खळबळजनक ! हा घ्या विधानसभेचा पहिला निकाल !!
माणूस जेथे सतत श्रीखंड पुरी खायला देखील कंटाळतो, लातूरातल्या अमित विलासराव देशमुखांकडे तर यावेळी मतदार शिळ्या आणि विटलेल्या अन्नासारखे बघायला लागले असल्याने येत्या विधानसभेला जर भाजपा स्थानिक नेत्यांनी एकदिलाने एकजुटीने निवडणूक लढविली तर उद्याचा निकाल आजच लागला हे नक्की, तेथे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचा पराभव अटळ आहे ती एक काळ्या दगडावरची रेघ आहे. 1995 चा अपवाद वगळता, आमदारकी सतत बाप लेकाकडे, 1980 पासून सतत 2004 पर्यंत तेथे विलासराव निवडून यायचे त्यानंतर लागोपाठ तीन वेळा अमित देशमुख लातुरातून निवडून येताहेत, 1995 मध्ये मात्र दिवंगत विलासरावांचा स्थानिक भाजपा नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी फार मोठ्या फरकाने पारभाव केला होता जो विलासरावांना जिव्हारी लागला, नेमक्या चुका कोणत्या त्यावर त्यांनी आत्मचिंतन केले, जनतेशी अत्यंत उध्दट वागणार्या बंधू दिलीप देशमुख यांना चार हात लांब ठेवले त्यानंतर आजतागायत देशमुखांच्या गढीने लातुरात कधीही पराभवाची धूळ चाखली नाही किंबहुना बाप मुख्यमंत्री असतांना विविध नको त्या सवयीतून बदनामी झालेले अमितकुमार जे देशमुखांची गढी ते साखर कारखाना दरम्यान चक्क हेलीकॉप्टर ने ये जा करावयाचे किंवा अमितकुमार हे वागण्या बोलण्याच्या आणि कामांच्या बाबतीत बापापेक्षा थेट काकांच्या पावलावर पाऊल ठेवणारे असतांना देखील किंवा भ्रष्टाचारात त्यांचा हात धरणारे फार कमी असे असूनही केवळ विलासराव बाप असल्याने आजतागायत मतदारांनी त्यांना सतत तीन वेळा आमदार केले पण आता त्यांची नव्हे तर बापाची पुण्याई देखील संपलेली असल्याने राज्यातला भाजपा महायुतीचा निकाल आजच जवळपास लागला आहे, मतदारांना पुढले पाच वर्षे आमदार म्हणून काहीही झाले तरी सतत पाठ करून चालणार्या अमितकुमारांना गढीबाहेर पडू न देण्याचे त्यांनी ठरविलेले आहे…
www.vikrantjoshi.com
नाही म्हणायला अमितकुमारांविरोधात अनेक वर्षानंतर भाजपाने लातूर शहर विधानसभा क्षेत्रात मुठी आवळल्या आहेत त्यामुळे भाजपातर्फे दिल्या जाणार्या कोणत्याही उमेदवाराला जर स्थानिक आणि जिल्ह्यातील प्रभावी भाजपा युतीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले तर मला वाटते मतदानाआधीच अमितकुमार आपला पराभव मान्य करून थंड हवेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने नक्की निघून जातील. सतत 15 वर्षे एकही नवीन प्रकल्प नाही, खड्यात रस्ते कारण दर्जेदार कामे होत नाहीत, अधिकारी घाबरत नाहीत कारण त्यांच्या खांदयावर बंदूक ठेवून सतत विरोधकांना त्रास देण्याची विकृती, जे जवळ आहेत त्यांच्याठायी कोणतीही भावभक्ती नसून केवळ भयापोटी ते अमितकुमारांना बिलगून आहेत, पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती, शब्द अनेकदा दिले पण उजनी धरणाचे पाणी आणले नाही वरून भूमाफिया म्हणून सतत त्यांच्या नावाची चर्चा, लातूर विधानसभा एवढी भंगार आणि गलिच्छ कि 1995 पेक्षा देखील भाजपा महायुतीला पोषक वातावरण, कोणत्याही बाबतीत नो मेरिट, गेल्या 15 वर्षात लातुरात कोणत्या योजना आणल्या असे विचारले तर अमितकुमार लगबगीने उठून गढीवर निघून जातात. आपल्या समस्त कुटुंबाची सततची आर्थिक भरारी थेट विलासरावांच्या पावलावर पाऊल म्हणजे कमाईची सारी साधने केवळ देशमुख कुटुंबियांसाठी, एक लक्षात घ्या तुम्ही देखील विलासराव पद्धतीने जिभेवर साखर ठेवून कायम हसमुखराव म्हणून वावरणारे, पण मतदारांशी संबंध ठेवायचे नाहीत किंवा एखाद्याने भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर फोन डायव्हर्ट केलेला असतो. साखर कारखान्यात किंवा अन्य सहकार क्षेत्रात अनेक गैरव्यवहार, अमितकुमार मतदसर तुम्हाला कंटाळले आहेत, तुमचा पराभव निश्चित आहे…
बेरकी चतुर भ्रष्ट भावखाऊ बिलंदर अशा आमदार अमित देशमुखांचे विधान सभा निवडणूक तोंडावर नाही म्हणायला अगदी गणरायासारखे सतत दहा दिवस लातूरकरांना दर्शन झाले त्यांनी दर्शन दिले एरवी एखाद्या निष्णात जादूगारासारखे मतदारांपासून विकासकामांपासून गायब राहणाऱ्या या आमदाराची आणि देशमुखांची मोनोपली तोडणे लातूरकरांनी नक्की केले आहे, एरवी एखाद्या विटाळशा बाईसारखे कायम लोकांपासून चार हात लांब असणारे अमितकुमार गणेशोत्सवात जेव्हा सेल्फी काढून घेत होते, बघणारे सावध मतदार त्यांची अगदी तोंडावर टर खेचताना दिसत होते. केवळ निवडणुकीच्या तोंडावर डोक्यावरचा पदर बाजूला सारून लोकांना तोंड दाखवत फिरणारा हा बेफिकीर देशमुख, मतदार त्यांना मनापासून मनातून कंटाळले आहेत हीच वस्तुस्थिती आहे. मित्रहो, आमदार अमित देशमुख म्हटले कि अपॉइंटमेंट शिवाय कधीही न भेटणारा नेता, प्रसंगी मतदाराचा जीव गेला तरी ते न भेटणारे जणू त्यांचे पीए हेच स्थानिक उद्धट आमदार. थेट फोन कधीही करायचा नसतो. फार तर मेसेज टाका, उत्तराची वाट बघायची नाही कारण उत्तर क्वचित येते, म्हणूनच मतदार संतापलेले वैतागलेले आहेत. वेळ न घेता अमितकुमारांना भेटून दाखवा आणि स्थानिक मतदारांचे आशीर्वाद मिळवा एवढा सततच्या सत्तेतून आलेला उद्दामपणा आणि बेफिकिरी, एक बरे आहे कि वर भाजपा सत्तेत आहे आणि भाजपाचे स्थानिक किंवा जिल्ह्यातले नेते थेट सतत मतदारांच्या संपर्कात राहणारे, अन्यथा हे असे हलकट आमदार जर सत्तेत असते तर काय झाले असते केवळ कल्पनेने लातूरकरांना अंगावर शहारे येतात. महायुतीच्या घटक पक्षांनी लातुरात कृपया उमेदवारी मागू नये कारण अमितकुमारांना पराभूत करणे भाजपाला आता सहज शक्य आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी