खळबळजनक : सरसंघचालक और मौलानाका
मिलाप कौन खिलाप :
अनिलकुमार गायकवाड एमएसआरडीसीचे एमडी आहेत ते बौद्ध आहेत बौद्ध धर्माचे एवढे स्ट्रॉंग फॉलोअर आहेत कि दिवसभरात वेळात वेळ काढून ते हटकून त्यांच्या एखाद्या भंत्यांना हमखास भेटतात, बौद्ध समाजावर सकारात्मक चर्चा करण्यासाठी, थोडक्यात गायकवाडांचे आपल्या धर्मावर जरी नितांत प्रेम असले तरी या देशातले जे बोटावर मोजण्या एवढे जे बौद्ध धर्मातील काही प्रमुख अनेकदा अनेकदा रा स्व संघाच्या किंवा थेट सरसंघचालक मोहन भागवतांच्या संपर्कात असतात त्यापैकी एक अनिलकुमार गायकवाड, कदाचित हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हीच वस्तुस्थिती आहे, गायकवाड अगदी जाहीर संघाच्या काही कार्यक्रमांना देखील हजेरी लावतात तरीही बौद्ध धर्मावर असलेली त्यांची नितांत श्रद्धा, म्हणूनच या राज्यातील एकही बौद्ध मान्यवर त्यांच्या या संघाशी उघड असलेल्या नात्यावर संबंधांवर कधीही जाहीर किंवा खाजगीत नाराजी व्यक्त करीत नाही उगाच शंका घेत नाही, नेमके हेच मला अपेक्षित आहे कि धर्म वेगळा किंवा वैचारिक मतभिन्नता असू शकते पण देशाच्या प्रगतीसाठी एकत्र बसून हेल्दी डिस्कशन करायला हरकत नाही हि जी मोहन भागवतांची अगदी उघड भूमिका आहे त्यावर दुमत असण्याचे अजिबात कारण नाही. देशातल्या मुस्लिमांना तुम्ही देशाबाहेर काढणे शक्य नाही त्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, अन्न वस्त्र आणि निवारा तिन्ही बाबत असलेली त्यांची सततची अस्वच्छता अज्ञान घालवून त्यांचे विचार केवळ बुरखा मदरसा द्वेष मत्सर खुनशी वृत्ती ज्या अन्न सेवनाची अजिबात गरज नाही त्यापासून त्यांना दूर नेणे, इत्यादी ज्या चुकीच्या मार्गावर नेणारे आहेत असतात त्यापासून त्यांना परावृत्त करणे, मला वाटते नेमकी हि तीव्र इच्छा सरसंघचालकांची आहे त्यातूनच त्यांनी उचललेले एक पाऊल पुढे, त्यांच्या भूमिकेवर विशेषतः हिंदूंमध्ये काही गैरसमज पसरले आहेत, त्यावर मला नेमके सांगायचे आहे…
www.vikrantjoshi.com
सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचा मुस्लिम मौलानांचा सन्मान करतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या परिणामांना घाबरून संघ आता मौलाना आणि मशिदीत जाऊ लागला असा अपप्रचार होत आहे वास्तविक तो प्रकार नाही, हा व्हिडीओ 2023 च्या सुरुवातीचा आहे. हे सत्य आहे कि 2022 मध्ये मौलाना इलियासी यांच्या विनंतीवरून भागवत मशिदीत गेले होते तेथे त्यांनी मदरशात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला पण या प्रकाराचा भागवतांना नव्हे तर इलियासी यांना मोठा मानसिक त्रास काही कट्टर धर्मांध मुस्लिमांनी दिला. त्यांना धमक्या देण्यात आल्याने इलियासी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अतिशय महत्वाचे म्हणजे 8 जुलै 2023 रोजी मौलाना इलियासी यांच्या मुलाच्या विवाह निमित्ते ठेवलेल्या रिसेप्शनला सरसंघचालक गेले होते त्याठिकाणी त्यांच्या हस्ते काही मान्यवर मुस्लिमांचा सन्मान करण्यात आला. मौलाना इलियासी यांनी भागवत यांना राष्ट्रऋषी राष्ट्रपिता अशी उपमा दिली, थोडक्यात देशाला ज्याची गरज आहे तेच मौलाना आणि सरसंघचालकांनी घडवून आणले, मला वाटते समस्त मुस्लिमांचे मन परिवर्तन आणि देशाविषयीचा आदरभाव वाढविण्या हि मोठी सुरुवात असतांना काही हलकट जेव्हा या बदलला राजकीय स्वरूप देतात तेव्हा डोक्याचा भुगा होतो. हिंदूंनी काळजी करण्याचे वास्तविक अजिबात कारण नाही जो बदल फार पूर्वी संघाकडून अपेक्षित होता ती हिम्मत भागवतांनी दाखविली, मुस्लिमांचे मन आणि मत परिवर्तन हाच त्यामागे निर्मल आणि उदात्त हेतू, त्यातून संघ सेक्युलर किंवा मुस्लिमधार्जिणा होईल असे होत नसते होणार नाही….
भागवतांची भूमिका आणि हालचाल कौतुकास्पद अशी कि इलियासी यांच्या बोलण्यातून राष्ट्र प्रथम, देशभक्ती, रामभक्ती असे शब्द बाहेर पडले. त्यांनी अयोध्येत राम मंदिरात अनेक मौलानांना सोबत घेऊन दर्शन घेतले आहे. त्यांना मनापासून वाटते कि हिंदू मुस्लिम समाजात सदभावना निर्माण करून भारताला विश्व्गुरु केले पाहिजे, भागवतांमुळे घडून आलेला हा बदल त्यावर करावे तेवढे कौतुक कमी पडेल. संघ जोडण्याचे काम करतो त्याचे विचार संकुचित नाही प्रसंगी संघ वैचारिक विरोध असलेल्यांना किंवा बौद्ध मुस्लिमाशी देखील मैत्रीचा हात पुढे करतो, संकटात त्यांच्या मदतीला संघ स्वयंसेवक जीवाची बाजी लावून पुढे येतात,महत्वाचे म्हणजे संघ स्वयंसेवकांचा सरसंघचालकांवर प्रचंड विश्वास आदर आणि प्रेम असते, संघ कार्यावर स्वयंसेवकांची श्रद्धा असते त्यांच्यासाठी आदेश महत्वाचे असतात कारण संघाची प्रत्येक भूमिका आणि उचललेले पाऊल केवळ राष्ट्रप्रेम त्यात ओतप्रोत भरलेले असते, संघाने किंवा त्यांच्या प्रमुखांनी मुस्लिमांबाबत उचललेले पाऊल केवळ सुरुवात आहे, पुढे त्याची व्याप्ती वाढणार आहे, सत्याची जाणीव करून देत समस्त मुस्लिमांना राष्ट्र प्रेमाच्या प्रवाहात ओढणे हेच संघाचे यापुढे हाती घेतलेले मोठे काम असेल…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी