राज्याच्या राजकारणातले खळबळजनक
गॉसिप्स व टॉपिक्स : भाग 2
निखिल वागळे म्हणजे मीडियातले खांडेकर नाहीत कि पवारांनी मुलीच्या राजस्थानातील अत्यंत महागड्या डेस्टिनेशन मॅरेजचा संपूर्ण खर्च उचलला कि लगेच त्यांना विकले जाऊन पवारांची बाजू घ्यायला मोकळे किंवा वागळे त्या खांडेकर कुबेर पद्धतीचे हलकट विकाऊ मीडियातले नसावेत कि पवारांनी महागड्या हॅरिअर्स मोटार गाड्या एकाचवेळी मीडियातल्या अनेकांना पाठविल्या गिफ्ट केल्या कि प्रसंगी सर्वांदेखत पवारांनी सांगितले तर त्यांचे थेट ढुंगण देखील धुऊन मोकळे व्हायचे, राजकीय आणि आर्थिक अपयशाला केवळ प्रामाणिकराहिल्याने अलीकडे निखिल वागळे स्वतःवर कदाचित वैतागले असावेत त्यातून त्यांनी एकेकाळी ज्या उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा थेट बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय लफडी कुलंगडी बाहेर काढून ज्यांचे जिणे हराम केले होते, आज जेव्हा सतत न चुकता न थांबता हेच वागळे जेव्हा त्याच ठाकरे पवार गांधी घराणे किंवा महाआघाडीला डोक्याला घेऊन नाचताहेत त्यांचा हा घसरलेला दर्जा बघून यापुढे मीडियात वावरतांना हेच जाणवते कि पूर्वीची विश्वासहर्ता आता जवळपास लयाला गेली आहे…
www.vikrantjoshi.com
लाडक्या बहिणी महायुतीला फटका देणार, महाविकासाचा विजयी आरंभ उद्धव ठाकरेंनी जिंकलं, महायुती निवडणुकांना का घाबरतोय, पद्धतीचे वागळेंचे अलीकडे जवळपास सारेच महाआघाडीच्या बाजूने सतत झुकणारे व्हिडीओज बघतांना एकेकाळच्या लढाऊ आणि विकाऊ नसलेल्या निखिल वागळेंचा देखील आयुष्याच्या अखेरच्या दिवसातला भगवानदादा सिल्कस्मिता किंवा ओ पी नय्यर किंवा पिंजरा सिनेमातला मास्तर झाला आहे कि काय, हि दाट शंका आणि शक्यता मनाला आपोआप चाटून जाते. लाडकी बहीण योजना विषयी बोलतांना वागळे यांनी अनेकदा राज्यातल्या लाडक्या बहिणींचा थेट अपमान केला आहे, आम्ही शासकीय आर्थिक मदत घेऊ पण महायुतीला मतदान करणार नाही, हे वाक्य वागळे यांनी राज्यातल्या महिलांच्या तोंडी घालून एकप्रकारे आपल्या बहिणी जेथे खातात तेथेच त्या घाण करणार आहेत, हे त्यातून सुचविले आहे, मिस्टर वागळे माझ्या राज्यातल्या बहिणी म्हणजे मीडियातली बळावलेली विकल्या गेलेली वेश्यावृत्ती नाही, महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा तो इतिहास आहे कि चुकीच्या मार्गाने येणारे पैसे प्रसंगी उपाशी राहावे लागले तरी स्वीकारायचे नाही पण आदराने विश्वासाने प्रेमापोटी भाऊबीज देणारा भाऊ त्यांना थेट वडिलांच्या स्वरूपात दिसतो आणि नेमकी अशीच भाऊबीज ज्या भगिनींनी स्वीकारली आहे, त्या विकाऊ मीडियासारख्या नक्कीच पाठीशी उभे असणाऱ्या महायुतीला फसवणार नाहीत, इजा बीजा तिजा म्हणजे अंतुले यांनी सुरु केलेली संजय गांधी निराधार योजना जशी त्यांना अमरत्व बहाल करून मोकळी झाली किंवा ज्या अशाच लाडक्या बहीण योजनेमुळे मध्य प्रदेशातल्या समस्त भगिनींनी भाजपाला डोक्यावर घेतले नेमके आणि नक्की तेच महाराष्ट्रात येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत घडणार असल्याने तुमचे किंवा तुमच्या वृत्तीला साजेशा काही हलकट मीडियाचे किंवा शरद पवार पद्धतीच्या सूड उगवण्यात वाकबगार असलेल्या महायुती विरोधकांचे माथे ठणाणले आहे…
माझा राजकीय पत्रकारितेचा जवळपास सतत 45 वर्षे प्रवास, हे राज्य काही घराण्यांच्या ताब्यात आहे असते आणि या घराण्यांना डावलून जर इतरत्र सत्ता वळविल्या गेली तर सत्ता वळविणाऱ्याचा नेहमीसाठी राजकीय खात्मा केल्या जातो, हा प्रयत्न 1980 दरम्यान त्यावेळेच्या मुख्यमंत्री अंतुले यांनी केला म्हणून यांना लवकरच कायमस्वरूपी राजकीय सत्तेपासून दूर केल्या गेले, त्यांचा कोणीही वाली उरला नव्हता, 2014 पासून हाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने हि घराणी कधी उघड तर कधी थेट महायुतीमध्ये ठाण मांडून फडणवीसांचा देखील अंतुले करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, या मंडळींचा म्होरक्या अर्थात शरद पवार आहेत. प्रख्यात लेखक माजी प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील म्हणतात, महाराष्ट्र राज्याचे राजकारण येथली 70 घराणी चालवतात. हि मंडळी हवे तर आपल्या गुडघ्याच्या वाट्या आणि डोळ्यांच्या बाहुल्या काढून देतील, मात्र आपल्या घरातील आमदारकी दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाहीत. कार्यकर्ते नावाची जी महान जमात जन्माला आली आहे, ती आपल्या मालकाच्या पालख्या उचलण्यात आणि सर्किट हाऊसला तसेच आमदार निवासाच्या वळचणीला वाट पाहण्यात धन्यता मानते….नेमके विदारक सत्य विश्वास पाटलांनी सांगितले आहे म्हणूनच घराण्यांची हाजी हाजी करून फडणवीस पद्धतीच्या नेत्यांना जर वागळे सारखी मीडिया विनाकारण बदनाम करीत असेल तर यापद्धतीच्या मीडियाला नेमकी जागा दाखविणे गरजेचे ठरते….
क्रमश : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी