उद्धवजी, पेपर फुटला तुमच्यासाठी हा कट रचला :
परीक्षेआधी प्रश्नपत्रिकेत नेमके काय असेल हे समजावे म्हणून उनाड विद्यार्थी ज्या क्लुप्त्या करतात त्याला तोड नाही, माझ्या एका मित्राने तर थेट मास्तरच्या बायकोला पटविले होते तर दुसऱ्या एका मित्राने मास्तरांना गुंगीचे औषध पाजून त्यांच्या कपाटातून प्रश्नपत्रिका पळविली होती, अलीकडे मी पण तेच केले, विधानसभा निवडणुकीचे नियोजन करणाऱ्या भाजपातल्या एकाला जवळ केले आणि त्याच्या मनात साचलेले सारे खुबीने काढून घेतले. त्यातून जे कळले ते धक्कादायक आहे किंबहुना निवडणूक प्रचारादरम्यान जे आरोप भाजपा आणि महायुतीचे वक्ते थेट उद्धव ठाकरेंवर करणार आहेत ते उद्धवजींना ऐनवेळी निरुत्तर करणारे ठरू नयेत यासाठी ते आरोप येथे आज सांगून फोडून मी मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे जे आरोप आहेत, सुरुवातीला मला वाटले कि ते एकेकाळी मुख्यमंत्री असतांना अंतुले यांच्यावर त्यावेळेच्या विरोधकांनी केले असावेत पण वाचता वाचता लक्षात आले कि आरोप ताजे आहेत थेट उद्धवजींवर केले आहेत जे अत्यंत गंभीर आहेत त्यांना निरुत्तर करणारे आहेत…
www.vikrantjoshi.com
उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असतांना पासून मातोश्री आणि शिवसेना भवनात मुसलमानांची वर्दळ वाढली आहे. तुमच्या प्रत्येक सभेला मराठी माणसांपेक्षा मुसलमानांची उपस्थिती लक्षणीय असते. सभेला भगव्या आणि हिरव्या झेंड्यांची रेलचेल असते. तुम्ही मुख्यमंत्री असतांना उर्दू भवन बांधले, प्रत्येक जिल्ह्यात हज हाऊस उभारले गेले. हाजी अली दरग्याची पुनर्बांधणी केली गेली. महाराष्ट्रात टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारल्या गेले. फाशी गेलेल्या याकूब मेमनची मजार बांधल्या गेली, अमरावतीमध्ये हिंदूंवर हल्ले झाले पण गुन्हे हिंदू विरोधात दाखल झाले. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी पालघर मध्ये साधूंचे निघृण जाहीर हत्याकांड घडवून आणले त्यावर हे हत्याकांड नव्हे तर गैरसमजुतीतून घडलेला तो प्रकार होता तुम्ही म्हणाले. अर्णब गोस्वामीला ठार मारण्यापर्यंत तुमच्या लोकांची मजल गेली होती. बडतर्फ सचिन वाझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यास आधी शिवसेनेत तुम्हीच स्थान दिले होते त्यानंतर त्यास पुन्हा नोकरीत घेऊन तुमच्या काळात त्यास वसुलीचे काम देण्यात आले होते. मुकेश अंबानी तुमचे कौटुंबीक मित्र, त्यांच्या घराखाली स्फोटके ठेवण्यात आली आणि कुभांड उघड न होण्यासाठी हिरेन मनसुख यास ठार मारण्यात आले. आणखी एक छान कार्य तुमच्या कार्यकाळात घडले, वसतिगृहात राहणाऱ्या मुसलमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वार्षिक 48000 रुपये अनुदान सुरु करण्यात आले. त्याहीपुढे तुमच्या सरकारने भरीव कामगिरी केली, पोलीस खात्यात अधिक मुस्लिम असावेत म्हणून सरकारी खर्चाने करोडो रुपये खर्च करून त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात आली. तुमच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा म्हणू पाहणाऱ्या खासदार महिलेला तुमच्याच आदेशावरून पोलिसांनी उचलून नेले होते. तुमच्यावर असलेल्या आरोपांची हि तर सुरुवात आहे…
आपण सभोवताली बघतो कि अनेक नवविवाहित जोडप्यांच्या संसाराची सुरुवात छान होते पण त्यानंतर त्यातल्या अनेकांचा थेट घटस्फोट होतो, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात विशेषतः राज्यातही सुरुवात छान झाली म्हणजे ज्यांनी सत्तेचा गैरफायदा घेत प्रचंड माया जमविली होती त्यांना जेरीस आणल्या गेले पण ज्यांना अडचणीत टाकले त्यांनाच जेव्हा अगदी आपल्या राज्यातल्या भाजपा महायुती सरकारने देखील जवळ घेऊन ज्या पद्धतीने त्यांच्यावर असलेल्या संकटाचे मळभ दूर सारीत त्यांना वरून सत्ता दिली त्यामुळे सरकारची अधिक बदनामी झाली आणि जे संकटात अडकले होते ते त्यानंतर नक्कीच कुठल्याही आर्थिक संकटात यासाठी अडकणार नाहीत कारण त्या सार्यांनीच एक नामी शक्कल शोधून काढली म्हणजे माझ्या बघण्यात सत्तेसभोवताली जमा झालेले असे अनेक दलाल नेते अधिकारी व्यापारी आहेत ज्यांनी अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर अतिशय खुबीने स्वतःकडली सारी काळी संपत्ती परदेशात वळविली एवढेच नव्हे तर त्या समस्त मंडळींनी ज्या देशात काळी संपत्ती वळविली आहे तेथेले नागरिकत्व देखील त्यांनी मिळविले असल्याने यापुढे मोदी सरकार किंवा राज्य सरकार यापद्धतीच्या अजय आशर छाप लोकांचा बाल देखील बाका करणे अशक्य आहे थोडक्यात जो तो पळवाटा शोधतो आहे म्हणजे मराठी माणूस आपल्यापासून दूर झाला म्हणून उद्धव यांनी सिनेमातल्या एखाद्या खलनायका सारखी भूमिका स्वीकारली, खलनायक जसा अखेरच्या क्षणी नायकाच्या आई बहिणीला प्रेयसीला चाकू किंवा पिस्तूल गळ्याशी धरून स्वतःचा बचाव करतो त्याचपद्धतीने उद्धव यांनी कठीण राजकीय दिवसात सत्व आणि तत्व बाजूला ठेवून मुसलमानांना जवळ घेतले आहे, थोडक्यात जो तो हिंदू आणि हिंदुस्थानचे वाटोळे करण्यात विकृत आनंद घेतो आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी