भाऊंच्या सभोवतालचे दिव्य स्पंदना आणि प्रवीण चक्रवर्ती :
काही नेते निर्ल्लज असतात निर्ढावलेले असतात त्यांची वृत्ती सराईत गुन्हेगारासारखी असते म्हणजे पोलिसांनी बेदम मारहाण केली तरीही गुन्हा कबूल न करणाऱ्या कोडग्या गुन्हेगारासारखे वागणे या अशा अनेक असंख्य बहुसंख्य नेत्यांच्या अंगवळणी पडलेले आहे असते जे नेते आपल्या राज्यातही जागोजाग पदोपदी आढळतात पण काहीच नेत्यांच्या वृत्तीत फारसा फरक ते सत्तेत आले असले तरीही पडलेला नसतो, इतरांचे बोलणे सांगणे टीका करणे त्यांना बोचते ते मग केलेल्या सूचनांचा विचार करतात, आवश्यक वाटल्यास लगेच स्वतःमधे बदल घडवून आणतात त्यातलेच एक अर्थात सुसंस्कारी सुविचारी सुस्वभावी देवेंद्र फडणवीस,ज्यांच्या कानात सांगितले तरी ते पुढल्या क्षणी त्यावर विचार करतात असा माझा अनेकांचा प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. भाऊ तोरसेकर यांना त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास डोळे मिटता मिटता भाऊंना अचानक मोठे यश मिळाले त्यानंतर त्यांच्याही सभोवताली जे काही रम्या आणि प्रवीण चक्रवर्ती जमा झाले अशा काही मतलबी मस्तवाल मीडियातल्या किंवा मीडियाशी संबंधित दलाल मंडळींनी भाऊंच्या कानात अर्धवट माहिती घेत सांगितले त्यातून माझ्या दृष्टीने श्वेता शालिनी हि अगदीच क्षुल्लक किरकोळ स्त्री पण थोर नेतृत्व देवेंद्र फडणवीस मात्र उगाच बदनाम झाले आणि भाऊंचा या त्यांच्या भोवताली जमलेल्या दिव्य स्पंदना आणि प्रवीण चक्रवर्ती छाप मंडळींनी मोठ्या खुबीने पिंजरा सिनेमातला मास्तर केला म्हणजे क्षणार्धात मुंबईसह राज्यातल्या ते थेट दिल्लीपर्यंतच्या भाजपा वर्तुळात मोठी बदनामी घडवून आणली जे भाऊ गल्ली ते मोदी प्रत्येक भाजपा संघातल्या नेत्यांचे स्वयंसेवकांचे अत्यंत लाडके आहेत कदाचित होते ज्याला अचानक गालबोट लागले…
www.vikrantjoshi.com
पूर्वी आणि आजही मी विक्रांत किंवा भाऊंचा मानस पुत्र आबा माळकर भाऊंवर नितांत प्रेम करणारे, मर्यादित यश असेपर्यंत आमच्याशिवाय भाऊंचे पान हलत नसे नंतर मात्र त्यांच्या सभोवताली अनेक रम्या आणि प्रवीण जमा झाले आणि आमचे स्थान मागल्या रांगेत गेले पण प्रेम तेच पूर्वीचे म्हणजे भाऊंच्या भलेही आनंदात ते बदमाश सभोवताली सारे पण आलेच जर कोणतेही संकट तर आमचे स्थान पहिल्या पाचातले. मधुचंद्राची रात्र बंद खोलीत साजरी करायची असतांना ती जर उघड्यवर उरकली तर तो व्यभिचार ठरतो ते तसे नेमके यावेळी भाऊंच्या बाबतीत घडले त्यांनी जे फडणवीसांच्या कानात सांगायचे होते ते त्यांनी उघड्यावर केले आणि साराच घात झाला, फडणवीसांना त्यामुळे मान खाली घालावी लागली, भाऊंची पद्धततेवढी चुकली पण श्वेता शालिनी यांना त्यांची जागा दाखविल्या गेली हेही बरे झाले जे माझ्या मनात 2014 पासून होते ते भाऊंनी एक क्षणात घडवून आणले अर्थात भाऊंना श्वेता शालिनी केवळ त्या रम्या एवढीच माहित असावी मला मात्र ती अनेक कंगोर्यांसहित पुराव्यांसहित तोंडपाठ आहे. उगाच आणखी घाण बाहेर पडायला नको म्हणूनही कदाचित श्वेता यांनी तडकाफडकी आणि श्रेष्ठींचे निमित्त पुढे करीत भाऊंना पाठवलेली बदनामीची नोटीस मागे घेतली. भाऊ जे तुमचे तेच फडणवीसांचे देखील म्हणजे एखाद्याला मोठे यश मिळाले कि आपोआप त्यांच्या सभोवताली संधीसाधू बदमाश चलाख दलाल चाणाक्ष वृत्तीच्या मंडळींची मोठी गर्दी उभी होते जे या अशा मोठ्या झालेल्या व्यक्तीच्या सभोवताली दाट कोंडाळे करून उभे असतात, इतर चांगल्या मंडळींना ढकलून बाहेर काढतात स्वतः ताबा घेतात आणि मोठे फायदे करवून घेत एक दिवस त्यालाच उध्वस्त कसुन मोकळे होतात, पण फडणवीसांचा मोठा प्लस पॉईंट असा जमेची बाजू अशी कि त्यांना नेमके प्रेम करणारे जिवाभावाचे मित्र कळतात, त्यातलेच एक भाऊ, असे त्यांना वाटते किंवा वाटायचे म्हणून जे मी केले तेच भाऊंनी करायचे होते, कोण कसे वाईट हलकट बदमाश एवढे जरी भाऊंनी फडणवीसांच्या कानावर टाकले असते तरीही ते पुरेसे ठरले असते…
भाऊंचा आवडता शब्द आहे, वाट्यावरून भांडण आणि येथेही नेमके तेच घडले असावे म्हणजे ‘तेरी साडी मेरे साडीसे ज्यादा सफेद कैसी, यातलाच तो प्रकार, भाजपाच्या झारीतले काही शुक्राचार्य आणि श्वेता शालिनी यांचा ‘भारतीय ‘ छाप गट असे ते वाट्यावरून भांडण, एरवी श्वेता शालिनी पुरून उरतात यावेळी त्यांच्या मीडियातल्या आणि पक्षातल्या मंडळींनी भाऊंच्या खांदयावर बंदूक ठेवून क्षणार्धात बदला घेतलेला आहे. दोन्हीकडले संधिसाधूच, दोन्ही गटात भाजप मोठा व्हावा पेक्षा स्वतःची श्रीमंती वाढविण्याकडे कल, ज्याला दूर ढकलल्या जाते किंवा गेले तो मग असा पेटून उठतो आणि विरोधकाला पुरता बदनाम करून मोकळा होतो, पण ज्याला महाराष्ट्र घडवायचा आहे आणखी आणखी पुढे न्यायचा आहे ज्याला ती मनापासून तळमळ आहे त्या फडणवीसांना अडचणीत न आणण्याचे काम त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी नेहमी करायला पाहिजे जे आम्ही डोळ्यात तेल घालून करतो, मला तर असे अनेक श्वेता शालिनी पुराव्यांसहित आतबाहेर माहित आहेत, भाऊ देखील फडणवीसांवर खूप प्रेम करतात पण यावेळी त्यांचा सभोवताली जमलेल्या खुशमस्कसर्यांनी नेमका आणि नक्की घात केलेला आहे, भाऊ आणि फडणवीस दोघेही माझे अत्यंत लाडके, म्हणून खूपच वाईट वाटले पण मी देशाबाहेर असल्याने हा विषय लिहिण्यास विलंब झाला पण हा विषय येथेच संपत नाही….
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी