सुनील तटकरेंचा करिष्मा जयंत पाटलांचा खात्मा :
एकेकाळी उभ्या राज्यात शेतकरी कामगार पक्षाचे नाही म्हणायला बऱ्यापैकी अस्तित्व महत्व होते पण रायगड जिल्ह्यात आणि त्याच्या आसपासच्या कोकणात शेकापचे मोठे महत्व होतेत्यापेक्षा पाटील कुटुंबीयांनी याच शेकापच्या भरवंशावर रायगड पंचक्रोशीत स्वतःचे अवास्तव महत्व वाढवून ठेवले होते, आधीच्या पिढीत देशभक्ती होती मात्र जयंतरावांच्या पिढीने तत्वांची वाट लावली जी सुरुवातीला अंतुले नंतर गेल्या अनेक वर्षांपासून सुनील तटकरे या शेकापला संपविणाऱ्या किंवा पुरून उरणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडली. शेतकरी आणि कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढणारी शेकाप तत्व आणि सत्वांवर सतत लढली झगडली असती तर आजच्यासारखी शेकापची दारुण करुण भयाण भयावह कृश अवस्था कधीही झाली नसती दुरदैवाने जेथे शेकापचे अस्तित्व आणि महत्व होते त्या रायगड जिल्ह्यात आणि कोकणात एकही गणपतराव देशमुख तयार झाला नाही जन्माला आला नाही विशेषतः पाटील कुटुंबीयांनी शेकापचा दुरुपयोग खाजगी संस्थेसारखा करवून घेतला, जयंतराव, दिवंगत मीनाक्षीताई आणि पंडितराव त्यांच्या साथीला चार दोन विवेक पाटील पद्धतीचे शेकाप नेते शेतकरी आणि कामकऱ्यांच्या भरवशावर स्वतःचेच उद्योग व्यवसाय आणि श्रीमंती वाढविण्यात गुंतले किंबहुना विवेक पाटील पद्धतीनेच नेते सतत आपल्याच कामगार व शेतकरी कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या फसविण्यात लुबाडण्यात धन्य समजायला लागले आणि तेथेच शेकाप लयाला गेली, लढणारे सर्वसामान्य शेतकरी कामकरी श्रीमंत होणारे शेकाप नेते आणि पाटील घराणेशाही पासून कधी भीतीने तर कधी नेमकी वस्तुस्थिती लक्षात आल्याने दूर पळाले, बलाढ्य शेकापला सुरुवातीला नाही म्हणायला रायगड जिल्ह्यात आणि आसपासच्या पंचक्रोशीत जोमात जोरात होती पण नेत्यांना त्यांच्या चुका नडल्या अनुक्रमे ए आर अंतुले, सुनील तटकरे आणि शिवसेना त्यांना पुरून उरली, अलीकडे जयंत पाटील जेव्हा विधान परिषदेला पराभूत झाले तेव्हाच राज्यातली रायगडातली शेकाप जवळपास संपली याची जाणीव झाली…
www.vikrantjoshi.com
अगदी आत्ता आता पर्यंत पाटील कुटुंबीयांचा आणि शेकापचा रायगड जिल्ह्यात तसेच आसपासच्या पंचक्रोशीत दरारा दबदबा धाक दबाव होता पण शेतकऱ्यांच्या कामगारांच्या या चळवळीकडे त्यांच्याच नेत्यांनी विशेषतः पाटील कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले वरून स्वतःचेच उद्योगधंदे कंत्राटदारी विविध व्यवसाय ते मोठे करत गेले वाढवत गेले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे न राहता या नेत्यांनी रायगड जिल्ह्यात उद्योग सुरु करणाऱयांना, मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेणाऱ्या नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना पाठीशी घातले थोडक्यात शेतकरी आणि कामगारांचे महत्व न वाढविता जमिनींचे व्यवहार करणारे दलाल आणि गुंतवणूकदार विविध कंत्राटदार, व्यापारी, उद्योगपती यांच्यासाठी पायघड्या घातल्या वरून शेकाप नेते श्रीमंत आणि कार्यकर्ते दुर्लक्षित हे उघड व्हायला लागले, तेथेच शेकापचे कार्यकर्ते अस्वस्थ होत कधी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी कधी काँग्रेस तर कधी शिवसेनेला बिलगून, जवळ घेत शेकापला फारकत देऊन मोकळे झाले, राज्यातली शेकाप रसातळाला गेली हे रायगड बाहेर उदय सामंत पद्धतीच्या नेत्यांनी इतरांना लक्षात आणून दिल्याने शेकापशिवाय राजकारण असे नवीन समीकरण जन्माला आले त्यातून शेकाप नेत्यांचे विशेषतः पाटील घराणेशाहीला कोणीही येऊन टपल्या मारायला लागले, शेकाप नेत्यांचा उतारवयातील गब्बरसिंग झाला, एखादा माकडछाप नेता देखील त्यांना वाकुल्या दाखवू लागला….
दुर्दैवाने आज शेकापचा एकही आमदार नाही खासदार नाही, नाही म्हणायला मोपलवार गॅंगचे श्यामसुंदर शिंदे एकेकाळी रायगड जिल्हाधिकारी असतांना त्यांचे बऱ्यापैकी पाटील कुटुंबियांशी सूत जुळलेले, त्याचा फायदा घेत याच श्यामसुंदर पाटलांनी शेकापच्या चिन्हावर मराठवाड्यातून लोहा कंधार विधानसभा लढविली जिंकली पण निकालानंतर लगेचच श्यामसुंदर शिंदे यांचा लीना चंदावरकर झाला म्हणजे मधुचंद्राच्या रात्रीच जसा लीनाचा नवरा बांदोडकर देवाघरी गेला, तसे श्यामसुंदर शिंदे देखील आपल्या नावाला जागले, या फुलावरून त्या फुलावर त्यांनी उडी टुणकन घेतली, श्यामसुंदर भाजपाला पाठिंबा देऊन मोकळे झाले, शेकापच्या बाबतीत कधी अंतुले व काँग्रेसने तर कधी शिवसेनेने विशेषतः चतुर चलाख चालबाज सुनील तटकरे यांनी अनेकदा शेवग्याच्या शेंगेसारखा शेकापचा उपयोग करून घेतला, शेवग्याच्या शेंगेचा आतला पौष्टिक आणि चविष्ट गर आपण तेवढा खाऊन अख्खी शेंग जशी बाजूला फेकतो तेच मोठ्या खुबीने इतरांनी शेकापचे केले ज्यातून जयंत पाटील आणि शेकापचा नेमका वंचित आणि प्रकाश आंबेडकर झाला. आंबेडकर आणि जयंत पाटील यांच्यात कमालीचे साम्य असे कि आजही रायगड जिल्ह्यात जसे शेकापच्या पाठीशी जवळपास अडीच लाख मतदार आहेत नेमके तेवढेच मतदार अकोला जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहेत पण पाटील आणि आंबेडकर केव्हा कोणाला जवळ ओढतील आणि केव्हा दूर करतील हा भरवसा या दोघांनीही गमावल्याने नजीकच्या काळात वंचित आणि शेकाप दोन्ही झपाट्याने आणखी आणखी रसातळाला जातील असे नेमके वातावरण आहे, त्याच पद्धतीने बच्चू कडू यांचा देखील थेट जांबुवंतराव धोटे होऊ शकतो असे त्यांचेही काहीसे राजकीय चंचल वागणे नक्कीच चुकीचे आहे, असते एखाद्या भरकटलेल्या विद्यार्थ्यांसारखे बच्चू कडू या पराक्रमी नेत्याचे आणि त्यांच्या पक्षाचे होता कामा नये म्हणजे पाहिलीत पहिला नंबर आणि दहावीला साऱ्याच विषयात नापास, राजकारणात विश्वासाहर्ता गमावली कि ताकदवान नेत्याला देखील पंतप्रधानपद हुलकावणी देते…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी