Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

मोपालवारांच्या ढुंगणावर झाड उगवले तर ते म्हणतील सावली झाली

हेमंत जोशी by हेमंत जोशी
July 12, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

मोपालवारांच्या ढुंगणावर झाड उगवले तर
ते म्हणतील सावली झाली :

मोपालवारांच्या वाईट कृत्यांना अंत नाही कारण असे शेकडो प्रभावी रोहित पवार एकाचवेळी मोपालवार यांच्या अंगावर जरी धावून गेले, शर्टावरची फार तर धूळ झटकल्यासारखे त्यांची त्यानंतर कृती असेल मग पुढल्याच क्षणी मोपलवार आपल्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात समुद्राकडे बघत मस्तपैकी सिगारेटचा कश ओढून गालातल्या गालात हसत सुटतील कारण मोपालवारांच्या सरकारी नोकरीतील संपूर्ण कारकिर्दीचा मी एक साक्षीदार त्यामुळे असे कित्येक रोहित पवार त्यांच्यावर चढ चाड चढले खरे पण त्यानंतर त्यातल्या प्रत्येकाचा केवळ अनिल गोटे झाला, मोपालवारांना विरोध करणारे एकतर तुरुंगात गेले किंवा मनीषा मोपालवारांसरखे उध्वस्त झाले केवळ हात चोळत बसले त्यातला एकही मोपलवार यांचा साधा बाल देखील बाका कारू शकलेला नाही, मला आता त्या रोहित पवार यांची काळजी लागली आहे कारण त्यांनी जहरी माणसाला अर्धवट मारून सोडले आहे, मोपलवार असे आहेत कि ते त्यांना छेडणारा त्यांना त्रास देणारा प्रसंगी शरद पवार जरी असले असते तरीही मोपालवारांनी त्यांनाही सोडले नसते, रोहित तो अभी बच्चा है बहोत कच्चा है !! जेव्हा रोहित पवार थेट मीडियासमोर येऊन राधेश्याम मोपलवार यांचे आर्थिक घोटाळ्याचे पुरावे त्यांनी मांडले, जे त्यानंतर नेमके घडले तेच मी तुम्हाला येथे सांगतो, आधी मोपालवारांनी रोहित पवारांची ती आरोपांची मालिका शांतपणे ऐकली, त्यानंतर त्यांनी सिगारेट शिलगावली फुंकली आणि पुढल्याच क्षणी ते स्वतःभोवती आनंदाने गिरक्या घेत हसायला बागडायला लागले कारण रोहित पवारांनी जे बाहेर काढले ते केवळ एक हिमनगाचे टोक होते, ज्यांच्या हाती अख्खे हिमनग होते आहे ते जेथे त्यांचा बालही बाका करू शकले नाहीत तेथे रोहित पवारांचे आरोप करणे म्हणजे, हत्तीणीवर पुरुष मुंगीने बलात्कार करण्यासारखे किंवा मी आज याला कुचलून ठार मारेन असे एखाद्या चिडलेल्या माकडाने जंगलातल्या वाघाविषयी विचार करण्यासारखे…

www.vikrantjoshi.com

राधेश्याम मोपलवार सरकारी नोकरीत आले ते थेट मुंबईत गोरेगावच्या चित्रनगरीत उप कार्यकारी संचालक म्हणून आपल्या दुसऱ्या पत्नीसह म्हणजे मनीषा मोपलवार यांना त्यांनी थेट मराठवाड्यातून येथे आणले आणि त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला तन्वी जन्माला आली, तेव्हापासून तर विभक्त झाल्यानंतरही मनीषा मोपलवार यांच्याकडे पतीचे त्यांच्या गैर व्यवहाराचे पुरावे त्याभरवंशावर हि कुटुंबातलीच एक महत्वाची व्यक्ती कधी न्यायालयात तर कधी रस्त्यावर उतरून नवऱ्याला जाहीर आव्हान देत होती ज्यामुळे होणाऱ्या प्रचंड बदनामीला आणि संकटांना जेथे राधेश्याम घाबरले नाहीत किंवा जे तिघे एकमेकांच्या ताटात जेवत होते, त्यातले एक मोपलवार दुसरे माजी आमदार अनिल गोटे आणि या तिघांच्या संगनमताने मोठा झालेला अब्दुल करीम तेलगी त्यातले दोघे जे मोपालवारांच्या मागे लागले तेच तुरुंगात गेले आणि मोपलवार जणू काहीच घडले नाही अशा रुबाबात पुनःपुन्हा मान थाट करून समाजात वावरायला लागले, वारंवार खोऱ्याने पैसे ओढायला लागले. प्रिय रोहित, ज्यांच्या हाती मोपालवारांना अडचणीत आणण्याचे अधिकार होते तेच मोपालवारांच्या पापात सहभागी असल्याने त्यांचा मी म्हणालो तेच, तुम्ही किंवा अनेकांनी ज्या मोपालवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तेच संपले तेच अडचणीत आले संकटात सापडले कारण जो मोपालवारांशी पंगा घेतो त्यानंतर एकतर मोपलवार त्याला पैशांनी विकत घेतात किंवा संपवून मोकळे होतात. आणि हो, या समाजात या राज्यात या शासनात प्रशासनात असे जागोजाग असंख्य अनेक कितीतरी मोपलवार आहेत ज्यांचा बाल देखील बाका होणे अशक्य आहे. रोहितजी तुम्हाला जे कळले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी माझ्याकडे माहिती आहे पण जे तुमचे झाले म्हणजे तुमचे आरोप जसे त्यांनी हसण्यावारी नेले तेच माझे होईल हे मला तंतोतंत माहित आहे, कैलास जाधव पद्धतीच्या ज्या अनेकांचा जवळच्या माहितगारांचा मित्रांचा रांडेसारखा खुबीने उपयोग या मोपलवार यांनी करून घेत घरापासून तर बाहेरच्या देशांपर्यंत अनेकांना संपविणारे मोपलवार त्यामुळे यांनाच सारे दचकून वचकून असतात, एवढेच काय मी स्वतः देखील केवळ हेच मोपलवार नेमकी जी काही ठिकाणी चांगली भूमिका कळत नकळत वठवत होते त्याकडे कौतुकाने बघण्याचे तेवढे काम केले त्यातलाच एक समृद्धी महामार्ग जो तुमच्या काकांनी कधीही होऊ दिला नसता, मोपलवार पुरून उरले, जाऊ द्या रोहितजी, सिंहाच्या गुहेत शिरून सिंहाचे वाईट होत नसते उलट शिरलेल्या सशाचेच प्रेत बाहेर येते…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

आजचा विशेष लेख : भाग एक

Next Post

दाग अच्छे है आणि जयंत पाटील हरारे

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

दाग अच्छे है आणि जयंत पाटील हरारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.