नेमका फरक : महाप्रतापी पवार आणि
कासावीस फडणवीस :
शरद पवार जे आपापसात झुंझवतात त्यातून राजकीय फायदे उकळतात, देवेंद्र फडणवीस नेमके वेगळे, जे एकमेकांच्या जीवावर उठलेले त्या भाऊबंदकीला एकत्र आणतात त्यातून बेरजेचे राजकारण खेळतात, ताजे उदाहरण तुमच्यासमोर आहे, ठिणगी गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा जिवंत असतानाच पडली होती, दोघे सख्खे भाऊ एकमेकांपासून वेगळे झाले नंतर दोघांनीही एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात केली, पंडित मुंडे यांच्या पाठीशी गोपीनाथ यांची डिट्टो कॉपी धनंजय पण होते, जे त्यानंतर कधीही घडणार नव्हते घडले नसते ते यशस्वी करून दाखविले देवेंद्र फडणवीस यांनी जे शरद पवार यांनी कधीही घडवून आणले नसते, किंबहुना धनंजय तसेच पंडित मुंडे विरुद्ध पवारांचा कट्टर यशस्वी शत्रू गोपीनाथ हा वाद हि दुष्मनी पेटविण्यात भडकविण्यात अर्थातच फक्त आणि फक्त शरद पवार आघाडीवर होते, नंतरच्या पिढीत पंकजा मुंडे आणि गोपीनाथ कुटुंबीय विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय सूडाचा जीवघेणा प्रवास सुरु झाला, त्याचदरम्यान फडणवीसांची राज्याचा नेता अशी ओळख निर्माण झाली जेथे पवारांचे माथे भडकले कारण जेथे पवार चुकले चुकीचे वागले ते आपण करायचे नाही, कायम बेरजेचे राजकारण करतांना देखील यश मिळते, नेमके हेच फडणवीसांना सिद्ध करायचे आहे, करायचे होते त्यातूनच स्वतः फडणवीसांनी पुढाकार घेतला आणि जे कधीही कोणालाही शक्य नव्हते ते फडणवीसांनी करून दाखविले, पंकजा आणि भगिनी तसेच धनंजय यांच्यातले वाद, गैरसमज, भांडणे, गैरसमज पूर्णतः मिटविण्यात फडणवीस यशस्वी ठरले, मी वेगळा आणि चांगला कसा हे त्यांनी पंकजा यांना कृतीतून पटवून दिले, पंकजा आणि भगिनी तसेच धनंजय यांच्या पाठीशी फडणवीस एखाद्या मोठ्या भावासारखे कसे कणखरपणे उभे असतात असे शेकडो प्रसंग आता मला सांगता येतील. नेमके जे करायला नको ती घाण उगाच शरद पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात करून ठेवली, प्रत्येक राजकीय कुटुंबात त्यांनी आपापसात कटुता शत्रुत्व निर्माण करीत, तात्पुरती राजकीय पोळी भाजून घेतली…
www.vikrantjoshi.com
पवारांनी तोडण्याचे आणि फडणवीसांनी जोडण्याचे कितीतरी किस्से तुम्हाला येथे सांगता येतील. सातारचे राज घराणे भोसले, दिवंगत शाहूमहाराज आणि सुमित्राराजे यांना पाच अपत्ये, उदयनराजे यांचे पिता प्रतापसिंह, लंडन स्थित विजयसिंह, शिवेंद्र राजे यांचे पिता अभयसिंह, आक्कासाहेब आणि शिवाजी महाराज, पैकी विजयसिंह आणि आक्कासाहेब तेवढे जिवंत आहेत. उदयन राजे यांच्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाकांक्षी मातोश्री कल्पनाराजे आणि अभयसिंह महाराज या दोघात विस्तव देखील जात नव्हता, विशेषतः उदयन राजे राजकारणात उतरल्यानंतर केव्हा तलवारी चालतील आणि उदयनराजे विरुद्ध अभयसिंहमहाराज किंवा त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे एकमेकांचे जीव घेतील, आत्ता आत्ता पर्यंत सांगणे अशक्य होते किंवा शिवेंद्रराजे आणि उदयनमहाराज यांचे कार्यकर्ते आपापसात मारामाऱ्या हा साताऱ्यातील नेहमीचाच जीवघेणा प्रकार, या दोन्ही प्रभावी नेत्यांमधली दुश्मनी ज्याची धास्ती थेट पोलिसांनी देखील घेतलेली, दोघांचीही तीव्र राजकीय स्पर्धा, कधी अभयसिंह किंवा शिवेंद्रराजे वरचढ तर कधी उदयन राजे यशस्वी, दररोज एकमेकांवर दातओठ खाणे हा या दोन्ही कुटुंबाचा गेली कित्येक वर्षे विशेषतः शरद पवारांचे नेतृत्व उदयाला आल्यानंतर कायम घडत आलेले, उदयन महाराज आणि कल्पनाराजे विरुद्ध अभयसिंहमहाराज ते मंत्री असतांना, जेव्हा मी ते आणि त्यांचे अत्यंत विश्वासू खाजगी सचिव रमाकांत कुळकर्णी एकत्र बसून गप्पा मारत असू तेव्हा, आपापसातले जीवघेणे किस्से हकीकती प्रसंग ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभा राहायचा, मी आणि कुलकर्णी दोघेही बापुडे ब्राम्हण, राज घराण्यातली दुष्मनी अनुभवताना आमच्या दोघांचीही अक्षरश: गांड फाटायची. अर्थात राजकारणात अभयसिंह महाराजांना मोठे करण्यात म्हणजे कल्पना राजे व उदयनमहाराज यांचे राजकीय महत्व आणि दरारा कमी करण्यासाठी शरद पवार यांचे मोठे सहकार्य अर्थात अभयसिंहराजे यांनाच होते कारण बेफाम, निर्भय, टग्या वृत्तीचे, स्पष्टवक्ते, दहशत आणि दरारा असलेले उदयनमहाराज यांना शरद पवार, अजित पवार यांनी कधीच जवळ केले नाही नव्हते…
अतिशय प्रखर कल्पनाराजे आणि उदयनमहाराज या दोघांना राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी काहीश्या मवाळ शांत सुस्वभावी अभयसिंह महाराजांना पवार यांनी मोठी राजकीय ताकद दिली अर्थात जनता पक्षातून काँग्रेस मध्ये आलेल्या अभयसिंहराजे यांना सर्वप्रथम अंतुलेंनी आपल्या मंत्री मंडळात गृहराज्य मंत्री केले पुढे दुरदैवाने अभयसिंराजे पवारांच्या जवळ गेले आणि घराणेशाही शत्रुत्वात परावर्तित झाली मात्र पवारांच्या दुर्दैवाने फडणवीसांचा राजकीय उदय झाला आणि त्यांचे बेरजेचे राजकारण पवार यांना खजील करून गेले, ज्या सुरेख स्त्रीवरून अजितदादा आणि उदयन महाराज या दोघांची आपापसात खुन्नस होती, पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त फडणवीस यांच्यामुळे दादा आणि राजे दोघेही एकमेकांच्या हातात हात घेत महायुतीचा आणि उमेदवार सुनेत्रा पवार तसेच उदयनमहाराज यांचा प्रचार करतांना जेव्हा सातारकरांनी अनुभवले, साऱ्यांना ते मनापासून आवडले आणि हे शत्रुत्व मिटविले फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या दोन घरात विस्तव जात नव्हता, एकमेकांची मुंडकी छाटण्याची भाषा केली जायची, त्या दोघांनाही म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना जवळ आणण्यात पुन्हा त्या दोन्ही घरांचे मनोमिलन घडवून आणले समाजाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी, थोडक्यात जे फडणवीसांना जवळ करतात ती घराणी पुन्हा एकमेकांना बिलगतात आणि जेथे शरद पवार, तेथे हमखास ते एकत्र कुटुंबाला वेगळे करून मोकळे होतात जे या दिवसात कोल्हापूरच्या राज घराण्यात घडते आहे कारण तेथे देखील दुर्दैवाने शरद पवारांच्या नेतृत्वाला जवळ घेतले आहे, खासदार शाहूमहाराज अगदी उघड थेट मीडियासमोर येऊन पोटच्या मुलास म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना उघडे नागडे करून मोकळे होतात, पिता पुत्राने एकत्र यावे असे कधीही पवार यांना वाटणार नाही थोडक्यात जोपर्यंत शाहूमहाराज आणि छत्रपती संभाजी पुन्हा एकवार भाजपा आणि फडणवीस यांना हिरवी झेंडी दाखवणार नाहीत तोपर्यंत जर वेळ निघून गेली आणि वैमनस्यातून कोल्हापूरची गादी रस्त्यावर आली तर साऱ्यांना मनापासून वाईट वाटेल, खासदार महोदय, वेळीच सकारात्मक निर्णय घ्या आणि निश्चिन्त व्हा, कायमचे !!
तूर्त एवढेच : हेमंत सुशीला श्रीराम जोशी