसंत चव्हाणांच्या विजयी मिरवणुकीत वृद्ध मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांनी ज्या पद्धतीने मांड्या थोपटून चिखलीकर यांना चिडविले तेथेच आशा आणि श्यामसुंदर शिंदे यांचा राजकीय खात्मा कारण्याचे अतिशय शांतपणे थंड डोक्याने चिखलीकर यांनी त्यांच्या कार्यकार्त्यांना वचन दिले आणि ते त्याच दिवसापासून कामाला लागले, स्वतः कंधार विधानसभा लढवायची आणि बहीण आशा याना पराभूत करण्याची त्यांनी शपथ घेतली. जेव्हा वसंत चव्हाण गेले तेव्हाच त्यांनी तसे अगदी स्पष्ट भाजपा श्रेष्ठींना त्याचवेळी सांगून टाकले कि मला यापुढे लोकसभा लढवायची नाही, नांदेड लोकसभेसाठी तुम्ही इतर कोणालाही उमेदवारी द्या मी अगदी मनापासून त्यांचा प्रचार करेल पण मला नक्की लोहा कंधार विधानसभा लढवायची आहे आणि बहीण व मेव्हण्याला त्यांची नेमकी जागा दाखवून द्यायची आहे…
नांदेड जिल्ह्यातील भाजपासाठी आणखी एक सुखावह बदल असा कि कधी नव्हे ते एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले हे दोन ताकदवान बलवान नेते अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर एकत्र आले आहेत किंबहुना त्यांना एकत्र आणण्यात फडणवीस यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पडली आहे, यापुढे माझा नेता अशोक चव्हाण असे चिखलीकर यांनी भाजपा श्रेष्ठींना सांगून टाकले आहे, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे जे लोकसभा निवडणुकीला घडले ज्यामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले त्या जरांगे फॅक्टरचा नांदेड जिल्ह्यात जो प्रभाव होता त्याविरोधात मराठेतर कधी नव्हे ते संपूर्ण ताकदीनिशी एकवटून त्यांनी भाजपाला येत्या विधानसभेला ताकद देण्याचे मनापासून ठरविले आहे त्यात चिखलीकर आणि चव्हाण पद्धतीच्या भाजपाच्या मराठा नेत्यांना मानणारा त्यांचा समाज आहेच त्यामुळे लोकसभेला संपलेली ताकद नवा जोम भाजपाने पुन्हा मिळविला आहे त्यामुळे ज्या चिखलीकर यांचे गेल्या काही वर्षांपासून पित्त खवळले आहे त्यांनी संपूर्ण ताकद यावेळी पणाला लावून आमदार श्यामसुंदर आणि आशा शिंदे यांचा राजकीय खात्मा करण्याचे नक्की केले आहे. लोकसभा लढविणार कि विधानसभा जेव्हा भाजपा श्रेष्ठींनी चिखलीकरांना विचारले तेव्हा यापुढे माझा विधानसभा मतदार संघ लोह कंधार फक्त त्यांनी सांगितले. भाजपाचा लोह कंधार मतदार संघ केवळ माझ्यासाठी तेव्हा कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता कामाला लागावे, चिखलीकरांनी हेही सांगून टाकले आहे. अशोक चव्हाणांशी माझे असलेले राजकीय मतभेद संपले आहेत कारण ते आता माझ्या भाजपाचे नेते आहेत. चारी धाम यात्रा करणारे जसे काही यात्रेकरू असतात तसे चिखलीकर साऱ्याच पक्षातून फिरून आलेले पण यापुढे माझा मुक्काम पोस्ट केवळ भाजपा, त्यांचा हा शब्द नांदेड जिल्ह्यातील भाजपा संघ हार्डकोअर कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना सुखावून गेला आहे. लोह कंधारचे पुढले आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे नक्की आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी