राज्याचे राजकारण काहीसे स्फोटक
खूपसे खळबळजनक :
भाजपा रा स्व संघ आणि शिवसेना उबाठा यात फरक असा कि भाजपापासून दुखावलेले आणि दुरावलेले उद्धव ठाकरे अलीकडे मराठीबाणा संकटात किंवा अडगळीत टाकून अगदी उघड मुसलमानांना बिलगून मोकळे झाले आहेत किंबहुना भाजपा आणि संघाने तर हे नक्कीच ठरविलेले आहे कि हिंदूंना अतिशय जाचक आणि मुसलमानांना स्वैर मुभा मोकळीक देणारे जे अतिशय घातक असे मुस्लिमधार्जिणे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यास देशातले मुसलमान मनापासून मान्यता देणार असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात सामील करवून घेण्यास संघ भाजपाची कोणतीही आडकाठी किंवा हरकत नाही, मुसलमानांना खुश करण्यासाठी उगाचच हिंदूंवर हिंदुस्थानावर लादलेले कायदे त्यात बदल करण्यात येणार नसेल तर मात्र हिंदुस्थानवर कबजा करण्याचा मुसलमानांचा मतलबी डाव आहे हे सहज सिद्ध होते आणि संघ भाजपा म्हणजे उबाठा शिवसेना नाही कि क्षणिक राजकीय फायद्यासाठी किंवा मते मिळविण्यासाठी सत्व आणि तत्व बासनात बांधून बाजूला ठेवून मुस्लिम राष्ट्राची कुर्हाड पायावर मारुन घेईल. वास्तविक नरेंद्र मोदी हयात किंवा सत्तेत असेपर्यंत हिंदूंसाठीचे अत्यंत अतिशय घातक असे मुस्लिमधार्जिणे कायदे त्यात बदल घडवून आणण्याचे भाजपाने ठरविले होते, पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने देशातल्या समस्त मुसलमानांना दलितांनी मोठी साथ दिली त्याचवेळी बहुसंख्य हिंदू मतदारांनी भाजपा आघाडीकडे पाठ फिरविली त्यामुळे जेमतेम खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदी संघ आणि भाजपाचे स्वप्न हवेत विरले, हिंदूंनीच हिंदूंचे लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान करवून घेतले. सुदैवाने संघांचे मुख्यालय नागपुरात असल्याने काही केल्या संघ परिवाराला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचा पराभव टाळायचा असल्याने या दिवसात कधी नव्हे ते संघातले मान्यवर यादिवसात अनेकदा फडणवीसांशी शंका असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करतात अशी माझी पक्की माहिती आहे…
www.vikrantjoshi.com
संघाच्या मुशीतून संस्कारातून काहीसे बाजूला होत आजतागायत कितीतरी स्वयंसेवक थेट भाजपाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पण जे संघाचे हार्डकोअर स्वयंसेवक किंवा पदाधिकारी असतात त्यांचे भाजपाच्या राजकीय हालचालीकडे फारसे लक्ष नसते यावेळी मात्र पहिल्यांदा हे घडतांना मी बघतो आहे कि संघातले प्रमुख पदाधिकारी अर्थातच भागवतांच्या सूचनेवरून कधी नव्हे ते वेळोवेळी फडणवीसांशी राज्यातल्या सद्य राजकीय परिस्थितीचा वेळोवेळी व्यक्तिगत गाठभेट घेत आढावा घेतात हे नक्की आहे, संघाला सत्तेततून नक्कीच काही मिळवायचे नसते पण हिंदुत्व अडचणीत येत असेल तर मात्र संघ परिवार काहीसा सावध होत मार्गदर्शन करण्यात पुढे धजावतो. अजित पवारांना युतीमध्ये सामील करून घेण्याच्या अमित शाह यांच्या निर्णयाला जसे राज्यातले संघ भाजपा परिवाराशी संबंधित प्रत्येक व्यक्ती वैतागली आहे नेमकी नाराजी संघ पदाधिकाऱ्यांची देखील आहे म्हणून विधानसभा शक्यतो शिंदे शिवसेना अजितदादा राष्ट्रवादी आणि भाजपाने वेगवेगळी लढवावी आणि निकालानंतर किंवा निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र युती करावी हा संघाचा सल्ला त्यावर अजित पवारांशिवाय निवडणूक लढणे सहज शक्य आहे पण शिंदे यांना बाजूला सारून भाजपाने एकट्याने निवडणूक लढवावी हे नक्कीच शक्य नाही हा ठाम निर्णय भाजपाने घेतला आहे त्याशिवाय अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपावर विश्वास टाकून थेट शरद पवारांशी पंगा घेत बाहेर पडणाऱ्या अजित पवारांना येणाऱ्या विधानसभेला वाऱ्यावर सोडायला भाजपा नेतृत्व अजिबात तयार नाही त्यातूनच मनसे, एमआयएम, आंबेडकर गट आणि अजितदादा एकत्र येत थोडक्यात तिसऱ्या आघाडीला जन्म देत एकाचवेळी महाआघाडीला आव्हान आणि अजित पवारांना राजकीय ताकद देण्याचे जवळपास नक्की झालेले आहे…
लोकसभा निवडणुकीनंतर मला हे वारंवार वाटत असे कि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्ये वित्तुष्ट येऊन त्याचा मोठा फायदा महाआघाडीला होईल पण अलिकडल्या काहीच दिवसात राज्यातली राजकीय परिस्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे कारण काँग्रेस नेत्यांना जे वाटते तेच नेमके शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना वाटते कि आपण इतर दोघांपेक्षा वरचढ आहोत म्हणून मुख्यमंत्रीपद आपल्या वाट्याला यावे किंबहुना आतापासून नेमका कोणाचा मुख्यमंत्री असेल हे महाआघाडीच्या नेत्यांनी एकत्र निर्णय घेऊन तसे जाहीर करावे त्यादृष्टीने सुरुवातीला त्यांची आपापसात चर्चा व्हायची आता मात्र वाद व्हायला लागले आहेत, अत्यंत महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हव्यासापोटी विरोधक राहिले बाजूला शरद पवार आपणहून महाआघाडीतल्या उबाठा आणि काँग्रेसचे महत्वाचे उमेदवार अपक्षांना सहकार्य करून नक्की पराभव घडवून आणतील, यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक प्रभावी ताकदवान नेते अपक्ष निवडणूक लढवतील आणि निवडणुकीनंतर व्यक्तिगत पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन मोकळे होतील अर्थातच पवार अपक्षांना मंत्रिमंडळात घेतील असे बहुतांश अपक्षांना वाटते आहे, हा गोंधळ किंवा महाआघाडीतली हि स्पर्धा नक्कीच महायुतीसाठी फायद्याची दिसते आहे. महाआघडीच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत न अडकता महायुतीने जनतेच्या विकासाची जी कामे केली त्यावर सतत बोलत राहणेच त्यांच्या आता अधिक फायद्याचे आहे….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी