दाग अच्छे है आणि जयंत पाटील हरारे :
प्रामाणिक सरकारी नोकरांचे जसे असते म्हणजे म्हणजे दिवाळीला बोनस मिळाला कि वर्षभराची बेगमी करून ठेवायची नेमके ते तसेच बहुतांश साऱ्याच आमदारांचे असते म्हणजे एकदा का विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या रे लागल्या कि वर्षभराची बेगमी करून ठेवायची कारण विधान परिषद निवडणूक म्हणजे थेट फार मोठा घोडे बाजार त्यामुळे दरवेळी जे मोठा खर्च करतात ते मताधिक्य नसतानाही विरोधकांची मते आपल्या पारड्यात पाडून घेत हमखास निवडून येतात यावेळी देखील नेहमीचेच घडले म्हणजे काँग्रेसचे 7-8 आमदार फुटले आणि महायुतीचे सारेच उमेदवार जेव्हा निवडून आले तेव्हा तिकडे दिल्लीत ते अमितभाई उठले आणि नड्डा यांच्याशी गरागरा झिम्मा फुगडी खेळायला लागले कारण राज्यात केवळ महायुती परिषदेला निवडून आलेली नाही तर तोंडावर असलेल्या विधान सभा निवडणूक निकालांचे मोठे कोडे त्यातून सुटले आहे तर इकडे राज्यात कमळासारख्याच नाजूक चेहऱ्याच्या देवेंद्र फडणवीसांवर नेहमीचे रोमांचक हसू फुटले आहे याचवेळी थोडे जरी फडणवीसांचे चांगले झाले कि ज्यांच्या पोटात दुखायला लागते त्यांना तर या निकालाने पार हगवण लागलेली असेल, महायुतीमध्ये विशेषतः भाजपा संघ वर्तुळात कायम अजित पवारांच्या नावाने बोटे मोडणे सुरु असते, अजितदादांना महायुतीच्या सत्तेत सामील करून घेणे म्हणजे दीपक केसरकरांनी जणू घरी सवत आणली असे त्यांच्या पत्नीला वाटण्यासारखे, पण संघ भाजपा मित्रांनो, हे जरी डाग असले तरी ते चांगले आहेत असेच तुम्हाला म्हणावे सांगावे लागेल, शरीरावर फुटलेल्या कोडासारखे जरी हे डाग लाजिरवाणे असले तरी तेच तुम्हाला खपवून घ्यायचे आहेत कारण अजित पवारांना तुमच्याशिवाय काहीही कोणताही पर्याय उरलेला नाही आणि तुम्हाला देखील दुसरा उपाय नाही, जो आहे जसा आहे हुबेहूब तसाच्या तसा खडूस हिशेबी अतिव्यवहारी अजितदादा तुम्हाला खपवून घ्यायचाच आहे…
www.vikrantjoshi.com
खूप महिन्यांनी तुरुंगातून सुटलेल्या हपापलेल्या तरुण पुरुषाच्या पलंगावर पहिल्याच राती एखाद्या तारुण्याने मुसमुसलेल्या नटीने झेप घ्यावी त्यानंतर त्या तरुणाचे जे व्हावे तसे आज माझे येथे झालेले आहे म्हणजे परिषद निवडणूक निमित्ते नेमके काय काय लिहावे हेच येथे सुचेनासे झाले आहे. ह्यो एकनाथ शिंदे म्हणजे त्या माझ्या दिवंगत जिवलग मित्र आनंद दिघे यांची डिट्टो कॉपी हुबेहूब नक्कल, ते देवघरी कायमचे लपले आणि हे महाशय त्यांची जागा घेत येथे लुटत आणि वाटत बसले आहेत अगदी त्याच धर्मवीरासारखे, खिसा अगदी उपडा होईपर्यंत मागणाऱ्या प्रत्येकाला वाटत बसायचे हीच दिलदारी एकनाथ यांचीही वरून त्यांच्या सोबतीला कायम हात खिशात ठेवून दानशूर म्हणून गाजणारे देवेंद्र फडणवीस त्यामुळे पार पडलेल्या निवडणुकीतील घोडेबाजार या दोघांनाही कठीण नव्हता जरी सोबतीला कधीही खिशात हात न घालणारे अगदी बासुंदीत पडलेली माशी पिळून बाजूला काढणारे अजित पवार जोडीला होते तरी, ज्या उमेदवाराला निवडणूक काळात मोठा निधी पुरविल्या जातो त्यातली रक्कम स्वतःच्या घरात नेणारे जसे असंख्य उमेदवार असतात, का कोण जाणे मला अशावेळी उगाच त्या अजित पवारांची आठवण येते, यावेळी महायुतीचे जे उमेदवार निवडून आले त्यातले बहुतेक सारेच त्या परिणय फुके मिलिंद नार्वेकर शिवाजी गर्जे सदाभाऊ खोत यांच्यासारखे हुबेहूब महाकंजूष असे कि त्यांना समजा रस्त्यावर पाच रुपयाचे नाणे जर सापडले तर आजूबाजूचे पुढे निघून जाईपर्यंत हे त्या नाण्यावर पाय ठेवून उभे राहतील असे सेम टू सेम अजितदादांच्या पठडीतले, तरीही ते निवडून आले, चहाचा कप देखील मतदारांच्या हातात न देता, कारण पाठीशी उत्तम राजकीय चाल खेळणारे आणि निवडणुकीचे नियोजन करणारे शिंदे आणि फडणवीस पण जो खर्च करण्याच्या बाबतीत कायम पुढे असतो आघाडीवर असतो कारण त्याला लोकांच्या जमा पुंजीतून थोडेसे खर्च करायचे असते त्यालाही खिशातून काहीच गमवायचे नसते ते भाई जयंत पाटील नेमके विधान परिषदेला पराभूत झाले आणि रायगड जिल्हा किंवा कोकणातल्या अख्य्या शेकापचा सरतेशेवटी हा शिलेदार गमवून पुरता राजेश खन्ना झाला याची जाणीव शेकाप जवळून बघणार्या प्रत्येकाला झाली…
मित्रांनो, काम तसे कठीण आहे कारण एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पासून कोसो दूर गेली आहे म्हणजे शिंदे सेनेतले काही संधीसाधू विधानसभेला नक्की लगेच बाहेर पडण्याचा मोठा मूर्खपणा करणार आहेत पण सारीच शिवसेना पुन्हा एकत्र आली किंवा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असे यापुढे काहीही झाले तरी हे घडणार नाही किंबहुना मोठी गळती नक्कीच या विधानसभा निवडणूक निमित्ते अजितदादा गटाला नक्की लागणार आहे पण सुप्रिया सुळे यांना काहीही करून मुख्यमंत्री करायचे हे शरद पवार यांनी त्यांच्या सर्वाधिक जवळच्या मित्राला अगदी कानात सांगितले तरीही ते उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेले असल्याने ते मनातून मनापासून अस्वस्थ आहेत, पण महायुती आणि उद्धव हेही एकत्र येणे अशक्य असल्याने उद्धव यादिवसात कावरेबावरे झालेले आहेत त्यावर चाणाक्ष फडणवीस कसा मार्ग शोधून काढतात, बघूया, मात्र मराठे व जरांगे, बौद्ध-मुस्लिम, उद्धवसेना-काँग्रेस यांचा खुबीने नक्की वापर करवून येणारी विधानसभा लढविणाऱ्या शरद पवार यांच्याशी जर यशस्वी दोन हात करायचे असतील तर बा अमित शाह, राज्यातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही लबाड कुठल्याही बदमाश नेत्यांच्या विनाकारण नादी निदान यावेळी न लागता, निवडणुकीचे सारे अधिकार आणि सूत्र फक्त आणि फक्त फडणवीसांकडे सोपवा, त्यांना मोकळा हात द्या त्यानंतर फडणवीस शिंदे या जोडगळीने विधानसभा जर जिंकून आणली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका पत्रकारितेचा नेमका गैरफायदा घेणारे सतत फक्त आणि फक्त दलाली करणारे वाटल्यास उदय म्हणा, अतुल म्हणा संजय म्हणा नालायक म्हणा किंवा काहीही म्हणा, मी मान खाली घालेन….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी