अहाहा ! सामंत बंधूंची मज्जा, राजापूरवरही कब्जा !!
एकाच क्षेत्रात, व्यवसायात, उद्योगधंद्यात किंवा राजकारणात भाऊ भाऊ आधी एकत्र येतात सुरुवातीला एकत्र असतात नांदतात मोठे होतात नंतर मात्र त्यांच्यात कालांतराने विशेषतः पुढली पिढी वयाने मोठी झाली हाताशी आली कि हमखास जिवाभावाच्या या नात्यात स्पर्धा निर्माण होते त्यातून बहुतेकवेळा वितुष्ट येते, आपण हे खूप ठिकाणी बघतो, अनुभवतो. वास्तविक संघटना किंवा पक्ष बांधणीत अगदी सुरुवातीपासून गोविंदाव आदिक हे रामरावपेक्षा अधिक उजवे होते पण सत्तेच्या राजकारणात रामराव आदिक यांना जे दीर्घ आणि हमखास यश मिळाले ते गोविंदराव यांच्या फारसे वाट्याला आले नाही, पण तरीही त्यांच्यात वित्तुष्ट आले नाही, रामराव आदिकांची मुलगी जावई जांबुवंतराव धोटे नात राजकारणात होते आले पण दोन्ही मुलांनी मात्र त्याकडे कायम पाठ केली, गोविंदरावांची मुलगी अनुराधा श्रीरामपूरची नगराध्यक्ष आहे आणि मुलगा अविनाश उशिरा का होईना राजकारणात आला त्याने वडील गोविंदराव पद्धतीने पवार कुटुंबियांशी उत्तम संबंध ठेवले, त्याची सत्तेच्या राजकारणात लॉटरी लागू शकते. शिरपूरचे मुकेश, अमरीश भूपेश पटेल तिघेही राजकरणात त्यातले मुकेश लवकर निवर्तले, पण तिघेही भाऊ एकमेकांना कायम सहकार्य करीत फार पुढे निघून गेले, आपापसात कधीच भांडले नाहीत. पंकज भुजबळांना अनेक बाबतीत मोठ्या मर्यादा असल्याने सुरुवातीपासून अगदी ठरवून छगन भुजबळांनी पुतण्या समीर यास पंकजपेक्षा कायम प्राधान्य दिले, पंकज यांना सांभाळून घेण्याची मोठी जबाबदारी समीर यांच्यावर आहे, काका पुतणे एकमेकांना घट्ट बिलगून असतात, बाळासाहेबांसारखे त्यांनी कधीही समीर यास वाऱ्यावर सोडले नाही. तिकडे नव्या मुंबईत जोपर्यंत तुकाराम ज्ञानेश्वर आणि गणेश नाईक एकमेकांना घट्ट चिपकून बिलगून होते तोपर्यंत नव्या मुंबईत नाईक कुटुंबियांसमोर कोणतेही विरोधक कधीही टिकले नाहीत पण तुकाराम नाईक हयात असतानांच गणेश नाईक आणि त्यांच्यात कायमची कटुता आली त्यात तुकाराम यांचे चिरंजीव वैभव देखील बापाच्या मदतीला राजकारणात उतरले, थोडक्यात पुढली पिढी सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर नाईक कुटुंबीय एकमेकांपासून दुरावले मात्र आजतागायत धाकटे ज्ञानेश्वर यांनी कधीही गणेश नाईकांची साथ न सोडल्याने प्रसंगी संजीव आणि संदीप यांना बाजूला सारून गणेश नाईकांनी मोठ्या मनाने पुतण्या सागर तुकाराम नाईक यास नवी मुंबईत दीर्घकाळ महापौरपद ताब्यात दिले, गणेश नाईक यांची मुले संजीव खासदार झाले संदीप आमदार झाले पण संजीव सागर संदीप एकदिलाने काम करताहेत जे दुर्दैवाने दिवंगत तुकाराम आणि वैभव यांना न जमल्याने राजकारणातली उत्तम जाण आणि एखाद्याला अंगावर घेण्याची ताकद असताना देखील गणेश नाईकांना सोडल्याने तुकाराम आणि वैभव यांचे मोठे राजकीय नुकसान झाले. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातली भाऊबंदकी हा विषय मोठा आहे त्यावर आणखी कधीतरी…
www.vikrantjoshi.com
रत्नागिरी जिल्ह्यातली फार मोठी राजकीय आणि व्यवसायिक ताकद अण्णा सामंत आणि त्यांची मुले उद्योगमंत्री उदय सामंत आणि थोरले किरण सामंत, 2004 ते आजतागायत, जिल्ह्याच्या राजकारणात सतत एक ते दहा क्रमांकावर फक्त आणि फक्त सामंत बंधू त्यानंतर राजन साळवी बाळ माने इत्यादी, नाही म्हणायला रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे बाळ माने बऱ्यापकी नेतृत्वात आघाडीवर पण त्यांच्यावर विनोद तावडे यांचा शिक्का बसल्याने त्यांच्याकडे इतरांचे दुर्लक्ष झाले अन्यथा सामंत यांच्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने मोठी पकड नक्की निर्माण केली असती, सत्तेच्या राजकारणात बाळ माने यांची अवस्था नवरा परदेशात आणि उफाडी बायको एकटी मुंबईच्या घरात अशी आहे. मुलाचं पाय पाळण्यात, 2004 पूर्वीच उदय सामंत यांची राजकीय धडपड आणि पवार कुटुंबियांशी असलेली जवळीक, राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात त्यांची पवारांना होणारी मोठी मदत, महाशय फार पुढे निघून जातील, मी तेव्हाच उदय यांना म्हणालो होतो जे नेमके पुढे घडले, बहुतेक विधान सभा निवडणुकीनंतर उदय सामंत थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पहिल्या तिघांत, मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही, उदय जे ठरवितात तेच करून दाखवितात म्हणून एखाद्या नटीशी त्यांची नव्याने ओळख झाली कि नीलमवहिनी जाम तणावाखाली असतात. 2004 पासून सतत चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले उदय येणाऱ्या विधानसभेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे यावेळी हमखास निवडून येणारे उमेदवार, आता याच उदय आणि किरण सामंत यांना सतत तीन वेळा निवडून येणाऱ्या राजन साळवी यांची मोनोपली मोडीत काढायची असल्याने राजापूर लांजा विधान सभा मतदार संघातून उदय यांच्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात काकणभर उजवे ठरलेले थोरले किरण सामंत साळवी विरोधात निवडणूक लढवतील आणि फार मोठ्या फरकाने राजन साळवी यांना पराभूत करतील. एकनाथ शिंदे यांना विशेषतः कोकणातून उबाठा सेनेला हद्दपार करायचे आहे ज्याची जबाबदारी त्यांनी आपले उजवे हात उदय आणि किरण सामंत यांच्यावर सोपविली आहे. पण कधीतरी मन यासाठी साशंक होते कि हि सामंत कुटुंबियातली वादळापूर्वीची तर शांतता नाही म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहतील, कायम उदय यांना निवडून आणण्यात राजकीय दृष्ट्या मोठे करण्यात किरण तुम्ही आघाडीवर मग तुम्ही स्वतः का आमदारकी लढवत नाही, हा सल्ला तर एखाद्या अति जवळच्याने किरण यांना दिला नाही आणि त्यातून तर हि राजकीय गडबड सामंतांच्या घरी नजीकच्या काळात घडणारी आहे, असे घडायला नको, भाऊबंदकीची सुरुवात होऊन सामंतांना द्रिष्ट लागता कामा नये, हा विषय अपूर्ण आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी