अब कि बार फिरसे युती सरकार :
सर्वाधिक दुर्दैवी भारतीय स्त्री जी बहुसंख्य सिगारेट विडी दारू तंबाखू विड्याची पाने घुटके कांदे लसूण उग्र मसाले गांजा अफिम इत्यादींचे हमखास दररोज सेवन करणाऱ्या व्यसनी हमखास घाणेरडा दर्प सतत तोंडातून बाहेर सोडणाऱ्या आपल्या या अशा नालायक नवऱ्याचा नित्यनियमाने ओठांचा बलात्कार सहन करते त्याची लैंगिक विकृती शारीरिक भूक शमविते. ज्या पुरुषांना यापद्धतीने कुठलेलंही व्यसन नाही ज्यांच्या तोंडाला उग्र गलिच्छ सतत दर्प येत नाही त्या पुरुषांच्या बायका खऱ्या अर्थाने भाग्यवान थोडक्यात भारतिय स्त्री जशी गुण दोषांसहित केवळ उच्च संस्कृतीतून उत्तम संस्कारातून आपल्या या अशा नालायक नवऱ्याला स्वीकारते, मीडियात पोट भरतांना माझे देखील हे असेच झाले आहे, सत्तेशी संबंधित अमुक एखाद्याशी मैत्री झाल्यानंतर मी त्या मैत्रीला अखेरपर्यंत संपूर्ण गुण दोषांसहित स्वीकारतो. फडणवीसांचे देखील नेमके हे असेच असावे, ते एखाद्याच्या चुका पदरात घेतात आणि शरण आलेल्या किंवा पुन्हा त्यांच्याकडे परत आलेल्यांशी मैत्रीचा दोस्तीचा हात पुढे करून मोकळे होतात. फडणवीस भाजपाचे कार्याध्यक्ष होताहेत हि अफवा त्यांच्याच पक्षातले त्यांचे हितशत्रू पसरवीत असतांना ज्यांनी अफवा पसरविली तेच आता एकाचवेळी आधी तोंडावर नंतर ढुंगणावर आपटले आहेत, फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची भाषा करणाऱ्यांना बसलेला धक्का म्हणजे भाजप पक्ष श्रेष्ठींनी येणाऱ्या विधान सभा निवडणुकीची संपूर्ण पूर्णतः जबाबदारी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त फडणविसांवर टाकली आहे त्यावर फडणवीस यांनी आता कसे आलो परत असे म्हणून त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना किंवा आपल्या पक्षीय विरोधकांना अजिबात वाकुल्या न दाखविता, नेहमीच्या स्मित हास्य वदनाने टाकलेल्या जबाबदारीचे मनापासून स्वागत केले आहे…
www.vikrantjoshi.com
आणखी एक गुपित येथे उघड करतो जे फोडल्याने कदाचित अनेकांच्या भुवया उंचावतील, कित्येकांच्या पोटात दुखायला लागेल तर बहुसंख्य पुढले वाक्य वाचल्यानंतर जागेवरून उठतील आणि उंचच उंच उड्या मारून नाचायला लागतिल शेजारी बायको उभी असेल तर तिचे पटापट मुके घेऊन मोकळे होतील. लोकसभा निवडणुकांच्या कित्येक महिने आधी मी राज्यातल्या भाजप प्रमुखांना तुमचे देऊळ पाण्यात आहे जेव्हा सांगितले त्याला त्यांनी छद्मी हसून दुर्लक्ष केले पण मी सांगितले तेच पुढे घडले. यावेळी सांगतो, महाआघाडी या विधानसभेला नक्की अडचणीत आहे, तिला सत्तेत बसणे अवघड आहे म्हणूनच शरद पवार या दिवसात कमालीचे अस्वस्थ आहेत कारण पवार या राज्यातले एकमेव असे नेते जे राज्यातल्या निवडणुकांचे भाकीत अतिशय तंतोतंत जवळच्या मित्रांना सांगत असतात त्यांनी लोकसभेला वर्तविलेली आकडेवारी जशीच्या तशी खरी निघाली. विधान सभा निवडणुकीला काही खरे नाही त्यांच्या हे लक्षात आल्याने ते काळजीत आहेत. काही महत्वाच्या राजकीय घटना अशा कि उद्धव ठाकरे स्वतःची वेगळी चूल मांडण्याच्या प्रयत्नात असल्याने आघाडीला तो मोठा धक्का आहे. तिकडे राज्यातले मुसलमान मतदार अचानक उद्धव ठाकरेंपासून दूर गेले आहेत त्यांनी पुन्हा पूर्वीच्या आवडत्या मुसलमान नेत्यांना सलाम ठोकणे सुरु केलेले आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या मनोज जरांगे या यशस्वी मराठा नेत्याचा, शरद पवार आपला आणि आपल्या आंदोलनाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी कंडोम सारखा करून घेताहेत हे त्यांना विशेषतः राज्यातल्या काही महत्वाच्या मराठा शासकीय अधिकाऱ्यांनी आणि मराठा विचारवंतांनी आणून दिल्यामुळे किंवा शिंदे फडणवीस आणि अजित पवार हेच नेमके कसे मराठा आरक्षणाचे तारणहार हेही जरांगे यांच्या लक्षात आल्याने किंवा आणून दिल्याने मी शपथेवर सांगतो, जरांगे पवारांपासून दूर गेले आहेत त्याचवेळी त्यांचे लाडके पिल्लू एकनाथ शिंदे हे जरांगे आणि आंदोलकांना अधिकच आवडू लागलेले आहे, मित्रांनो, विधानसभा जवळपास आजच राज्याच्या महायुतीने जिंकलेली आहे…
आणखी एक महत्वाचा माझा आवडता मुद्दा जो स्वतः फडणवीसांना कदाचित आवडणार नाही रुचणार नाही कारण त्यांना स्वतःचे व्यक्तिगत असे कौतुक करवून घ्यायचे नसते, स्वस्तुती करणारा तो एक मूर्ख जाणावा, त्यांच्या बोलण्यात ते जाणवते, तरीही सांगतो. 2014 नंतर महाराष्ट्र विशेषतः मुंबई, हे राज्य समृद्ध करण्यात अनेक प्रकल्प उभे करण्यात आणि मुंबई त्या न्यूयॉर्क पद्धतीने उभारण्यात सुंदर देखणी मॉडर्न सुखसोयीनी युक्त करण्यात अर्थात सिंहाचा वाटा फडणवीस यांचा आहे पण एकनाथ शिंदे पद्धतीचे उत्साही हरहुन्नरी मंत्रिमंडळातले सहकारी आणि शासनातले प्रशासनातले सदस्य यांच्या सहकार्याशिवाय हे कदापिही शक्य झाले नसते असे फडणवीसांचे सतत सांगणे असते किंबहुना मला एकट्याला त्याचे क्रेडिट नको असा त्यांचा आग्रह असतो, खरोखरी माझी मुंबई मला आता जगातल्या इतर सुंदर शहरांसारखी जेव्हा नजरेसमोर साक्षात येते माझे हृदय एखाद्या प्रेयसीसारखे भरून येते असे वाटते या मुंबईला प्रियकरासारखे बाहुपाशात घ्यावे. अर्थात सौंदर्याची दृष्टी आघाडी सरकारातल्या जगभर फिरून आलेल्या मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी देखील होती पण ठाकरे कुटुंबाला अति लोभाने आणि जवळ जमलेल्या भ्रष्ट बदमाश बदनाम मंडळींनी खाऊन टाकले म्हणजे त्यांनी माहीम चौकात वाघाचा पुतळा उभा केला पण तो मांजरीसारखा दिसतो अगदीच दर्जाहीन वाटतो म्हणजे मुंबईचे सौंदर्यीकरण त्यांनी करण्याचा प्रयत्न नक्की केला पण त्यांना कधीही फडणवीसांची उंची गाठता आली नाही, चुकीचे काम केले. अनेक राजकीय गुपिते सतत तुमच्यासाठी….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी