अबब ! अदानी, धारावी, लफडी
कुलंगडी आणि भानगडी !!
आम्ही करतो तो चमत्कार आणि तुम्ही करता तो बलात्कार, असे काहीसे वागणे बोलणे राज्यातल्या महायुती विरोधकांचे आहे म्हणजे थेट राज्याचा विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे देखील कसा विचित्र वागतो बोलतो बघून तळपायाची आग मस्तकात पोहोचते. जेव्हा अक्षय शिंदे प्रकरण ताजे होते तेव्हा हेच दानवे त्याला त्वरित फाशी द्या, म्हणाले होते मात्र अक्षय पोलीस चकमकीत मारल्या गेल्यानंतर ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांनी त्याची बाजू घेत महायुती सरकार आणि पोलिसांवर टीका केली संशय व्यक्त केला ते बघून एखादा जबाबदार नेता कसा बेअक्कल आणि बेशरम असू शकतो, त्याची नेमकी प्रचिती येते. मिस्टर दानवे कदाचित तुमच्यासारख्या हलकट मूर्ख नेत्यांना हे ठाऊक नसावे कि पीडित छकुलीला डॉक्टरांनीं अत्यंत नाजूक जागी टाके घातले त्यानंतर ते डॉक्टर देखील तासभर ढसाढसा रडले होते, केवळ तुम्हा विरोधकांच्या घरातील बछड्यांना त्या अक्षय शिंदेच्या विकृत कृत्याला बळी पडावे न लागल्याने समस्त टीका करणाऱ्या आणि अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या नीच विरोधकांना या पद्धतीचा भडीमार करतांना लाज सोडावीशी वाटली का ? केवळ एका झटक्यात लबाड हलकट बेअक्कल महाआघाडीचे रूपांतर ‘ बलात्कारी अक्षय शिंदे फॅन क्लब ‘ झालेले बघून या पद्धतीची टीका करणाऱ्यांना शंभर माराव्यात आणि एक मोजावी, वारंवार वाटत राहते. तुम्हीच विरोधक ना ते ज्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करून आरोपीला एका तासात फाशी द्या म्हणणारे आता आरोपीला का मारले म्हणून आरडाओरड करण्यात विकृत आनंद घेता आहात, मला तर वाटते याच अक्षय शिंदेला वाचविण्यासाठी उद्या तुम्हीच वकील उभे केले असते. दानवे पद्धतीच्या मूर्ख विरोधकांनो, तुम्हालाही लेकीबाळी आहेत हे विसरू नये…
www.vikrantjoshi.com
आता वेगळ्या विषयाकडे वळतो. जी बाब लाजिरवाणी किंवा मुंबईकरांना मान खाली घालवणारी त्याचे कौतुक जेव्हा मुंबईकर करतात तेव्हा डान्स बार मध्ये उत्तम नृत्य करणाऱ्या बारबालेच्या नृत्याचे जाहीर कौतुक तिच्या नवऱ्याने करावे तसे आम्हा मुंबईकरांचे वागणे बोलणे म्हणजे मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली धारावी झोपडपट्टी हि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असे जेव्हा आम्ही जगात फिरतांना इतरांना तेही कौतुकाने सांगतो तेव्हा डोळस माणूस नक्कीच मनोमन अस्वस्थ होतो, ज्या धारावी झोपडपट्टीची तुलना फक्त आणि फक्त थेट नरकाशी केल्या जाऊ शकते त्या धारावीचे का म्हणून कौतुक असावे? कसेबसे जिवंत राहता येते ती धारावी, नाही म्हणायला दूरदृष्टी असलेल्या राजीव गांधी यांना ते पंतप्रधान असतांना या धारावीचा संपूर्ण चेहरामोहरा बदलल्या जावा, अगदी मनापासून वाटत होते म्हणून मुंबईत जेव्हा त्यांच्या पक्षाचे काँग्रेसचे भव्य अधिवेशन 1985 मध्ये भरविण्यात आले होते त्या अधिवेशनात पंतप्रधान या नात्याने तेही तब्बल जवळपास 40 वर्षांपूर्वी याच राजीव गांधी यांनी धारावी विकासासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली, दिले ज्यातून नाही म्हणायला याच धारावीत त्यादरम्यान या रकमेतून 15-20 इमारती उभ्या करण्यात आल्या पण जेथे महाराष्ट्र शासन तेथे भ्रष्टाचार पाचवीला पुजलेला, जे आज तुम्हा आम्हा सर्वांना एसआरए च्या इमारती बघतांना वाटते म्हणजे आडव्या झोपडपट्या जाऊन उभ्या झोपडपट्ट्या आल्या आणि त्याभरवंशावर शासकीय प्रशासकीय अधिकारी नेते मंत्री आणि कंत्राटदार बिल्डर्स तेवढे श्रीमंत झाले, हे जे या प्रत्येक इमारतींबाबत घडले आहे तेच नेमके त्यावेळीही घडले म्हणजे राजीव गांधी यांनी तब्बल 100 कोटी दिले खरे पण उभ्या राहिल्या त्या केवळ इमारतीवजा झोपडपट्ट्या, आज त्याकाळी बांधलेल्या इमारतींकडे बघतांना हेच वाटते कि या इमारतींपेक्षा झोपडपट्टी बरी…
धारावीच्या अति प्रचंड भूखंडावर तसा आजतागायत 1985 नंतर झालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा डोळा पण धारावीचा पुनर्विकास करणे अतिशय किचकट आणि जिकिरीचे काम, नाही म्हणायला विलासराव देशमुखांनी आणि अलीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुनर्विकासात बऱ्यापैकी लक्ष घातले होते पण त. दोघेही त्यात फारसे पुढे गेले नाहीत, वास्तविक पृथ्वीराज चव्हाण तसे अत्यंत हुशार आणि त्यामानाने निर्मल माणूस पण त्यांनाही अजिबात यश आले नाही थोडक्यात आजतागायत धारावीचा पुनर्विकास व्हावा हे अगदी मनापासून त्या त्या वेळेला थेट राजीव गांधींपासून तर राज्यातल्या काँग्रेसच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न पण एकही नेता हे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकला नाही शेवटी जेथे कमी तेथे आम्ही, हि म्हण ज्या दूरदृष्टी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तंतोतंत लागू पडते त्यांना जेव्हा एक दिवस प्रत्यक्ष बोलावून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपल्याला राजीव गांधी यांचे हे स्वप्न पूर्ण करायचे आहे, हातात हात घेऊन सांगितले, त्याक्षणी फडणवीसांनी, मी हे काम करवून दाखवेल, शब्द दिला आणि ते अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कामाला लागले मात्र मध्यंतरी जवळपास अडीच वर्षे जेव्हा ते सत्तेबाहेर आणि महाराष्ट्रात उद्धव सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत होती, येथे कौतुक उद्धव ठाकरे यांचे यासाठी कि याच मुख्यमंत्री उद्धव यांनी मनात कसलाही आकस न ठेवता फडणवीसांनी बघितलेले स्वप्न मग ते समृद्धी महामार्गाचे असेल किंवा धारावी पुनर्विकासाचे, कोठेही बाधा आणली तर नाहीच वरून हे प्रकल्प पूर्ण करतांना सर्वोतपरी अगदी महाआघाडी सरकारने सहकार्य केले पण आधी हे काम दुबईच्या ज्या वादग्रस्त सेकलींक कंपनीला देण्यात आले होते त्याऐवजी जेव्हा हेच कंत्राट अटी आणि शर्तींमध्ये अधिक कडक बदल करून अदानी यांना जेव्हा देण्यात आले त्यानंतर याच महाआघाडीच्या विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने विकासाविरोधात म्हणजे महायुती आणि अदानी विरोधात बोंबा मारायला सुरुवात केली आहे, त्यातली नेमकी वस्तुस्थिती, गौतम अदानी यांनी बघितलेले भव्य स्वप्न आणि राजू परुळेकर पद्धतीच्या वादग्रस्त पत्रकारांकडून त्यावर होणारी अवास्तव टीका, नेमकी वस्तुस्थिती मी तुम्हाला पुढल्या भागात सांगणार आहे…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी