जरांगे जरा जपून मनोजकुमार होईल :
जरांगे तुमचे सामाजिक महत्व राजकीय अस्तित्व आणखी किती दिवस टिकवून ठेवायचे किंवा क्षणार्धात केव्हा संपवायचे हे होणाऱ्या विधान सभा निवडणूक निकालांवर ठरेल म्हणजे शरद पवारांची महाआघाडी निवडून आली सत्तेत आली कि शपथविधी उरकताच जत्रा आटोपल्यासारखे त्यानंतर पुढल्या काही दिवसात आरक्षणाची मागणी बासनात बांधल्या जाईल आणि यादिवसात तुम्हाला तुमच्या सभोवताली जी कार्यकर्त्यांची नेत्यांची टग्यांची आंदोलनकर्त्यांची सूज आलेली आहे ती लगेच उतरेल ओसरेल त्यानंतर फारतर तुमच्या जिवाभावाचे बोटावर मोजता येतील एवढे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी असतील इतर सारेच एखाद्या निष्णात जादूगारासारखे गायब होतील पण महायुती जर सत्तेत आली त्यानंतर फक्त आणि फक्त जर देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथ घेणार असतील तर जोपर्यंत फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंत तुमचे आज जे महत्व अस्तित्व नेतृत्व जोरात आहे ते तसेच टिकविण्यात येईल पण फडणवीसांव्यतिरिक्त जर शिंदे पद्धतीचे मराठा नेते महायुतीतर्फे सत्तेत बसले तरीही तुमचे नेतृत्व एखाद्या क्षय रोग्यासारखे किंवा तुमच्या अशक्त प्रकृतीसारखे क्षीण ताकदहीन केल्या जाईल थोडक्यात तुमचाही सिनेमातला मनोजकुमार होईल, तो कसा एका जमान्यात सर्वाधिक लोकप्रिय नट दिद्गर्शक निर्माता होता आणि आज तो कसा आहे कुठे असतो काय करतो जे अगदी त्याच्या शेजाऱ्यांना देखील माहित नाही तेच तुमचे होईल, शंभर टक्के हेच आतून ताकद देणारे लबाड नेते तुम्हाला कंडोम पद्धतीने फेकून देण्यात आघाडीवर असतील त्यावेळी सच्चे अश्रू केवळ ब्राम्हणांच्या डोळ्यात असतील….
www.vikrantjoshi.com
मनोजभाऊ तुम्हाला या दिवसात अनन्यसाधारण महत्व आलेले आहे त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर बोलतांना भान ठेवा, जे तुम्हाला अमुक एखाद्या मुद्द्यावर बोलण्यास भाग पाडतात, ते कोण आहेत कसे आहेत किती बेरकी आहेत त्याचा आधी अभ्यास करा नंतर मीडिया समोर बडबड करा, वाट्टेल ते बोलून स्वतःचे अस्तित्व संपवू नका स्वतःचा बेताल अभिजित बिचुकले किंवा राखी सावंत करून घेऊ नका. सध्यातरी तुमचा अनेकदा राखी किंवा अभिजित होतो आहे. अगदी अलीकडे तुमचा एक व्हिडीओ बघितला ज्यात तुम्ही फडणवीसांनी राज्यात कोणकोणत्या मराठा नेत्यांना संपविले त्याची यादी वाचून दाखविलेली आहे जी अत्यंत पोरकट किंवा तद्दन खोटी चुकीची आहे हे तुम्हाला कोणीही म्हणजे राजकारणातला अगदी शेम्बडा कार्यकर्ता देखील सांगेल. विनोद तावडे यांना फडणवीसांनी अजिबात संपविले नाही ते शिक्षण मंत्री असतांना त्यांच्या हातून ज्या गंभीर चुका ‘विविध ‘ बाबतीत घडल्या त्यातून त्यांना पुढे आमदारकीला उमेदवारी त्यांच्या पक्ष श्रेष्ठींनी दिली नाही, पर्यायाने कायमस्वरूपी मंत्रिमंडळातून बाहेर राहावे लागले, या उत्तुंग भाजपा नेत्याचे त्यादिवसात जादूगार पी सरकार झाले एकदम गायब, जर हे देवेंद्र फडणवीसांनी मुद्दाम घडवून आणले असते तर तावडेंचा देखील त्याचवेळी फडणवीसांच्या बाबतीत जरांगे किंवा खडसे झाला असता. त्यांनीही आदळआपट करीत भाजपा डोक्यवर घेतला असता, विनोद तावडे यांना त्यांच्या केलेल्या उघड चुका लक्षात आल्या असाव्यात त्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच चुका न करण्याचे नक्की ठरविले असावे कारण तेच तावडे ज्या वेगाने खाली आले होते, आज दुप्पट वेगाने ते देशपातळीवर पुन्हा भाजपाचे जवळपास पहिल्या रांगेतले नेते म्हणून पुढे आले आहेत अर्थात आजही याच तावडेंना फडणवीसांबाबत भाजपचे ‘ शरद पवार ‘ म्हटले जाते एवढे ते विनाकारण फडणवीसांना सतत पाण्यात बघतात. एखादया बेवड्याला जसे पत्नी आई वडील कुटुंब सदस्य दारू पिऊन तुझ्यासहित साऱ्यांचे आयुष्य संपवू नको हे सतत समजावून सांगणारे साक्षात शत्रू वाटतात तेचमाझ्याबाबत तावडेंचे किंवा त्यापध्दतीच्या नेत्यांचे होते, माझे अगदी सुरुवातीपासून विनोद यांच्यावर मनापासून प्रेम, मंत्री असतांना त्यांनी केलेल्या गंभीर चुकांचीसुरुवात, असे करू नका असे वागू नका मी त्यांना जीव तोडून सांगत असे ज्याचा त्यांनी त्यावेळी वेगळाच अर्थ काढला आणि माझ्याशी संबंध तोडले ज्याचे मला आजही मनापासून वाईट वाटते, पुढे मी सांगितले तेच घडले, तावडेंचे केलेल्या चुकांतून मोठे राजकीय नुकसान झाले पण आज जेव्हा पुन्हा त्यांनी गतवैभव प्राप्त केले बघून माझे मन उर भरून येते…
अपूर्ण : उद्याच्या भागात : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी