आदा पादा कसे आहेत कुठे असतील चंद्रकांतदादा :
माझ्या आजवरच्या 44-45 वर्षे प्रदीर्घ राजकीय पत्रकारितेच्या वाटचालीत क्वचित पाहायला मिळाले कि ज्यांना जे खाते नेमक्या योग्यतेचे आहे तेच त्यांना मिळाले आहे,अर्थात बहुतेक मंत्री राज्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मिशन म्हणून कमी पण कमिशन साठी राजकारणात आलेले असतात आणि बहुतेक तेच करतात केवळ कमिशन साठी मिळालेल्या सत्तेचा सतत शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि जवळपास सारेच नेते मानतेची आमदार खासदार दुरुपयोग करून घेतात, जे लुटून आणल्या जाते त्यातले थोडेसेच वाटतात काकणभर खर्च करतात, अधिकाधिक घरी घेऊन जातात आणि पुढल्या काहीच वर्षात पुढल्या कित्येक पिढ्यांची सोय आणि स्वतःचे मोठे राजकीय वाटोळे करून घेतात अर्थात राज्य लुटून घरी नेलेला पैसा फारतर त्यांच्या पुढल्या पिढ्या दोन पिढ्या खातात नंतर खायला कोणीही उरत नाही कारण हरामाचा पैसा नियती त्यांना काही केल्या पचू देत नाही. राजकारणात समाजकारणात दलालीत शासकीय सेवेत किंवा मीडियात असणाऱ्यांनी केवळ संत तुकाराम म्हणून जगावे असे माझे म्हणणे नाही पण सतत तेच करणारे केवळ कमिशन साठी कायम तडफडणारे शंभर टक्के आधी राष्ट्राची राज्याची वाट लावतात नंतर कुटुंबाची अगदी त्यांच्याच डोळ्यादेखत वाट लागते हि वस्तुस्थिती आहे…
www.vikrantjoshi.com
राज्याचे उच्च तथा तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटलांना मी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तम तरुण विद्यार्थी प्रिय नेते होते तेव्हापासून बघतो ओळखतो, हा दादा सतत कायम घरी कमी कार्यकर्त्यांमध्ये नेहमी सदैव रमलेला मी बघितला. यावेळी नेमके तेच घडले जे चंद्रकांतदादांना मनापासून आवडते ते त्यांना मिळाले एक मंत्री म्हणून यावेळी चंद्रकान्तदादा आवडत्या शिक्षण खात्याचे मंत्री झाले हे तर असे झाले मामाची जी मुलगी आवडत होती तिच्याशीच लग्न झाले. आधी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खाते यावेळी थेट शिक्षण खाते, आता तो पत्रकार हयात नाही पण त्याची पहिली पत्नी एकदम चवळीची शेंग, दिसायला थेट कियारा अडवाणी अर्थात या बावळट माणसाला तिने लवकरच घटस्फोट दिला कारण हे महाशय चांगल्या झाडावर बसलेले माकड आहे असे बघणारे सारेच म्हणायचे त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले ते रंगाने व्हिव्हियन रिचर्ड्स आणि शरीराने विशाखा सुभेदार पद्धतीच्या तरुणीशी, चंद्रकांतदादांच्या बाबतीत हुबेहूब असेच घडले आधी अत्यंत महत्वाची खाती आणि यावेळी त्यामानाने फार कमी महत्वाचे शिक्षण खाते पण ना जाहीर ना खाजगीत, दादांनी कुरबुर केली ना फडणवीसांच्या नावाने कडाकडा बोटे मोडली ना भाजपा श्रेष्ठींना त्यांनी वाकुल्या दाखविल्या असे कधीही कुठेही ऐकिवात नाही कारण त्यांना त्यांचे अत्यंत आवडते खाते मिळाले आणि तसेही कमिशन साठी क्वचित पण सतत मिशन म्हणूनच पक्ष आणि सत्ता सांभाळणारा हा प्रदीर्घ वाटचाल करणारा साऱ्यांना सहज सतत उपलब्ध असलेला आणि ओळख असेलही नसेलही भेटणार्या प्रत्येकाशी अगदीच अघळपघळ बोलून क्षणार्धात भेटणाऱ्यांना आपलेसे करणारा हा नेता, बरे झाले अद्याप चंद्रकांतदादांना एखादी सेक्सी नटी भेटली नाही अन्यथा तिने देखील त्यांना पुढल्या क्षणी लव्ह यु म्हटले असते एवढे हे दादा समोरचा कितीही चिडलेला असेल संतापलेला असेल क्षणार्धात ते त्याला आपल्या कडेवर बसवून पटापट त्याचे मुके घ्यायला लागतात असे मी नाही अंजलीवहिनी ज्याला त्याला सांगतात. जे भाजपा किंवा सरकारात अनेकदा याच दादांनी घडवून आणले म्हणजे यशस्वी मध्यस्थी घडवून पेटलेले वातावरण खुबीने शांत केले तेच नेमके आणि नक्की मराठा आंदोलनाबाबत त्यांनी घडवून आणले असते, मला वाटते शिंदे फडणवीस अजितदादांनीत्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हि मोठी चूक केली…
आता याच दादांच्या बाबतीत एक मोठा गौप्य्स्फोट. तुम्हाला नक्की आठवतच असेल कि मागल्या विधानसभेला अचानक कोणाच्याही ध्यानीमनी नसताना याच दादांनी थेट ब्राम्हण वर्चस्व असलेल्या पुण्याच्या कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढविण्याचे ठरविले. केवळ बायको ब्राम्हण म्हणून हा मराठा कोथरूड मधून निवडून येईल असे नव्हते तर कोल्हापुरातून बाहेर पडून तेही आव्हानात्मक कोथरूड मधून आमदारकी लढविणे ती जिंकणे अजिबात ते सोपे नव्हते पण कायम आव्हान स्वीकारणारे दादा, येथेही या वयातही त्यांनी राजकीय दादागिरी कशी असते हे दाखवून दिले ते उभे राहिले निवडूनही आले, तिकडे विद्यमान ब्राह्मण आमदार मेधा कुलकर्णी धाय मोकलून रडत होत्या, भाजपा श्रेष्ठींकडे न्याय मागत होत्या, नाराज होत्या, त्यांची उमेदवारी डावलले गेल्याने त्या आणि त्यांचे मतदार भाजपा आणि दादांवर नाराज होते, प्रचंड चिडलेले होते, पुणेकरच ते अगदी दादांच्या तोंडावर खडूस प्रतिक्रिया देत होते, हे तर थेट काही शिक्षण सम्राटांसारखे घडले होते म्हणजे घरच्या बायकोला धक्के आणि धक्का देत थेट घरातच दुसऱ्या बायकोला आणले होते पण काहीच दिवसात याच दादांनी अत्यंत साधी भूमिका घेत कोथरुडकर मतदारांना आपलेसे केले, हि दुसरी चॉईस पुणेकरांना लवकरच आवडायला लागली तिकडे याच मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन मोठ्या मनाने फडणवीस आणि चंद्रकांतदादा दोघांनीही श्रेष्ठींकडे प्रेस्टिज इश्यू करून मेधाताईंना अलीकडे राज्यसभेत पाठविले, आता त्या पूर्वीच्याच उत्साहात कधी नाचताहेत कधी बागडताहेत तर कधी सभोवताली आनंदाने गोल गोल गिरक्या घेताहेत. याच दादांचे दुसऱ्या दादाने काहीच महिन्यात पुण्याचे पालकमंत्रिपद हिसकावून घेतले, दादांना डावलण्याची हि नेहमीचीच पद्धत तरीही ते रागावले नाहीत. आता अत्यंत महत्वाचे म्हणजे हेच चंद्रकांत पाटील यावेळी पुन्हा कोथरुडमधून विधान सभा लढवणार आहेत आणि ते मागल्यापेक्षा प्रचंड मतांनी निवडून येतील विशेष म्हणजे त्यांच्यावर एकेकाळी नाराज असलेले अजित पवार आणि मेधाताई कुलकर्णी त्यांचे प्रचारप्रमुख असतील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जणू हि स्वतःची निवडणूक समजून याच चंद्रकांत पाटलांची प्रचार धुरा सांभाळून त्यांना डोक्यावर घेऊन भांगडा करतील त्याचवेळी पुण्यातले कर्मठ ब्राम्हण चंद्रकांतदादांचा गणपतीबाप्पा मोरया न करता त्यांना कायमस्वरूपी मतदाररूपी मंदिरात बसवून त्यांच्या कौतुकाचे पोवाडे गातील ढोलताशे वाजवतील. हा विषय येथेच संपत नाही….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी