भाजपचे मधू देवळेकर आणि प्रियकर अमोल तुमच्या जाण्याने :
नेमका जून महिन्यात मी देशाबाहेर असतांना येथे मुंबईत लागोपाठ दोन दुर्दैवी प्रसंग घडले, ते दोघे माझे आवडते लागोपाठ गेले त्यापैकी आधी उत्तम व्यवसायिक आमच्या जिवाभावाचे फडणवीसांचे बाल जिवलग कुटुंब मित्र अमोल काळे वय नसताना अचानक तडकाफडकी गेले त्यानंतर लगेच काही दिवसात विस्मृतीत गेलेले भाजपा नेते मधू देवळेकर गेले, दोघांच्याही जाण्याने मन बधिर अस्वस्थ सैरभैर दुख्खी झाले. मराठी माणसांकडून माझ्या अपेक्षा नाहीत पण खुद्द भाजपाला देखील ज्यांचा खूप आधीपासूनच विसर पडलेला होता ते भाजपाचे माजी आमदार मधू देवळेकर वार्धक्यामूळे गेले, त्यांचे उत्तम व्यावसायिक पुत्र अभिजित यांचा मला फोन आला तेव्हा मी अमेरिकेत होतो, मधुजींशी शेवटची भेट आणि गप्पा राहून गेल्या, मनाला कायम खंत राहील. बाजूला पडलेल्या कायम अडगळीत टाकलेल्या या कर्तृत्ववान भाजपा आमदाराला ते गेल्यानंतर फडणवीस मोदी शेलार इत्यादी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली हेही नसे थोडके !! केवळ महाजनांना विरोध केला म्हणून ज्यांनी या मुंबईत भाजपा उभी केली भाजपाची सेवा केली त्या वामनराव परब आणि मधू देवळेकर दोघांनाही मुंडे महाजन जोडगळीने उचलून कायमचे अडगळीत टाकले, म्हणजे 94-95 दरम्यान या दोन्ही जिवलग मित्रांना ज्यांनी अनेक संकटांना झेलत मुंबईत भाजपा जनसंघ उभा केला त्यांना मुंडे महाजन जोडगळीने अपमानित करीत कायमचे घरी बसविले, वामनरावांना हा धक्का सहन झाला नाही ते त्यानंतर लगेच गेले आणि मधू देवळेकर यांनी राजकारणातून कायमची निवृत्ती पत्करली, त्याकाळी खारला मधुजींच्या घरी मुलुंडला वामनराव परबांच्या घरी मी अनेकदा जाऊन जनसंघ भाजपा मुद्दाम समजावून घेत असे. ते दोघेही माझ्यासारख्या मुंबईत अगदीच नवखा असूनही पुत्रवत प्रेम करायचे छान गप्पा मारायचे, मनापासून वाईट याचे वाटते कि महाजन मुंडेंपासून मुंबई भाजपामध्ये झपाट्याने तयार झालेले हिशेबी धंदेवाईक नेतृत्व वामनराव आणि मधू देवळेकरांना साफ विसरले आहे, जणू त्यांनी उत्तम संस्कारांना कायमसवसरूपी तिलांजली दिली आहे, देवळेकर यांना मी येथे मनापासून श्रद्धांजली वाहतो…
www.vikrantjoshi.com
हे बघा देवेंद्र फडणवीसांचा मित्र परिवार फार मोठा आहे, कित्येकांना वाटते आपण देवेंद्र यांच्या खूप जवळचे आहोत अनेकांना वाटते फडणवीसांना आपल्याशिवाय करमत नाही पण देवेंद्र फडणवीस म्हणजे ट्रीक सिन पद्धतीची गुडिया आहेत, ती जशी समोर उभ्या असणाऱ्या प्रत्येकाला वाटते कि आपल्यालाच डोळा मारते आहे तेच नेमके फडणवीसांचे आहे किंबहुना त्यांचा तो प्लस पॉईंट आहे कि ज्याला त्याला ते आपले वाटतात जवळचे आहे असे वाटत राहते नेमके हे आपल्या या राज्यात फक्त फडणवीसांनाच लागू पडते. पण फडणवीसांचे आजही जे जवळचे आहेत बाल मित्र आहेत जिगरी यार आहेत त्यात आल्हाद राजे शैलेश जोगळेकर जसे आहेत तयातलेच एक अमोल काळे होते जे फडणवीसांसाठी कोणतीही रिस्क घेऊन मोकळे झाले असते प्रसंगी अमोल यांनी देवेंद्रसाठी स्वतःचे प्राण देखील दिले असते, याच फडणवीसांची कुंभ रास त्यांना साडेसाती चांगलीच भोवते आहे, दुख्खात आणि संकटात आणखी भर म्हणून कि काय जिवलग अमोल काळे अचानक गेले, मी आणि विक्रांत या बातमीने आधी हादरलो नंतर खूप रडलो कारण आमचा आवडता आमचा कुटुंब मित्र आमच्यावर प्रेम करणारा माझा कॉफी फ्रेंड दिलदार मोठ्या मनाचा अमोल अचानक अकाली तडकाफडकी गेला. काम सांगायचा अवकाश अमोल लगेच सहकार्य करण्यासठी तयार, मला न्यूयॉर्क मध्ये पाच पासेस हवे आहेत मी त्यांना काहीच दिवस आधी म्हणालो आणि तेथे भेटण्याआधीच आमचा अत्यंत लाडका आवडता अमोल साऱ्यांच्याच जीवाला चटका लावून गेला, फडणवीसांना दुसरा अमोल मिळणे जवळपास अशक्य, तो धाडसी होता आणि आल्हाद शैलेश देवेंद्र या तिघांसाठी वाटेल तो त्याग करायला तयार असायचा, मित्रा आम्हाला तुझ्या जाण्याने मोठी पोकळी तू निर्माण केली आहेस, जेथे असशील तेथेही असाच धडपडत असशील, काळजी घे, खूप थकला आहेस,काही दिवस त्या स्वर्गात आराम कर मग कामाला लाग, श्रद्धांजली !!
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी